कोल्हापूरला काय पाहावे
4 दिवसांकरिता फॅमिली बरोबर कोल्हापूरला जायचे आहे. या विषयावर आधीच धागा असल्यास सांगा किंवा कोल्हापुरात राहण्याची / जेवण्याची / पहाण्याची / खरेदीची ठिकाणे सांगा प्लीज
वाचने
11512
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
थोडीफार मदतः
http://www.misalpav.com/node/31536
जगात भारी कोल्हापुरी ... कोल्हापुरचा नाद खुळा .. काटा किर्ररर . कोल्हापुरबद्दल बरीच माहिती विकिवर आहे.
पापाची तिकटी इथे कोल्हापुरी "कर कर" आवाज करणा-या चपला मिळतात . अभ्यंकर यांचे दुकान खात्रीचे आहे .
सोळंकी यांचे हॉटेल आइसक्रीम , मिल्कशेक , ज्युस साठी प्रसिद्ध आहे . मिसळ साठी चोरघडे .
राजारामपुरी इथे प्रसिद्ध अभिनेते / चित्रकार कै. चंद्रकांत यांच्या चित्रांचे प्रदर्शन त्यांच्या "निसर्ग" या बंगल्यामध्ये आहे .
महालक्ष्मी मंदिर , पन्हाळा , म्युझीअम , खासबाग मैदान अशी इतर ठिकाणे आहेत .
हे पहा ज्योतिबा , महालक्ष्मी मंदिर , रंकाळा तलाव (तिथली भेळ) , पन्हाळा , वाडीच मंदिर , शक्य असल्यास खिद्रपुर मंदिर
कणेर मठ आवर्जून पहा , बारा बलुतेदार आणि ग्रामीण जीवन अतिशय सुंदर दाखवल आहे , ३/४ तास सहज जातात
धार्मिक : अंबाबाई मंदिर , ज्योतिबा , नृसिंहवाडी , खिद्रापूर , गगनगिरी , बाहुबली
ऐतिहासिक : पन्हाळा , न्यू पॅलेस , राधानगरी , खासबाग
मनोरंजन : सिद्धगिरी , रंकाळा , DYP मॉल (सबवे , मॅकडोनाल्ड, इतर ब्रॅण्ड्स आणि PVR इ. करिता) , गंधर्व रिसॉर्ट , केंट क्लब
राहण्यासाठी : सयाजी , सिट्रस , के ट्री
खाण्यासाठी : फेसबुकवर Kolhapur Eateries नावाचे पेज आहे ते पाहावे.
खासबाग, रंकाळा, राजाराम काॅलेज, हुपरी, फडतरे मिसळ, पन्हाळा, ताराबाग, केशवराव भोसले नाट्यमंदिर, आणि पांढरा-तांबडा. एवढं पुरे की अजून हवंय काही?
बावडा मिसळ आणि फक्कड चहा...
कावळा नाक्यावर देहाती मधे जेवा
हॉटेल पद्मा (मटण, चिकन)
ओपल (मटण, चिकन, मासे)
वामन (मासे स्पेशल)
गोकुळ (शाकाहारी)
फडतरे मिसळ, विद्यापीठाजवळील बटाटावडा, कट-वडा, पोहे, उप्पीट, साबुदाणा खिचडी, भेळ, सोळंकी आईसक्रीम
रत्नागिरी रोडवर (कोल्हापूरहुन साधारणतः १० किलोमीटर्स) जाताना उजव्या हाताला 'हॉटेल ग्रीन पार्क' (मटण, चिकन, मासे - ढाबा स्टाईल)
गिफ्ट आर्टिकल्स साठी 'गणेश आर्ट' स्टेशन रोड
In reply to जिव्हेचे आणि पोटाचे भयंकर लाड करायचे असतील तर ........ by एस.योगी
पद्मा , ओपल , फडतरे ही पूर्वी हाईप झालेली आणि सध्या भंगार हॉटेल आहेत. वामन आणि गोकुळ क्वालीटी बऱ्यापैकी टिकवून आहे ।
मंगळवार पेठेतील रामदूत , दौलत ची खानावळ चवीची आहे
In reply to कोल्हापूरचे आहात का ? by कपिलमुनी
पद्मा , ओपल , फडतरे ही पूर्वी हाईप झालेली आणि सध्या भंगार हॉटेल आहेत.
100% सहमत. फडतरे कडे मिसळ खाण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रात कुठल्याही टपरीत घुसून मिसळ खा फडतरे पेक्षा नक्कीचं उत्तम मिळेल.In reply to जिव्हेचे आणि पोटाचे भयंकर लाड करायचे असतील तर ........ by एस.योगी
+11111
जयहिंद - बिर्याणी स्पेशल
मिलन - कांदाभजी
ऑल इंडीया स्पेशल भेळ
In reply to वरील लिस्टीत नसलेली खादाडी.. by संजय पाटिल
धन्यवाद !
दरवर्षी कोल्हापूरला न चुकता येणे होतेच. (१९८८ पासून)
प्रत्येक वेळी नवीन शोध सुरूच असतो.
वरील ठिकाणी १-२ दिवस आणि नवीन शोधलेल्या ठिकाणी १ दिवस असा क्रम असतो.
तुम्ही सुचविलेल्या ठिकाणांना यावेळी आवर्जून भेट द्यावीच लागणार..
ओपल बिलकुल नै आवडल.
In reply to ओपल बिलकुल नै आवडल. by त्रिवेणी
पुढचा वेळी देहाती ट्राय करा
In reply to + 1 by कपिलमुनी
आपल भंगार आहे, देहाती उत्तमचं आहे पण पुढच्या वेळी 'पाटलाचा वाडा' ट्राय करून पहा.
In reply to आपल भंगार आहे, देहाती उत्तमचं by गणामास्तर
ओपल फक्त सेल्स मॅनेजर आणि एमार लोकांसाठी आहे.
In reply to ओपल बिलकुल नै आवडल. by त्रिवेणी
अळणी अन बेचव उकडलेलं मटण खाउन पस्तावलोय तिथे.
परख ट्राय करा चांगलं आहे, देहाती सुद्धा चांगलंय ... पन्हाळा किल्ल्यावर असलेलं व्हॅली व्यू ग्रँड च जेवण आणि आसपासचा नजारा जबरी.
चोरगे आणि खासबाग ची मिसळ मला तरी आवडलेली.
चोरगे आणि खासबाग ची मिसळ मला तरी आवडलेली.
चोरगेंची मिसळ अनेक वर्ष चापली आहे, मागे एकदा चापली तेव्हा इतकी आवडली नव्हती, शिवाय पोटात वॉशिंग मशिन चालु झाले ते नंतर थांबवताना मुश्किल झाली होती माझी ! पुर्वीच्या काळातील मसालेदार चव असलेली तर्री चवीस मिळाली नाही, हेच अगदी मोहनच्या मिसळी बाबतीत झाले, त्यांच्या मालकांनाही माझे मत सांगितले ! कुठेतरी काळानुसार वरिजीनल मिसळीच्या तर्रीची चव हरवली आहे असे हल्ली वाटायला लागले आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan
कोल्हापूर म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात. एक म्हणजे महालक्ष्मीचं मंदीर आणि सन्मान हॉटेलमधला कुरकुरीत कव्हराचा खमंग बटाटेवडा आणि सांबार. ती चव अजून कुठेच मिळाली नाहीय.
In reply to कोल्हापूर म्हटलं की दोनच by सूड
सहमत! सन्मान सारखाच कामत चा वडा पण मस्तच..
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल खूप खूप धन्यवाद
थोडीफार मदतः