मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

टवाळ कार्टा · · भटकंती
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे तारीख - ३१ ऑक्टोबर वेळ - सकाळी १० वाजता ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ) अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :) ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

वाचन 31925 वाचनखूण प्रतिक्रिया 104

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड गुरुवार, 10/27/2016 - 16:18
तुमच्या टायपो मुळे धाग्याला भरभरुन प्रतिसाद मिळोत हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! =))

पैसा गुरुवार, 10/27/2016 - 22:52
मजा करा! वृत्तांत लिहायला विसरू नका. पण धाग्यात काय थ्रिल नाय ब्वा. छे:! पूर्वीचं मिपा र्‍हायलं नाय!

In reply to by माझीही शॅम्पेन

सुबोध खरे Sat, 10/29/2016 - 20:00
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत. यात शलभ आणि वरून मोहिते यांनीही येणार असे कळवले आहे. सकाळी बायको कडून मालिश बिलीश करवून घ्या आणि मग या.

In reply to by सुबोध खरे

यशोधरा Sat, 10/29/2016 - 20:04
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, सुबोध खरे - Sat, 29/10/2016 - 20:00 मी, डॉ.खरे,
तुम्ही स्वतःचा उल्लेख मी, डॉ. खरे असा करता? =))

In reply to by यशोधरा

प्रचेतस Mon, 10/31/2016 - 11:48
पुणेकरांनी निदान सर्वाना वैयक्तिकरित्या फोन करून कळवलं होतं कट्टा कॅन्सल म्हणून. मुंबईकरांमध्ये निदान तितकेही सौजन्य दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

पाडव्याचा जोरदार रगडा पडलेला दिसतो म्हणुन "विसावा" घेत असावेत. कट्टा पुण्यालाचं होउ शकतो. ठाणे बिणे सब झुठ. (इनोपुडी) कॅजॅस्पॅ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बोका-ए-आझम Mon, 10/31/2016 - 17:51
अाणि तोही एका अामंत्रणाच्या धाग्यावर. उगाच मुंबईला नावं ठेवू नका.

In reply to by बोबो

टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 14:05
आरारा, ठाण्यात २ मेतकूट आहेत, एकमेकांपासून २ मिनिटांच्या अंतरावर, कट्टा घंटाळी मंदिराच्या समोरच्या मेतकूटमध्ये झाला

In reply to by प्रचेतस

नाखु Mon, 10/31/2016 - 16:23
और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही? मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला

In reply to by टवाळ कार्टा

कपिलमुनी Mon, 10/31/2016 - 18:00
कोण पुणेकर ? पिंचिचे कट्टे सर्वाअत फाश्ट होतात , कदीपन आव्वाज द्या ! १० टाळकी गाड्या काडून येत्यात -----------------------------------------------------------

In reply to by टवाळ कार्टा

नाखु Tue, 11/01/2016 - 13:19
तू कधी पासून स्वतःला भूत सम्जायला लागलास ते ? मुनीवर, आपली बिब्बा असलेली काळी बाहुली तयार आहे तू नाहीतर मीसौरभ घेऊन जा.

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा Mon, 10/31/2016 - 18:04
टक्कू मक्कू शोनू, नाखुंनी म्हटलेय का तसे काही? उग्गा आपलं कायतरी, मेन पॉईंट बा़जूलाच आणि.. =))

In reply to by प्रचेतस

नाखु Mon, 10/31/2016 - 16:24
और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही? मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 19:06
क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या कट्ट्यांना मिपाकर उत्साहाने २-२ दिवस येतात, पुण्यात तर ठरलेल्या दिवशी येतो असे सांगून ऐनवेळी टांग मारतात

बोबो Mon, 10/31/2016 - 22:21
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ Mon, 10/31/2016 - 22:31
अरे पण एकालाही दोन मिनिटांवरच्या दुसर्‍या मेतकुटात जाऊन अन्य चुकल्या कट्टेकर्‍यांना शोधून आणावं असं वाटलं नाही का?