मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनाच्या खिशात...

संदीप डांगे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
समर्थकांच्या देशात सर्वत्र मंगल वातावरण आहे, प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे, देशप्रेमाची लाट आहे, विजयाचा जयघोष आहे! विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे, अराजक माजलय, लोक मरत आहेत, पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत, सर्वत्र फक्त आक्रोश आहे! आपण आपलं चाचपून बघावं, खिशात किती कॅश आहे, मनात किती संतोष आहे, किती असंतोष आहे!

वाचने 1801 वाचनखूण प्रतिक्रिया 9

पैसा Tue, 11/15/2016 - 09:11
आपण सगळेच सामान्य लोक. भाषणं करून भांडणं लावणारे तिकडे एकत्र पार्ट्या करतात न तुम्ही लोक इथे एकमेकांच्या उरावर बसता समर्थक आणि विरोधक म्हणून एकामेकाना शिव्या देत.