'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.'
माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं...
कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली.
जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच. हे काही पहिले पहिले प्रसंग होते.
पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मधला बराचसा अनागोंदी कारभार भारताला डोकेदुखी ठरत होता. इंदिराजींनी या प्रश्नाचा काय तो निकाल लावायचाच असं ठरवलं होतं. यात लक्ष घालायला सुरवात केल्यावर त्यांना लवकरच लक्षात आलं की हा प्रश्न काही चर्चातून सुटणारा नाही. त्यांनी याबाबतीत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीच होती. अनेक देशाना भेटी देऊन पाकिस्तान प्रश्न, भारताची बाजू आणि भूमिका याबद्दल माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करून ठेवण्यात आली. दुसऱ्या बाजूला लष्कराला तयारी करण्याची सूचना देऊन ठेवलीच होती. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाक विमानांनी अमृतसर, अंबाला आणि इतर ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि युद्धाला सुरवात केली. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यातल्याच तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन 'बांगलादेश मुक्ती वाहिनी' तयार केली. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराला आदेश दिले की पाकिस्तानात शिरा. तेरा दिवस! तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला. ही भारताच्या इतिहासातील सर्व बाजूंनी तयारी करून योग्य संधीची वाट पाहून खेळलेली एकमेव खेळी. जिंकल्याची वार्ता मंत्रिमंडळाला सांगताना इंदिराजी म्हणतात, "गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है".
आपल्या मंत्रिमंडळातून इंदिराजींनी सिंडिकेट ग्रुप ला तर काढून फेकलंच होतं. परत त्यांना कुणी गुंगी गुडीया बोललं नसेल. गुजरात आणि बिहार मध्ये भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्यासारखी काही विधानं त्यांच्याकडून झाली आणि इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरुवात झाली. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि इंदिराजींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली. ही बंदी पण झुगारून राजीनामा न देता इंदिराजींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आणि सुरु झाला भारताच्या इतिहासातील काळं पर्व. एकछत्री अंमल, कडक सेन्सॉरशिप इत्यादी. याच कालावधीत देशातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले.
1977 साली इंदिराजींनी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि 30 वर्षात प्रथमच केंद्रात काँग्रेस ची सत्ता गेली. जनता पार्टी ला लोकांनी प्रचंड प्रमाणात मतदान केलं. याच जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे इंदिराजी 1980 साली पुन्हा निवडून आल्या. 'गरिबी हटाव' च्या मुद्द्यावर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.
काही दिवसातच पुन्हा एका काळ्या पर्वाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे ऑपरेशन ब्लु स्टार. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला हेव्ही आर्टिलरी चा वापर करावा लागला आणि पवित्र सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवल्याने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचिच परिणीती दंगलींमध्ये झाली.
फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्यांच्या नावावरून पुण्यात पूल आहे, ते लंडन मधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं 'जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट' च्या अतिरेक्यांनी अपहरण केलं आणि मकबूल भट या त्यांच्या म्होरक्याला सोडण्याची मागणी केली. इंदिराजींची भूमिका तीच, दहशतवादासमोर झुकणार नाही. दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!
31 ऑक्टोबर 1984 ला याच ऑपरेशन ब्लु स्टार चा रोष मनात ठेवून इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली आणि एक झंझावात अखेर थंड झाला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21331
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
धावता आढावा छान जमलाय.
ठळक
In reply to धावता आढावा छान जमलाय. by जव्हेरगंज
पंतप्रधान या मालिकेच्या ७,८,९
इंदिराजींचे कार्य
मस्त
In reply to इंदिराजींचे कार्य by सर टोबी
संस्थानिकांचे भत्ते
In reply to इंदिराजींचे कार्य by सर टोबी
संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे
In reply to संस्थानिकांचे भत्ते by गॅरी ट्रुमन
स्वतंत्र पक्ष एकमेव उघड
In reply to संस्थानिकांचे भत्ते by गॅरी ट्रुमन
हो
In reply to स्वतंत्र पक्ष एकमेव उघड by अनुप ढेरे
जयपूरच्या संस्थानिक असलेल्या
In reply to हो by गॅरी ट्रुमन
इंदिरा गांधींनी रडीचा डाव
In reply to जयपूरच्या संस्थानिक असलेल्या by श्रीगुरुजी
अणुऊर्जा आणि त्यासंदर्भात
In reply to इंदिराजींचे कार्य by सर टोबी
बँकांचे राष्ट्रीयीकरण
In reply to इंदिराजींचे कार्य by सर टोबी
मस्त
आझाद हिंद सेनेच्या निवृत्त
इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित
इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित
होय बऱ्याच घटनांमध्ये त्यांचं कार्य आहे
बांगलादेश युद्धावेळी
हाच फरक आहे, वडील आणि मुलगी..
In reply to बांगलादेश युद्धावेळी by जॉनी
हे विधान बरोबर आहे का ?
In reply to बांगलादेश युद्धावेळी by जॉनी
हे विधान बरोबर आहे का ?
In reply to बांगलादेश युद्धावेळी by जॉनी
इंदिरा गांधींना सलाम, त्यांचं
मस्तं. अजून काही योगदान
10.राजकीय भ्रष्टाचाराची जननी
In reply to मस्तं. अजून काही योगदान by अनुप ढेरे
इंदिरा गांधींनी आपल्या
In reply to 10.राजकीय भ्रष्टाचाराची जननी by पुंबा
शिवसेनेसारख्या गुंड
In reply to मस्तं. अजून काही योगदान by अनुप ढेरे
शिवसेनेसारख्या गुंड
In reply to मस्तं. अजून काही योगदान by अनुप ढेरे
हा हा हा
In reply to मस्तं. अजून काही योगदान by अनुप ढेरे
आयकर
In reply to मस्तं. अजून काही योगदान by अनुप ढेरे
आह, अमेरिकेतदेखील इतका
In reply to आयकर by गॅरी ट्रुमन
97 % खूपच जास्त
In reply to आयकर by गॅरी ट्रुमन
हो
In reply to 97 % खूपच जास्त by जॉनी
पहिले वाक्यः
In reply to हो by गॅरी ट्रुमन
इंदिरा गांधी एक फार धडाडीची
उचित लेख. मृत्युंजय यांच्याशी
मकबूल बट
ज्या तडफदारीने बाईंनी ते
In reply to मकबूल बट by गॅरी ट्रुमन
हो
In reply to ज्या तडफदारीने बाईंनी ते by मृत्युन्जय
" ज्युडिशियल किलिंग " ची
In reply to हो by गॅरी ट्रुमन
" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.असहिष्णुतेचा साक्षात्कार, पुरस्कार वापसी, अल्पसंख्यांकांच्या मतांची गळचेपी वगैरे प्रकार झाले नाहीत का नंतर..?आणिबाणीचे समर्थन करताना आजही
इंदीरा गांधींना खरंच आपल्या
In reply to आणिबाणीचे समर्थन करताना आजही by मार्मिक गोडसे
इंदिरा गांधींची वेगळी बाजू
प्रतिसादात गडबड. कृपया सांभाळून घेणे.
In reply to इंदिरा गांधींची वेगळी बाजू by गामा पैलवान
बाकी काही असो, तुमच्या
In reply to इंदिरा गांधींची वेगळी बाजू by गामा पैलवान
अरे वा!
In reply to बाकी काही असो, तुमच्या by संदीप डांगे
गा. पै...
In reply to अरे वा! by गामा पैलवान
तुमच्यासारखे लोक अवतीभवती
In reply to अरे वा! by गामा पैलवान
हें बरीक खरें
In reply to तुमच्यासारखे लोक अवतीभवती by संदीप डांगे
ना, मैमुना बेगम नावाच्या
In reply to हें बरीक खरें by गामा पैलवान
समजले नाही!
In reply to तुमच्यासारखे लोक अवतीभवती by संदीप डांगे
नाही समजले ना? असू द्या मग.
In reply to समजले नाही! by प्रदीप
उद्धट उत्तर
In reply to नाही समजले ना? असू द्या मग. by संदीप डांगे
उद्धट उतर??
In reply to उद्धट उत्तर by प्रदीप
ठीक
In reply to उद्धट उतर?? by संदीप डांगे
तुमच्या आवडत्या पक्षाच्या
In reply to इंदिरा गांधींची वेगळी बाजू by गामा पैलवान
इंदिरा गांधींचं विवाहपश्चात
In reply to इंदिरा गांधींची वेगळी बाजू by गामा पैलवान
मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील
शब्दशः सहमत मला सुद्धा इंदिरा
In reply to मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील by पुंबा
धवल क्रांती राहिले का ?
In reply to मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील by पुंबा
धवल क्रांती देखील काही
In reply to धवल क्रांती राहिले का ? by अप्पा जोगळेकर
कश्याबाबत बोलताय अप्पा? ऑपेशन
In reply to धवल क्रांती राहिले का ? by अप्पा जोगळेकर
मस्त लिहिलंय
नुकतच ब्लड टेलीग्राम वाचल.
आणीबाणी आणि जोरजबरदतीचे
+++111
In reply to आणीबाणी आणि जोरजबरदतीचे by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतं बऱ्याच प्रमाणात
In reply to आणीबाणी आणि जोरजबरदतीचे by डॉ सुहास म्हात्रे
असहमत. इंदिरा गांधींची
In reply to मला वाटतं बऱ्याच प्रमाणात by पुंबा
१९७९ मध्ये बिहारमधील पांडे
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
१९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते.बिहार नाय वो... उत्तर प्रदेश.१९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत.इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandalबिहार नाय वो... उत्तर प्रदेश.
In reply to १९७९ मध्ये बिहारमधील पांडे by मोदक
१९७० च्या दशकात एकदा सौदी
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
तेल नावाचा इतिहास
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
तेल नावाचा इतिहास
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
सौदी
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
प्रतिसाद
In reply to असहमत. इंदिरा गांधींची by श्रीगुरुजी
सिमला कराराचे हाडूक
इथे सगळेजण इंदिराजींच्या राजकीय निर्णयांबद्दल बोलताहेत, तर
सहमत आहे
बांगलादेश युध्द
पाक
In reply to बांगलादेश युध्द by गॅरी ट्रुमन
बांगलादेश वेगळा काढायचं एक कारण
In reply to बांगलादेश युध्द by गॅरी ट्रुमन
भुत्तोंची सत्ता उलथवून हुकूमशहा बनलेले
In reply to बांगलादेश युध्द by गॅरी ट्रुमन
गामा मूर्ख आहे तर असो ....