जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !
जॅक डॅनियल्स
१८५७ च्या उठावाच्या ७ वर्ष आधी याचा टेनसीमध्ये एका खेडेगावात (लिंचबर्ग) झाला. फारच मोठे कुटुंब आणि गरिबी त्यामुळे जेडी वयाच्या ७ वर्षापासूनच टेनसी ची देशी दारू -मूनशाईन बनवायला लागला. दिवसा बनवली तर धार्मिक लोक मारतील म्हणून ही दारू चंद्र प्रकाशात बनवली जायची.
ही मूनशाईन बनवायची जुनी पद्धत - लाकूड टाकून भट्टी पेटवली जायची .
जेडीचा गुरु म्हणजे त्याचा काका तो तर चर्च मध्ये पाद्री होता. याने जेडीला व्हिस्कीची दीक्षा दिली आणि हा गुरुमंत्र दिला
'सिंहगडावरच्या भजीला ची चव येते ती तिकडच्या देव टाक्यातल्या पाण्यामुळे' तेच तत्व व्हिस्कीला पण लागू होते.
कुठल्यापण व्हिस्की चा आत्मा म्हणजे "पाणी"! आपण लोकं पाण्याला फारच कमी लेखतो पण "ते पाणीच" एकाला जॅक डॅनियल्स बनवते तर दुसऱ्याला मल्ल्या ! जेडीने लिंचबर्ग मध्ये हा झरा शोधला. हे कमी iron असलेले (iron हे ethanol ला ऑक्सिडाइज करते म्हणजे थोडक्यात त्याची चव बिघडवते! ) पाणीच जॅक डॅनियल्सची चव १५० वर्ष राखून आहे.
या झऱ्याचे पाणी आजही वापरले जाते.
झऱ्याच्या समोर जॅक डॅनियल्स !
जशी ताकापासून पियुषची व्युत्पत्ती होते, तशीच मूनशाईनपासून टेनसी व्हिस्की बनते, म्हणजे बेस सम पण फायनल product वेगळे. जॅक डॅनियल्सने त्या साठी दारू distill झाल्यावर कोळश्यामधून फिल्टर केली (म्हणजे टेनसी दारू गाळली, आपली देशी दारू ही कशातून गाळली नाही जात, मोस्टली distil झाल्यावर, देशी पाईप मधून गळत असेल म्हणून आपल्या कडे दारू गाळली असेल म्हणत असावेत!). हा कोळसा पण शुगर-मेपल झाडापासून बनवाला जातो.
हि कोळसा बनवायची भट्टी आहे, जर विकडे मध्ये गेला तर कोळसा बनताना बघू शकतो.
एकाच प्रकारचे आणि त्याच प्रदेशातील झाड कोळसा बनवण्यासाठी वापरल्यामुळे कोळशाची porosity, त्याची adsorption capacity (दारू मधले नको असलेले घटक शोषून चिटकवून ठेवायची capacity ) सारखी राहते.
या जेडी बनायच्या स्टेजेस आहेत, पहिली म्हणजे मूनशाईन, नंतर जशी कोळश्यातून पास झाल्या आणि ब्यारेल मध्ये साठवल्यानंतरची फायनल स्टेज !
Distillary बिल्डिंग जी आतून बघू देत नाहीत.
सुशोभित करून ठेवलेल्या जेडी च्या बाटल्या !
मेपल कोळश्यातून गाळलेली जेडी ही मेपल झाडाच्याच ब्यारेल मध्ये साठवली जाते. जॅक डॅनियल्सची ३-४ ब्यारेल हाऊस आहेत. आझादहिंदच्या सेकंड स्लीपर बर्थ सारखी तीन लेवेलला ही ब्यारेल साठवली जातात. सगळ्यात वरच्या बर्थ किंवा लेव्हलला कोरड्या आणि गरम हवेमुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते (H2O molecule हा C2H5OH ethnaol छोटा आहे.)म्हणून या लेव्हलची व्हिस्की जास्त strong (अल्कोहोल % जास्त असते.)असते आणि लवकर mature होते. सगळ्यात खालच्या लेव्हलला थंड आणि दमट हवा असल्याने हवेतले पाणी ब्यारेल मध्ये जाऊन भेसळ होते. सगळ्यात चांगली व्हिस्की ही मधल्या बर्थ च्या ब्यारेल मधून निघते. जॅक डॅनियल्स distillary टूर मध्ये जुन्या ब्यारेल हाउस ला घेऊन जातात, आत्ता चालू असणाऱ्या घेऊन गेले तर लोकांच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या CO2 मुळे व्हिस्की खराब व्हायची आणि ब्यारेल मधल्या झिरपणाऱ्या दारूमुळे लोक झिंगायची ! (ब्यारेल मधून जी थोडी दारू झिरपली जाते त्याला angel कट म्हणतात. )
ब्यारेल साठवायची बिल्डिंग.
जश्या आपल्या आज्ज्या लोणचे मुरले हे त्याच्या सुगंधावरून आणि चवीवरून ठरवतात, तीच पद्धत जॅक डॅनियल्सने वापरली. जेडी मुरली हे त्याच्या वासावरून आणि चवीवरून ठरवले जाते. (मी नोकरी साठी अर्ज टाकत असताना एक अर्ज केंटकीच्या बर्बन distillary मध्ये analyatical chemist केला होता, त्यांची अट होती की व्हिस्कीच्या gas chromatography टेस्टिंग नंतर चव घेऊन बघावे लागेल :) ) यापद्धतीमुळे १५० वर्ष कधीच जेडीच्या ब्यारेल वर तारीख घातली गेली नाही. जॅक डॅनियल्सला ७ गर्ल फ्रेंड्स होत्या म्हणून त्या व्हिस्की ला "ओल्ड नंबर सेव्हन" पण म्हणले जाते.
ओल्ड नंबर सेव्हन चे ब्यारेल !
लिंचबर्गचा तालुका म्हणजे "मूर तालुका ", त्या मूर मध्ये दारू (हार्ड लिकर) विकायला परवानगी नाही. म्हणून लिंचबर्गसाठी "जिकडे पिकते तिकडे विकता येत नाही" असे म्हणायला लागेल. (मी ज्या गावात होतो -कुक्व्हील मध्ये पण २०१२ पर्यंत दारू विकायला परवानगी नव्हती, आम्ही १५ miles वर taxi करून जाऊन विंटरसाठी साठा भरून ठेवायचो. नंतर २०१२ ला माझे लग्न झाले आणि त्याच वर्षापासून कुक्व्हील मध्ये दारू विकायला परवानगी मिळाली--- चांगले योग येतात ते असे !) लिंचबर्ग मध्ये प्रत्येक घरटी २-३ मानसं जॅक डॅनियल्स distillary मध्ये कामाला आहे.
Jack Daniels Town Video
गावातले जुने एक दुकान आहे.
गावातले जुने कोर्ट.
मला दिवसाची सुरवात लवकर करायला आवडते, तसाच हा जॅक डॅनियल्स होता. एका अश्याच सकाळी जॅक डॅनियल्स स्वतःची तिजोरी उघडायची खटपट करत होता पण काही केल्या त्याला कोड आठवत नव्हता अश्या वेळी मी जे केले असते तेच त्याने केले तिजोरीला लाथ घातली (लाथ घालणे हा कॉम्पुटर रीबूट करण्यासारखा univarsal पर्याय आहे.) नंतर "उपचार न केल्यामुळे" त्याचा पायाला infection होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याने infection थांबवायला स्वतःची जेडी जरी वापरली असती तरी वाचू शकला असता, पण असो !
एखादा ब्रान्ड कुठे चालू होतो याला महत्व नसते तर त्याची क्वालिटी कशी वर्षानुवर्षे कशी राहते तेच जास्त महत्वाचे जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !
(सगळे फोटो मी काढले आहेत - samsung galaxy S6 वरून ) In reply to आपणांस इथे पाहून आनंद झाला. : by आदूबाळ
In reply to मस्त लेख.. चारकोल नाकात by गवि
In reply to मस्त ओळख करुन दिलीये! by अजया
In reply to मस्त ओळख करुन दिलीये! by अजया
In reply to खुद्द पुण्यात असताना जॅक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ज्या बार मध्ये प्यायचो तिकडे by जॅक डनियल्स
In reply to चियर्स ब्रदर, एन्जॉय सेफली by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चियर्स ब्रदर ! बाहेर पडणारा by जॅक डनियल्स
In reply to नाही नाही बर्फाचा दगड नाही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नाही नाही बर्फाचा दगड नाही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर by अप्पा जोगळेकर
In reply to अमेझॉन वर आहेत की अप्पा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ३५०-५००० प्राईज रेंज आहे, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to "व्हिस्की क्युब" किंवा "वाईन by मोदक
In reply to चाखलाय हा प्रकार लै म्हणजे by महासंग्राम
In reply to पण अल्कोहोलचा गोठणबिंदू by आदूबाळ
In reply to नीट नाही वापरत काहीतरी कॉकटेल by महासंग्राम
In reply to पण अल्कोहोलचा गोठणबिंदू by आदूबाळ
In reply to पण अल्कोहोलचा गोठणबिंदू by आदूबाळ
In reply to आबा तुम्हीपण व्हर्नियन काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to पण अल्कोहोलचा गोठणबिंदू by आदूबाळ
In reply to खुद्द पुण्यात असताना जॅक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to स्पाय साईड किंवा आईल साईड स्पिरिट्स by अनिरुद्ध.वैद्य
In reply to बाबौ, म्हातारा बुडा (ओल्ड by कैलासवासी सोन्याबापु
In reply to खराय by अनिरुद्ध.वैद्य
In reply to ज्जे बात !! खुद्द जावईबुआ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to भारी बेत हो देवा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to हा चितळेंचा अपमान आहे. by मारवा
In reply to भावना समजल्या गेल्यात ! by जॅक डनियल्स
In reply to ओह!! ही होय ती मुनशाईन!! टोटल by पिलीयन रायडर
In reply to मुनशाईन फक्त जेडी बेस by कैलासवासी सोन्याबापु
In reply to खरे आहे ! ! by टिवटिव
In reply to गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण by जॅक डनियल्स
अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% )जेडी वर लिहिलेलं १०० प्रुफ म्हणजे काय आणि अल्कोहोलचे प्रमाण कसे ठरवतात.
In reply to अल्कोहोल चे प्रमाण पण कमी by महासंग्राम
In reply to गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण by जॅक डनियल्स
In reply to ओह!! ही होय ती मुनशाईन!! टोटल by पिलीयन रायडर
In reply to माझी मात्र JD चा छोटा भाऊ जिम by संपत
मूनशाइनचा उगमही कळला. जिथे जेडी, तिथे मूनशाइन!- अजयाताईंशी १०००% सहमत. एक खास पुणेकर प्रश्न (पुण्यात राहत नसूनसुद्धा) मनात आला - 'बाकरवडी संपली'प्रमाणे 'जेडी संपली' असा बोर्ड (इंग्लिशमध्ये) दिसला काय हो? आता माझा आयडी 'ओल्ड माँक' असा बदलून घ्यावा असा विचार करतोय.
In reply to छान लेख. by सुधांशुनूलकर
In reply to तिकडे लिंचबर्ग जेडी विकत by जॅक डनियल्स
In reply to ही दारू कशाची बनवतात ?कॅार्न? by कंजूस
In reply to कॅार्न पासून अमेरिकन व्हिस्की by जॅक डनियल्स
In reply to आहाहा by ट्रेड मार्क
In reply to (No subject) by कैलासवासी सोन्याबापु
In reply to (No subject) by कैलासवासी सोन्याबापु
In reply to क्या बात है! by वेल्लाभट
In reply to नेसीत चार वर्ष काढलीत जॅझ by माझीही शॅम्पेन
मस्त ओळख आणि फटू!!