मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली. २००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला. डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा. आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला, "She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter." म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ? "होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता." "त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?" "तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो." श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)

वाचने 20298 वाचनखूण प्रतिक्रिया 102

In reply to by गामा पैलवान

श्रीगुरुजी Fri, 10/21/2016 - 15:16
११ सप्टेंबरच्या एका कार्यक्रमात हिलरी कोसळली आणि कायमची गचकली. सध्या दाखवतात ती तोतयी आहे. तोतयीचे दात आणि नाकाचा शेंडा साफ खऱ्या हिलरीपेक्षा वेगळा आहे. तिचं नाव तेरेसा बार्नवेल असून ती हिलरीची तोतयी बनून भरपूर पैसे कमावते.
ही ब्रेकिंग न्यूज सनातन प्रभातच्या अंकात आलेली दिसतेय.

In reply to by गामा पैलवान

पिलीयन रायडर Fri, 10/21/2016 - 18:10
काहीही.. तिचा फोटो पाहिलात का? अर्ध्या क्षणात कळतं की ही बाई हिलरी नाही. म्हणजे मुळात मला तर ती हिलरी कधीच वाटली नाही. टोटली वेगळ्या दोन बायका आहेत ह्या.

In reply to by गामा पैलवान

रमेश आठवले Wed, 10/26/2016 - 20:03
Irving Wallace यांच्या The second lady या कादंबरीत रशियाची गुप्तहेर संस्था तत्कालीन अमेरिकन अध्यक्षांच्या पत्नीचे अपहरण करून तिच्या जागी तीची हुबेहूब प्रतिकृती असलेली त्यांची गुप्तहेर आणते. अमेरिकेच्या अध्यक्षाला सुद्धा ती प्रतिकृती असल्याचे कळत नाही असे वर्णन कादंबरीत आहे. http://www.goodreads.com/book/show/585539.The_Second_Lady

मराठी कथालेखक Fri, 10/21/2016 - 18:40
पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं होतं की हिलरी आणि बिल यांनी मिळून अनेक लोकांचे खून करवलेत. त्याबद्दल कुणी अधिक माहिती देईल का ?

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान Sat, 10/22/2016 - 02:11
मराठी कथालेखक, हिलरीचा ताजा बळी डॉक्टर संदीप शेरलेकर. बहुधा मराठमोळा आहे. :राग: :वैफल्य: :चीड: आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विशाखा पाटील Sat, 10/22/2016 - 11:40
आत्महत्येचे डिटेल्स या बातमीत आहेत- http://www.fredericknewspost.com/news/crime_and_justice/cops_and_crime/frederick-police-investigating-death-of-doctor-accused-in-kickback-scheme/article_cd45da36-c86b-5fbb-b43d-1a81c4990cec.html

गामा पैलवान Sat, 10/22/2016 - 02:02
संदीप डांगे,
एकता कपूरची सिरीयल आहे का?
हो. ठिकठिकाणी धडपडत, कोलमडत आणि ठेचकाळत चाललेली हिलरी ११ सप्टेंबरनंतर अचानक बेडकावाणी टणाटणा उड्या मारू लागली. हा केकता कपूर इफेक्ट म्हणायला हवा ना? ९११ नंतर एकदाही कोसळली नाही. मोठी अजब घटना नाही काय? आ.न., -गा.पै.