अरबस्थाना तील दोन बोधकथा
...
....................
कथा क्रमांक एक
एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो..
तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो...
तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो..
तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही..
असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो..
फकीर हसतो व म्हणतो..अरे एव्हढेच ना? मी तुला हवे ते देतो..माझ्या कडे तशी शक्ती आहे..त्या बदल्यात तू मला पण हवी ति गोष्ट दिली पाहिजे..
तो माणूस आनंदाने मनात म्हणतो काय मागाल ते देईन..कारण देण्या जोगे माझ्या कडे काहीच नाही...
व त्या फकिराला सांगतो..मान्य आहे..
फकीर आपल्या शक्तीने.. सुंदर बायको..धन ...गाडी.. आदी निर्माण करतो.ते पाहून माणूस आनंदीत होतो..अन त्या सुंदरीचा हात पकडणार इतक्यात तो फकीर त्या ला थांबवतो..व म्हणतो...
" अरे मित्रा मला जे हवे ते तू दिल्या शिवाय ह्या गोष्टी तुला मी देणार नाही"
आनंदाने बेहोष झालेला तो माणूस म्हणतो.." माग हवे ते..मला जर देवाने काहीच दिले नाही तर तू काय मागणार अन मी काय देणार"???
या वर फकीर हसतो. व म्हणतो " तुला देवाने २ हात दिले आहेत बदल्यात ते तू मला दे..व या सर्व गोष्टी घेऊन जा"
हे ऐकताच त्या माणसाला उपरती होते व तो फकिराचे आभार मानत पुढे जातो..
निचोड असा की..देवाने आपल्याला बुद्धी..धडधाकट शरीर दिले आहे ..त्याचा उपयोग करत संपत्ती निर्माण करून तिचा उपभोग घेण्या ऐवजी माणूस देवाने हे दिले नाही माझे नशीब फुटके असे म्हणत कुढत असतो..
...............................
अरबस्थाना तील दोन बोधकथा...
....................
कथा क्रमांक दोन.
एक धनी वयस्कर माणूस अरबस्थानात रहात असतो..
वय ७५....तो श्रद्धाळू असतो
शुक्रवारी मशीदीत जाऊन परमेश्वराची आराधना करण्या साठी तो निघतो. त्या काळात दळण वळणाची आधुनिक साधने नव्हती
त्याच्या कडे एक अबलख उमदा अरबी घोडा होता..त्यावर कमावलेल्या चामड्याचे खोगीर तो चढवतो व शुक्रवारी मशीदीत परमेश्वराची आराधना करण्या साठी प्रस्थान करतो..
मशीद घरापासून लांब असते..
मशीदी जवळ आल्यावर तो घोडा मशीदी च्या बाजूला बांधतो...
त्या काळात चो-या होत असल्याने मशीदीच्या बाजूला २-४ मुले खेळत असतात त्यातल्या एका मुलाला बोलवून तो व घोड्याकडे लक्ष देण्यास त्या मुलाला सांगतो व त्या बद्दल तुला चांगले बक्षीस देईन असे म्हणतो...
बक्षीस म्हटल्यावर तो मुलगा खूश होतो अन आनंदाने ते काम स्वीकारतो...
त्या नंतर तो मशीदीच्या पाय-या चढू लागतो..
*
मशीदी च्या बाजूच्या गल्लीत चोर बाजार असतो..
त्या बाजारात एक व्यापारी असतो..तो दुकान उघडतो...
व देवास प्रार्थना करतो की..हे दयाघना आज चांगला चोरीचा माल मिळू दे जो विकून मला आज चांगला नफा होईल
*
इकडे ज्या मुलाला घोड्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते तो "टपोरी" टाईपचा असतो..तो विचार करतो..हा म्हातारा म्हणाला खरं बक्षीस देतो म्हणून पण काय सांगावे? नाही दिले तर?
हा विचार मनात आल्यावर तो मुलगा घोड्या च्या पाठीवरचे खोगीर सोडतो..व ते घेऊन सू बाल्या करतो व चोर बाजारात येतो.
तो वर सांगितलेल्या दुकानदारा कडे येतो व त्याला खोगीर दाखवतो..
कमावलेल्या चामड्याचे ते खोगीर बघून मालक आनंदतो.व चेह-यावर आनंद न दाखवता भावात घासाघीस सुरू करतो..
शेवटी ५० रु सौदा ठरतो..व तो मुलाला ५० रु देतो..
तो मुलगा पण ५० रु घेतो व ऐष करायला निघून जातो...
*
इकडे तो माणूस मशीदीतून बाहेर येतो..लांबन बघतो घोडा जागेवर आहे हे पाहिल्याने खूश होतो व त्या मुलाला १०० रु बक्षीस देण्याचे मनात ठरवतो..
घोड्याजवळ आल्यावर तो इकेडे तिकडे बघतो..पण तो मुलगा नजरेस न पडल्याने बाजूच्या मुलाकडे त्याची चौकशी करतो..
पण मुले सांगतात..इथेच होता पण कुठे गेला ते माहीत नाही....
तो वृद्ध माणूस मनातून १०० रु वाचले म्हणून खूश होतो व घोड्यावर टांग मारताना त्याला कळते की खोगीर नाही..
परमेश्वराची इच्छा असे म्हणतं तो घोड्याचा लगाम पकडतो व चोर बाजारात दुकानदाराकडे येतो..व जुने खोगीर आहे का? अशी चौकशी करतो...
१० मिनिटा पूर्वी माल घेतला व लगेच विकला जाणार यामुळे तो दुकानदार मनात देवाचे आभार मानतो..
तो वृद्ध माणूस अडलेला आहे हे बघून तो म्हणतो..खोगीर आहे व त्याची किंमत १०० रु होईल असे त्याला सांगतो..
त्या माणसाकडे पण काही पर्याय नसल्याने तो खोगीर विकत घेतो..घोड्याच्या पाठीवर चढवतो..व घरचा रस्ता चालू पडतो...
*
कथेचा निचोड असा की जे परमेश्वराच्या मनात असते तसेच घडत असते..त्या माणसाने १०० रु खर्च करायचे ठरवले असतात पण मुलगा न दिसल्याने १०० रु वाचले असे त्याला वाटत असते..पण तसे घडणे नसते..त्याचे १०० रु खर्च होणार ते झालेच..मुलगा टपोरी असतो त्याच्या मनात पाप येते त्या मुळे त्याला १०० रु मिळणार त्या ऐवजी ५०रु मिळतात..दुकानदार श्रद्धाळू असल्याने त्याचा ५० रु माल १०० रु विकला जातो व त्याला नफा होतो
वाचने
8915
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मी पयला दोन्ही कथा समजल्या
कथा छानेत.
आवडली!!
मशीदी च्या बाजूच्या गल्लीत
In reply to मशीदी च्या बाजूच्या गल्लीत by मृत्युन्जय
चोरी करणाऱ्याला पाप लागतं ,
In reply to चोरी करणाऱ्याला पाप लागतं , by संदीप डांगे
चोरीचा माल विकत घेणारा आणी
In reply to चोरीचा माल विकत घेणारा आणी by मृत्युन्जय
सद्वर्तन आणि दुर्वर्तन
In reply to चोरीचा माल विकत घेणारा आणी by मृत्युन्जय
मालक ,
इतका सुंदर बोध मिळाला की बस
दुकानदार श्रद्धाळू असल्याने
दुकानदार श्रद्धाळू असल्याने त्याचा ५० रु माल १०० रु विकला जातो व त्याला नफा होतो"श्रद्धाळू माणुस, तोही चोरीचा माल विकणारा आणि त्यामुळे त्याला होणारा नफा" या ती गोष्टी एकवटलेल्या बघून काय बोध घ्यावा बरे !? :)समीक्षण
छान कथा
In reply to छान कथा by पगला गजोधर
आनि हे सगळं चाललय अरबस्तानात!
In reply to छान कथा by पगला गजोधर
श्रद्धाळू माणसाने १०० रुपये
In reply to छान कथा by पगला गजोधर
असाही तो व्यक्ती १००चलन
..
In reply to .. by chitraa
अग्गाग्गा....भारीये =))
काका.
In reply to काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लो यू... :)
लो यू... :)प्रा डाँचा स्वभावच फार प्रेमळ... पहिल्यापासून ;) :)जाऊ द्या काका, ती आमसूलवाली
कथा १ :