अंतरे

परिधी's picture
परिधी in जे न देखे रवी...
5 Dec 2016 - 3:43 pm

कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे,
सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे?

प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे,
घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे?

तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे
वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे?

तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे,
परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?

विराणीकविता

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

5 Dec 2016 - 6:55 pm | शार्दुल_हातोळकर

आशय अत्यंत छान आहे.

परिधी's picture

6 Dec 2016 - 12:28 am | परिधी

धन्यवाद!