कधी येशील कोंदणी??... (खास व्हॅलेंटाईन डे साठी)
लेखनविषय:
सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! :)
कधी येशील कोंदणी??... :X
तुझ्या नजरेचा मेघ, त्यात काजळाची रेघ
कसा सोसावा आवेग, पडे काळजाला भेग
धनुष्य का भिवईचे, ताणूनसे धरलेले
तीर नयनांचे असे, मजवरी रोखलेले
रंग त्यांचा निळा भुरा, अचपळ मेघ खरा
पापण्यांचा गं पिसारा, झुलवी का झराझरा
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे
मन वार्याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे
नाजूकशी गं जीवणी, नको फ़ुलवूस राणी
कट्यारच जीवघेणी, काळजाचे पाणी पाणी
तुझे हासणे ते मंद, मन माझे होई धुंद
लाल पाकळ्यांत बंद, जशा शुभ्र कळ्या कुंद
तुझ्या प्रेमात नाहतो, तुला स्वप्नांत पाहतो
तुझ्या सयीत वाहतो, संगे तुझ्याच राहतो
श्वासाश्वासात गं राणी, बघ तुझ्या आठवणी
माझीच तू हिरकणी, कधी येशील कोंदणी?
- प्राजु
वाचने
9203
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
सुरेख .......
In reply to सुरेख ....... by मानस
+१,
In reply to +१, by छोटा डॉन
+२
सुंदर..
धूंद करे
वा ! कविता
सुरेख
वा!!! कसलं
क्या बात
मस्तच कविता!
In reply to मस्तच कविता! by चतुरंग
जोडीने...
In reply to जोडीने... by बिपिन कार्यकर्ते
बिपिनदा,
In reply to जोडीने... by बिपिन कार्यकर्ते
ठरवून केलेले असावे.
In reply to ठरवून केलेले असावे. by प्राजु
मस्त...
व्हॅलेंटीन डे स्पेश्शल!
अति ऊत्त्म....
खुप आवडली
+१
मस्त
In reply to मस्त by मीनल
सुंदर
अहा
In reply to अहा by जयवी
जोरदार
सुंदर
सुंदर!
सुरेख कविता
वा! फरच छान
In reply to वा! फरच छान by विसोबा खेचर
असेल..
छान!!
छान
क्या बात
खट्याळ
उत्तम
प्राजु तै,
व्वा...
व्हॅलेंटाईन स्पेश्शल
अ प्र ति म.
In reply to अ प्र ति म. by मॅन्ड्रेक
मॅन्ड्रेक
लै भारी
कविता सुरेख झाली आहे.
धन्यवाद.
शिल्पकारा
छान आहे
कविता
खूप गोड!
कधी येशील कोंदणी...