(काळी असे कुणाची)
लेखनविषय:
काव्यरस
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
वाचने
16922
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
धमाल..
दणदणीत हो पैजारबुवा.....
चखोट !
पैजारबुवा इज ब्याक!
परीर्वतनहे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
हाट ! कवितेला कुठे व्याकरण असतं का राव ?
=))
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:||
रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत)
पैजारबुवा,
In reply to मुद्राराक्षसाची चूक समजून मोठ्या मनाने क्षमा करावी. by ज्ञानोबाचे पैजार
भारी =))
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे यातला कि -हस्व हवाय ना?
In reply to वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे by किसन शिंदे
कि फक्त तुमच्या नावात र्हस्व असतो सभ्य संपादक, अन्यथा नाही.
In reply to वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे by किसन शिंदे
नाही.
व्वाह!
मस्त.
मँगो करी हा कुठला रस?
In reply to मस्त. मँगो करी हा कुठला रस? by खेडूत
फ्युजन रस!
In reply to मस्त. मँगो करी हा कुठला रस? by खेडूत
उकळलेलं पन्हं.
=)) वाङ्मयशेती लै भारी ओ तुमची!
=)) =))
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी
मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे.
सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही
ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे
जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे
धागा शोधू जाता, तो संपादित आहे
रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही
सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!
In reply to नवकवी उवाच by एस
=)) दंडवत कवीराज __/\__
In reply to नवकवी उवाच by एस
हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये...
मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील...
इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत?
तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है...
पैजारबुवा,
In reply to आय हाय.... by ज्ञानोबाचे पैजार
हायला धन्यवाद हो लोक्स! प्रतिसाद मिळाल्याने लय खुश झालो आहे! ;-)
In reply to नवकवी उवाच by एस
आरारा
In reply to नवकवी उवाच by एस
=))
In reply to नवकवी उवाच by एस
=))
मस्त ! रविवारची धमाल सुरुवात. धन्स...!
-दिलीप बिरुटे
शीर्षक जाम आवडलं!!
;)
अगदी लायनीत आहे आणि एस भाउंचा प्रतिसाद ही खंगरी.
धमाल..