लेखककेडीयांनी मंगळवार, 03/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
१० ब्रेड स्लाईस
२ मध्यम आकाराचे बटाटे, उकडून, किसून
२ बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या
४ ते ५ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ बारीक चिरलेला कांदा
२ मोठे चमचे सोया सौंस
१ चमचा मिरपूड (असल्यास सफेद)
मीठ चवीनुसार
१/२ कप कॉर्नफ्लॉर
३ ते ४ चमचे पांढरे तीळ
तळणीसाठी तेल
कृती
ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोलाकार कापून घ्या. बटाट्यांपासून ते मीठा पर्येंत सर्व जिन्नस एका बाऊल मध्ये मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता ब्रेडच्या कॉइन वर दाबून बसवा. एका ताटलीत तीळ पसरवून, ब्रेड चे मिश्रण लावलेले कॉइन तिळाच्या ताटलीत दाबून घ्या. सगळ्या ब्रेड च्या कॉईन्स ना मिश्रण आणि तीळ लावून झाले कि ते फ्रिज मध्ये साधारण २० ते २५ मिनिटे ठेऊन द्या.
कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी घालून त्याची पातळीशी पेस्ट बनवून घ्या. कढईत तेल गरम करून, कॉईन्स कॉर्नफ्लॉर च्या पेस्ट मध्ये घोळवून, मंद आचेवर हे कॉईन्स तळून घ्या.
गरम गरम व्हेज गोल्ड कॉईन्स शेजवान सौंस बरोबर खायला घ्या!
ह्यात चिकन चे शिजवलेले तुकडे घालून, चिकन गोल्ड कॉईन्स बनवू शकता. बऱ्याच हॉटेल मध्ये एक चायनीज स्टार्टर म्हणून हा पदार्थ सेंसमी टोस्ट नावाखाली मिळतो. भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे पण वापरून बघू शकता, कांद्या ऐवजी, कांदेपात वापरून बघा.
प्रतिक्रिया
वा वा काय दिसतेय पाककृती...
अहाहा!! ह्याचं एयर फ्रायर
एयर फ्रायर मध्ये सुद्धा होतील
In reply to अहाहा!! ह्याचं एयर फ्रायर by पिलीयन रायडर
एकूण प्रकरण मस्त आहे...
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
जबरदस्त!!
मस्तच.. तोंपासू
मस्तच.
मस्त पाककृती
मस्त.
मस्त
मस्त....
In reply to मस्त by सविता००१
सविता००१ हिने केलेल्या ह्या
In reply to मस्त by सविता००१
thank you
In reply to सविता००१ हिने केलेल्या ह्या by केडी
thank you
In reply to सविता००१ हिने केलेल्या ह्या by केडी
thank you
In reply to सविता००१ हिने केलेल्या ह्या by केडी
अरे
In reply to thank you by सविता००१
खल्लास....
मस्त.. तोंपासु :)
दुत्त दुत्त!
सुंदर, विकांती करुन बघणेत
ब्रेड फ्राय केला तर किती ऑइल