भारतीय सैनिक
लेखनविषय:
भारतीय सैनिक
राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...
शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र..
भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र..
स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा..
तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा..
युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...
जीव हरवतो गर्व मिरवतो देशभक्त तो हिंदू..
नभी गरजतो फक्त समजतो शिवस्वराज्य शिवसिंधू..
विश्व विसरतो जगी पसरतो स्वतंत्र हिंदवी जीत..
रयत सुखवितो भाग्य पिकवितो स्मरितो राष्ट्रगीत..
ग्रिष्म शिशिर वर्षा तो भोगतो भगवे रक्त सांडत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत....
वाचने
2784
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
योगायोग...
In reply to योगायोग... by चांदणे संदीप
असेच म्हणतो!
In reply to योगायोग... by चांदणे संदीप
धन्यवाद
नयन दाटूनि अश्रू वाहति
अजिबात नाही आवडली, कवितेतले