मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील

बबन ताम्बे · · मिपा कलादालन
smita

वाचने 40569 वाचनखूण प्रतिक्रिया 63

तिमा गुरुवार, 11/20/2014 - 19:25
तुमची पेन्सिल शेडिंगची चित्रे छानच आहेत. माझा एक मित्र आहे, पेन्सिल शेडिंगमधे त्याची मास्टरी आहे. ओकेंचा वारसदारच म्हणा ना! त्याच्या परवानगीने त्याचे एक चित्र देत आहे. आवडल्यास आणखी शेअर करीन. Einstein

In reply to by तिमा

खटपट्या Sat, 11/22/2014 - 03:22
ही थोडी वेगळी पद्धत आहे. शेडींग पेक्षा बारीकबारीक रेघांनी हे साकारले जाते. जीथे डार्क शेडींग हवे आहे तीथे दाट रेघांच्या चौकटी आणि जिथे लाईट शेडींग हवे आहे तीथे विरळ रेघा असे. बराच वेळ लागतो. फार पुर्वी जेव्हा वर्तमानपत्रे फक्त क्रुष्ण धवल रंगात छापली जायची तेव्हा त्यात फोटो छापताना फोटोचे टाईपसेटींग करावे लागायचे. ज्यामुळे फोटोचा ठोकळा बनवणे शक्य व्हायचे. आणि मग त्या ठोकळ्याला शाई लावुन चित्र कागदावर छापले जायचे. त्याप्रकारचे काम आहे हे.

In reply to by खटपट्या

राघव Wed, 09/20/2017 - 08:18
शेडींग पेक्षा बारीकबारीक रेघांनी हे साकारले जाते. जीथे डार्क शेडींग हवे आहे तीथे दाट रेघांच्या चौकटी आणि जिथे लाईट शेडींग हवे आहे तीथे विरळ रेघा असे. ह्याला क्रॉस हॅचिंग म्हणतात. बरंच निगुतीचं काम आहे. पण कालांतरानं फेड होत नाही, त्यामुळे बरेच जण ही पद्धत वापरतात.

स्मिता पाटील ह्या धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या! त्यांचे वडील मोठे नेते होते, आज रपट जाये तो असे अमिताभ सोबतचे गाणे झळकले होते तेव्हा त्या नेते साहेबानी थिएटर जाळून टाकले होते अशी कथा मी लहानपणी एकली होती!

चौथा कोनाडा Tue, 04/01/2025 - 19:07
दिवंगत स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक याने त्याचं नाव अधिकृतपणे प्रतिक बब्बरचं प्रतिक स्मिता पाटील असं केलं आहे. त्याचा सावत्र भाऊ आर्य बब्बर आणि पुर्ण बब्बर कुटुंबियांशी बिनसलं आहे म्हणून हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. या निमित्ताने स्मिता पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे !

In reply to by चौथा कोनाडा

स्मिता पाटील ह्यांनी मुलाचे नाव प्रतिक ठेवल्यामुळे त्या काळात हे नाव बरेच प्रसिद्ध झाल्याचे ऐकून आहे. त्यावेळी जन्मलेल्या बहुतेक मुलाना हे नाव देण्यात आले!