मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ब्लॉग दुवा शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच. आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो. शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे योगेश जाधव, राहुल राऊत, संतोष शिगवण यांनी या गीतासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. सुधारित लिंक - आता फाईल ओपन व्हायला हवी शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत गीत : अपूर्व जयंत ओक गायक : नंदेश विट्ठल उमप संगीत : राहुल रमेश राऊत आणि योगेश जाधव रुद्राचा अवतार हा शिवरुद्राचा अवतार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार गणरायाच्या कृपेने होते सारे साकार शिवशंभूची शक्ती करते ह्रदयांवर संस्कार ऐका ही ललकार ही तरुणाईची ललकार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार नाही जोश वरवरचा हा खेळ नसे फक्त या धमन्यांतून वाहते शिवभक्ताचे रक्त गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार आमची निष्ठा आमची श्रद्धा आमचे शिवरुद्र तुमचे कौतुक तुमच्या टाळ्या तुमचे शिवरुद्र तालाची ही भाषा बोलणारे शिवरुद्र मानाची ओळख आम्हा देणारे शिवरुद्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आम्ही वारसदार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार याच प्रकल्पासाठी एक आणखी काव्य लिहिलं होतं जे आता सार्वजनिक करायला हरकत नाही. अधोरेखित अक्षरांवर ठेका धरावा a sr

वाचने 7174 वाचनखूण प्रतिक्रिया 25

In reply to by नाखु

खटपट्या Wed, 11/09/2016 - 19:29
नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ अख्यानवाले विठ्ठल उमप यांचे सुपुत्र. abcd वेल्लाभट यांचे अभीनंदन. ऑडीयो लींक न उघडल्यामुळे गाणे अजून ऐकु शकलो नाही.

चांदणे संदीप Wed, 11/09/2016 - 18:41
जबरदस्त रचना! सर्व सहभागी ढोल-ताशा वादकांना स्फूर्ती देत असेल यात शंकाच नाही! ...इथे येऊन जरासा अडखळलो.
गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार
क्रिटिसाईज करत नाहीये पण, म्हणजे बघा, हे शब्द इतके मनात रुतून बसलेत, आदरणीय कुसुमाग्रजांच्या "गर्जा जयजयकार क्रांतिचा" या कवितेचे शीर्षक व ध्रुवपद असलेले हे शब्द अगदी उसने आणल्यासारखे वाटले! बाकी, ती ऑडिओ लिंक अजून ऐकायला मिळाली नाहीये पण ऐकायला नक्कीच आवडेल! आणि,
आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो.
याबद्दल अभिनंदन! Sandy

In reply to by चांदणे संदीप

वेल्लाभट Wed, 11/09/2016 - 19:43
सर्वात आधी सूचनेचा स्वीकार करतो. भविष्यात नक्कीच हे टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद. :) आता लिंक बदलली आहे. उघडेल आता फाईल.

मोदक Wed, 11/09/2016 - 21:39
गीत झकास.. एकदम भारी..!!! फक्त ताशांचा कडकडाट जरा जोरात हवा होता, किंवा कदाचित सगळे एकदम बरोबर असेल पण ढोल ताशा पथकाचे गीत असल्याने मला ढोल ताशांचा भारदस्त आवाज अपेक्षित असल्याने असे मत झाले असावे.