मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप

परिधी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

वाचने 1871 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रसाद_कुलकर्णी 06/10/2016 - 15:27
डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...

दिनु गवळी 09/10/2016 - 05:36
वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार