मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५ मन्याचा व्हाटसपवर मेसेज ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते. . अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे. च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही. खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त. रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला. जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण. जास्त विचार करण्यात अर्थ नाही. . रात्री कन्फर्म मिळाली बातमी. वाचून निवांत झोपलो विचार न करता. . दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या. . रस्त्यातून येताना पाहिले. बँकासमोर जत्रा भरलीय. गर्दीशी आपली सख्त नफरत. मुदत पण आहे भरपूर. बघता येईल नंतर. . लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते. टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही. आज परगावचा चक्क फोन. पाठव रे रिसिट घेऊन. देतो पेमेंट. नेहमी अर्धे चेकने अर्धे कॅश देणारा भाद्दर शुअर ५०० चा गट्ठा देणार. अजून असेच तीन चार कॉल. देऊ दे. सीए दोस्त म्हणलाय. घे बिनधास्त. लगेच बँकेत भर मात्र. . माझ्या हपिसात कामाला चक्क ईश्वर आहे. म्हणजे नावच त्याचे ईश्वर. ईश्वर निघालाय. त्याला प्रवासाला द्यायला सुट्टे नाहीत माझ्याकडे. इकडून तिकडून करुन जेमतेम दिलेत. . दुपारी चहा प्यायचे वांदे. ४०० चे पेट्रोल भरले. १०० वापस मिळाले. दिवसभर नेमका कामाचा लोड. डोकं फिरण्याइतपत कामे. नवीन कामे अ‍ॅडव्हान्ससहीत येताहेत. मज्जाय. त्या खुशीत उगीच मेसेज एंजॉय केले. एकही फॉर्वर्ड नाही केला. रात्र होऊ लागली तसे डोके जाम होतंय. ईश्वर वसूलीला गेला तिकडं इलेक्षन चालु आहेत. त्याची वेगळीच चिंता संध्याकाळी आला बंडले घेऊन. रुमालात गुंडाळून बॅगेत ठेवले लॅपटॉपच्या. त्याला सोडले घरी. . अक्काबाई का आठवू नये. शकीलला फोन केला. "शकल्या ९० पायजे बे, आणि..." "या मालक, माहीती आहे पुढचे. देतो उरलेले चिल्लर" . बारमध्ये प्रत्येक टेबलावर तीच चर्चा. सायराबानूची गाणी बघत बघत नाईन्टीची क्वार्टर झाली. एक मोट्ठी देऊन देऊन, शंभराच्या थोड्या घेऊन बाईक हलवली. . पुढचे मला आठवत नाही. मी घरी कसा आलो. दीड कीमीवर तर बार. मोकळाय रस्ता. मी घरातल्या खुर्चीवर आहे. कधी बसलो येऊन? बॅग आहे जागेवर. रुमाल उघडा पडलाय बॅगवर. पैसे? नाहीत बॅगेत. आक्क्खी उलटी पालटी केली. कपड्याच्या खिशात? कुठला होता बाबा ड्रेस? सगळे चेक केले. नाहीत. जॅकेटात? नाहीत. वॅलेटात? एवढे बसणे शक्यच नाही. तरी गायब सगळे. . मधल्या एक दोन तासभरासहीत पैसे गायब आहेत. ज्यात बांधले तो रुमाल आहे. पैसे नाहीत. आकडा मोट्ठाय. दुनिया फिरली घप्पकन. सध्या तर एवढा फटका खायची ताकद नाही. नोटा जरी बंद झाल्यात तरी त्या भरता येणार आहेत आप्ल्याला. आपल्या कामाचे पैसे आहेत ते. पण आता आपल्यापाशी नाहीत. . घर तर आतून प्रॉपरली बंद आहे. बाल्कनी बंद आहे. बाहेर गेटला कुलूप लावलंय गाडी नेहमीप्रमाणे सेंटरस्टँडला लावलेली आहे. मी घरी येऊन शूज कधी काढले? अंगावरचे कपडे कसे बदलले गेलेत? च्यायला.. भुताटकीच. . काय केले दीडेक तासात मी? डोके दुखायले. काही आठवेना. फोन बंद आहे. कसा काय? लास्ट कॉल....शकील. . दि. १० नोव्हेंबर २०१६ वेळ रात्री. १२.४५ "शकील, भाई. एक प्रॉब्लेम झालाय यार" "बोला की मालक, आत्ता जेवायलो बघा. अजून पाहिजे का?" "नाय बे. माझे बंडल पडलेय का हॉटेलात बघतो का जरा." अर्ध्या तासाने शकीलचा नकार. "नाही ओ इथे काही." "बघ यार, मोट्ठी अमाउंट आहे माझ्यासाठी." "नाही ओ, तरी सकाळी परत चेक करतो" . काय म्हणू? दारुच्या नशेत पडले पैसे. इतके? लैच फालतूपणा झाला. औकात नाही धंदा करायची राव. इतक्या वर्षात एक नवा रुपया हरवला नाही आपल्याकडून. इतका मोट्ठा आकडा. चक्क हरवले. मिळणे शक्य नाहीच म्हणा. लै प्लान्स बदलावे लागतील. एवढा मोठा बफर नाही आपला. . परत बाईक काढली. १० च्या स्पीडने तीन चकरा झाल्या त्या रोडवर. काही मागमूस नाहीये. रस्ता नेहमीप्रमाणेच सुना. डोकं आता हळूहळू रिकामं होतंय. . पूर्ण ब्लँक आता मेंदू. शांत बसणे एकमेव पर्याय. रिवाइंड होतंय बहुधा. हळूच आठवतेय दार उघडताना हेलमेट पडल्याचं. मग काय केलं मी? तिथेच शूज काढले. आत आलो, लाईट लावली. बॅग कशी ठेवली? अर्रर्रर्र... नोटा ठेवलेला रुमाल काढलेला मीच बाहेर. नोटा कुठे ठेवल्या? तीन चार विस्कळीत गट्ठे होते. सीडीएमला भरावे लागतील म्हणून सरळ करुन ठेवायला पाहिजेत. पेपरच्या गट्ठ्याखाली आपण तर ठेवले. . आहेत का तिथे? हो. जसे ठेवले तसेच. शकल्याला मेसेज केला. सापडले रे भावा. सॉरी त्रास दिला रात्री. शकल्या म्हणला ओके साह्यबा. . मुद्दा काय....दारु वाईट. कामाच्या टायमात तर लैच वाईट. आधी प्यायचोच की. एकाच वेळी इतके नसायचे पैसे खिशात. आधी कधी इतकी चढलेली आठवत नाही. आजच कस्काय? टेन्शन.. टेन्शन....बाकी काय नाय. ह्यापुढे मापात. खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता. पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे. दरवाजा लावून पिणे. सकाळी शांतपणे कामाला लागणे. . बाकी काही म्हणा... मोदीकाका हुशार. शिस्तीत वाजवली गेम. यंदा लोन इंटरेस्ट कमी झाला, प्रोसेस इझी झाली तरी बरंय. काय नाय, निदान चेक आणि कार्डं बाळगायची सवय लागली तरी बरंय. . हवीय कुणाला कॅश ढिगभर नोटात? . (शुध्दीवर असताना लिहिलेली सत्यकथा)

वाचने 7759 वाचनखूण प्रतिक्रिया 26

अन्नू Sat, 11/12/2016 - 19:55
शिर्षक वाचून वाटलं दारु भेटली नाही की काय ;) नंतर वाटलं पैसे हरवले की काय निम्म्याच्या पुढे वाचून जरा स्टन्न झालो मग शेवट वाचून हुश्श झालं. अच्छा.. असं झालं होतं तर सगळं! तात्पर्य: दारु लै वाईट्ट ;) =)) =))

In reply to by सतिश गावडे

नाखु Mon, 11/14/2016 - 11:06
का चौकश्या करतेत तेच कळेना, तो काय गड आहे का (देखणी) लेणी ? बाकी लेख भारी है ! या निमित्ताने उधारी वसूल झाली पुणे मनपा सारखी तर आनंदच आहे. बाकी "अच्छे दिन आले का? " त्यांनी हा लेख वाचावाच.

संजय पाटिल Sun, 11/13/2016 - 12:02
स्टोरी भारीच.. पण-
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या. . रस्त्यातून येताना पाहिले. बँकासमोर जत्रा भरलीय. गर्दीशी आपली सख्त नफरत. मुदत पण आहे भरपूर. बघता येईल नंतर.
... ९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये?

In reply to by संजय पाटिल

अन्नू Sun, 11/13/2016 - 12:23
९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये? =)) =)) सही पकडे है ;)

झेन Sun, 11/13/2016 - 16:16
मस्तच लिवलय. "लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते. टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही" हे झकासच. ......... .... ... न पिता सुध्दा कधीकधीअसल्या अनुभवातून गेलेला झेन.

अभ्या तुला दोस्तीची आण, डोक्यात विचार असताना एक थेंबही घ्यायची नाही. Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety. इतके लक्षात ठेव. बाकी टेबलावर बसून बोलू :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम Mon, 11/14/2016 - 10:17
बाप्पू मले बी बोलोजा चकणा खायला.लैच आवडते आपल्याले चकणा. सगळं कसं आंदो असतं. बाकी, अभ्या सेठ आपके बारे में क्या लिखणा. जबरदस्त लिवलंय लगा !!!. अल-खराब अगदी.

झेन Sun, 11/13/2016 - 17:40
ज्जे बात "Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety." असं अधिकारानी सांगणारा दोस्त सगळ्यांना मिळो.

तुषार काळभोर Sun, 11/13/2016 - 18:19
ह्यापुढे मापात. खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता. पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे. दरवाजा लावून पिणे. सकाळी शांतपणे कामाला लागणे. याच्यासाठी लौ यू!!

वरुण मोहिते Tue, 11/15/2016 - 19:21
चांगला लिहिलंय ..होताय ऐसा. नेहमीच भान ठेवावं लागत म्हणून. एकदा तर मी फोर्ट वि.टी ला गाडी कुठे पार्क केली हेच आठवत नव्हतं. बराच वेळ झाला आठवेना .कारण त्यानंतर आम्ही १० ठिकाणी फिरलेलो दुसऱ्या गाडीने .नशिबाने मित्राकडे राहणार होतो वरळीला रात्री कधीतरी आठवलं मग सकाळी उठून घेतली गाडी . बाकी वर सोन्याबापूंचा सल्ला नेहमीच कामाला आहे सगळ्यांना .