सांज..
संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली
घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली
गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली
संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली
उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली
पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली
तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..
- प्राजु
वाचने
8845
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा
In reply to वा by विसोबा खेचर
संध्या ....
मस्त
मस्त
सुंदर सांज!
वाह! झकास
अप्रतिम
छान!
सांज ये गोकुळी
छान!
तात्या,
प्राजु ताईंची माफी मागून....
वा