जग घूमेया थारे जैसा ना कोई |
ना तो हंसना रूमानी कहीं ना तो खुशबू सुहानी कहीं ना वो रंगली अदाएं देखीं ना वो प्यारीसी नादानी कहीं आणि प्रेमाची खरी खुमारी इर्शादच्या या एका ओळीत एकवटली आहे! जैसी तू है वैसी रहेणा... इतका दुरावा आहे. ती पुन्हा कधीही भेटू नकोस म्हणालीये. त्यांच्या पहिल्या-वहिल्या मुलाच्या मृत्यूला सुल्तान जवाबदार आहे. तो ऑलिंपिक्स जिंकूनही आपलं इष्क हरवून बसलायं. आणि जिंदगीच्या घटनाक्रमाला तर मागे न फिरण्याचा शाप आहे. नात्याचा संपूर्ण कडेलोट झालायं तरी सुल्तान म्हणतो, जैसी तू है वैसी रहेणा...तू कदापिही बदलू नकोस. तू आहेस तशीच मला प्रिय आहेस. जग घूमेया थारे जैसा ना कोई । ______________ बारिशों के मौसमोंकी भीगी हरियाली तू सर्दियोंमें गालोंपे जो आती है वो लाली तू रातों का सुकून भी है सुबह की अज़ान है चाहतों की चादरोंमें मैंने है संभाली तू... खरं तर इतकी उत्तम शायरी, कुठेही विशद करायला जागा नाही. `रातों का सुकून भी है' या ओळी, तिच्या सहवासात तो रात्रीचा सुकून अनुभवणाराच जाणू शकतो. एक तर रात्रीचा आपला स्वत:चाच एक सुकून असतो आणि त्यात तिच्याशी संग म्हणजे निव्वळ कमाल. दोन देह आणि अंगोपांगात भिनत जाणारा तो निवांतपणा म्हणजे इहलोकीची जन्नत! मग `सुबह की अज़ान है' हा फिल... अजिबात आहट न होऊ देता, तिच्या निवांत पहुडलेल्या देहाकडे बघत, दोघांसाठी कॉफी करुन, तिला अवेळी उठवून, निवांतपणे कॉफी घेतल्यावर, उजाडण्यापूर्वीच, एकमेकांच्या उबेत, न संपणार्या निवांत रस्त्यावर, निर्वेध भटकायला जाण्याची अफलातून मजा. ती, तुम्ही, पहाटेचा अल्हाद, देह जणू हवेत तरंगत असल्याचा आनंद....सुबह की अज़ान | कहीं आग जैसी जलती है बने बरखा का पाणीं कहीं कभी मान जाणा चुपके से यूँ ही अपनी चलाणी कहीं तिच्या रागाची दाहकता आणि तिचं सर्वस्व आर्पण करणार्या प्रेमाचा सुखद वर्षाव. कधी आलेला तिचा अनपेक्षित होकार आणि कधी तिनं धरलेला अतर्क्य हट्ट. किती साध्या, सोप्या ओळीतून इर्शाद आपल्या जीवनाला स्पर्शून जातो! आणि म्हणतो ... जैसी तू है वैसी रहेणा.... जग घूमेया थारे जैसा ना कोई । _________________________ अपणे नसीबोंमें या हौसले की बातोंमें सुखों और दुखोंवाली सारी सौगातों में संग तुझे रखणा है संग तुझे रखणा है, तूने संग रहेणा मेरी दुनियामें भी मेरी जज़बातों में तेरी मिलती निशानी कहीं जो है सबको दिखानी कहीं तू तो जाणती है मरके भी मुझे आती है निभाणी कहीं माझं नशिब असेल किंवा मग केवळ हौसला असेल, सुखात काय की दु:खात काय, तू साथीला आहेस आणि तूच संगतीला राहाशिल. माझ्या जगात, माझ्या भावना विश्वात तुझ्याच खुणा आहेत. आणि मी त्या जगाला बिनदिक्कत दाखवतो. तू तर जाणतेस की मृत्यूत सुद्धा मी तुझ्यातच सामावायची जिद्द करीन. आणि शेवटी तर इर्शाद कमाल करतो. वो ही करना है जो है कहेणा तू माझी फिकीर करु नकोस. जे तुझं अंतरंग तुला सांगतंय तेच तू कर! आज तुझ्या दुर्दैवाला मीच जवाबदार आहे असं तुला वाटतंय. तू सहन होण्यापलिकडचा जुलूम करतेयंस. काही हरकत नाही. माझ्या इश्काची नशा अजून तशीच आहे, कारण ..... जग घूमेया थारे जैसा ना कोई |
In reply to पहिला परिच्छेद समजला. by खेडूत
ल इष्काचा या प्रत्येक कलाकराच्या दुनियेत? इर्शाद क़ामिल इतकी उत्कट शायरी, स्वत: ती जगल्याशिवाय लिहू शकणार नाही. राहत फतेह अली खान स्वरातून जादू निर्माण करतो आणि स्वत:च्या, अत्यंत नज़ाकतीच्या इश्काच्या दुनियेत, ऐकणार्याला घेऊन जातो. विशाल-शेखरनी गाण्याला जो स्वरसाज़ चढवलायं तो इतका हलका आहे की क़ामिलच्या शायरीला जरा सुद्धा धक्का लागत नाही आणि तरीही भावनांची उत्कटता पराकोटीला नेतो. सलमाननी अदाकारीत तर केवळ कहर केलायं ! सगळ्यांची इश्काची दुनिया वेगवेगळी पण इश्काचा आलम मात्र एक, जग घूमेया थारे जैसा ना कोई |
In reply to रागावू नका पण नाही आवडला लेख. by अनुप ढेरे
In reply to गाणं अजिबात माहीत नसूनही by प्रचेतस
In reply to गुड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिला परिच्छेद समजला.