मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २

अक्षरमित्र · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पहिला भाग येथे वाचता येईल : --------------------------- सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ? मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो. सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल. मी : (मनातल्या मनात आणि प्रत्यक्ष देखील ) : होय होय.नक्कीच. सिनिअरचा सिनिअर : बरं आपली पिढी ऑनलाईन शॉपींगला का घाबरते ? एक तर आपल्या भीती वाटते की आपण अमुकतमुक कार्ट डॉट कॉम किंवा वेरीझोना डॉट कॉम वरुन कपडे मागवले आणि त्याचा रंग गेला तर ? कारण आपल्याला दुकानात जाऊन कपड्याचा रंग, त्याचा पोत फील करायची सवय झालेली आहे. दुसरे म्हणजे माझे क्रेडेंशियल्स चोरीला गेले तर ? माझे बँक अकाऊंट हॅक झाले तर ? म्हणजे कोठेतरी आपल्या मनात असुरक्षितता, पर्सनल टच इ. वस्तूंनी घर केलेले आहे. पण मग बघा, दुकानातून तुम्ही एवढा पारखून कपडा आणता आणि पहिल्याच धुण्यात त्याचा रंग उडतो म्हणा किंवा पोत बिघडतो. मग हाच कपडा एकदा ऑनलाईन घेऊन बघायला काय हरकत आहे ? उद्या तुमच्या मुलाला तुम्ही म्हटले की चल आपण दुकानात जाऊन पिझ्झा घेऊन येऊ तर तो म्हणेल की, पप्पा, ऑनलाईन मागवा ना. कशाला टाईम वेस्ट करताय ? आज आक्खी दुनिया ऑनलाईन गेलीय, ई कॉमर्समुळे कितीतरी व्यवहार सोपे झालेत. आमच्या कंपनीबरोबर तुम्ही जोडले जाल तेव्हा तुम्ही देखील अनुभवातुन जाल. आता माझेच बघा ना, मी आज तुमच्याबरोबर कॉफी पितोय तरी पैसे कमावतोय. मी माझ्या मुलीबरोबर मुवी बघत असेन तेव्हा ही पैसे कमावत असतो. एमी आश्चर्यचकीत झालेला असतो आणि मला काहितरी अदृश्य वस्तू जळत असल्याचा वास येत असतो. सिनिअरचा सिनिअर : बरं मग मला आता सांगा की आमचा व्यवसाय काय असू शकेल ? मी : तुम्ही एवढी महत्त्वाची माहिती सांगीतली पण कंपनीचे नाव नाही सांगीतले म्हणजे नक्कीच तुम्ही 'जॅम वे' वाले असणार. सिनिअरचा सिनिअर लगेच क्षणभर रागाने आणि लगेचच कमावलेले व्यावसायिक हास्य (की निर्ढावलेपणाने) म्हणतो, अहो साहेब, आम्ही काय तुम्हाला साबण, पावडर विकणारे वाटलो काय हो ? मी नम्रपणे होय किंवा नाही यातली कोणतीही खुण वाटेल अशी मान हलवतो. मी : नाही. सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही कदाचित "गप्प बसू नका आशिया" चे प्रतिनिधी असाल. सिनिअरचा सिनिअर : नो. नो. इट वॉज अ टोटल स्कॅम. त्यांच्याकडे काही विकायला नव्हतचं. अहो ऑनलाईन फॉर्म भरुन तुम्ही लाखो करोडो कसे कमविणार ? अहो आमची कंपनी ५०० बिलियन संपत्तीची मालक आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास नका ठेऊ पण तुमच्या मित्रावर तर ठेवाल की नाही. तो तुमचा दहा वर्षांपासूनचा मित्र आहे. तुम्हाला फसवणार नाही याची खात्री आहे ना ? मी : म्हणजे काय. नक्कीच. बरं मग मला असेल ४-५ वर्षात रिटायर व्हायचे तर किती पैसे टाकावे लागतील ? सिनिअरचा सिनिअर : तुम्ही किती इन्व्हेस्ट करु शकता ? मी : नाही मला काही अंदाज नाही. (मित्राकडे वळून) काय रे तु किती टाकलेस ? सिनिअरचा सिनिअर : त्याला तुम्ही मी गेल्यावर विचारा. पण मी सांगतो की मिनिमम २ लाखांपासून सुरु करता येईल पण तुम्ही कमीतकमी ५ लाख तरी टाकाच. मी : पण २ लाख का नाही ? सिनिअरचा सिनिअर : काये की तुम्ही २ लाख टाकणार. मग तुम्ही म्हणणार की ही फारच किरकोळ रक्कम आहे. मग तुम्ही मेहनतीत कमी पडणार. आणी मग कंपनीचे नाव खराब करणार. लक्षात ठेवा, कंपनी खराब नसते. पण काही माणसांमुळे तीचे नाव खराब होते. मी : बरं. मग कंपनीचं नाव तरी सांगा. सिनिअरचा सिनिअर : ते मी गेल्यावर तुमचा मित्र तुम्हाला सांगेनच. मग तुम्ही गुगल करणार. पण लक्षात ठेवा. गुगल तुम्हाला तेच दाखविते जे तुम्ही वाचू इच्छिता. उदा. जर तुम्ही असा सर्च मारला की अक्षरमित्र अतिरेकी आहे काय ? तर तुम्हाला त्याच प्रकारची माहिती मिळेल. तेव्हा तुम्ही वाईट माहितीकडे लक्ष देऊ नका. चांगली माहीती पण बघा. मी : ब्वॉर ! अशाप्रकारे माझा क्लास घेऊन सिनियरचा सिनियर निघून जातो. मग मी मित्राला विचारतो की अरे बाबा, तु ह्यत कसा ? तर तो म्हणाला मी पुर्ण माहिती घेतलीय. जवळपास ६ महिने माहिती घेऊनच मी हा निर्णय घेतलाय. मग मी त्याला विचारले की बाबा, किती पैसे गुंतविलेस, तर म्हणाला. पाच लाख. (मित्र जोमात, मी कोमात). बर मग किती रीटर्न्स मिळाले ? तीन महिन्यात १० हजार आले. अजून मी शिकतोय. अजून मेहनत केली तर नक्कीच चांगले पैसे मिळतील. बरं मग नाव काय कंपनीच ? मी तुला एसएमएस करुन कळवतो. दोन दिवसांनी एसएमएस येतो. कंपनीच्या नावाचा मी अगोदर अंदाज बांधला होता तो अगदी १००% टक्के खरा निघतो. मंडळी, ए-नेट, बी-नेट असो की वाय नेट, किंवा २६ अक्षरांपैकी कुठलेही एक. काही फरक पडत नाही. जोवर तुम्ही पैसे टाकत नाही. मात्र पैसे टाकल्यावर तुमचे आयुष्य खुप बद्लून जाईल. पण ते कंपनी सांगते तसे की दुसर्‍या प्रकारे ते तुम्हीच ठरवा. कंपनीची वेबसाईट सुद्धा बॅन आहे. पण मग लगेच नाव थोडे फार बदलून दुसरे डोमेने नेम, दुसरी वेबसाईट उघडता येतेच की. मी माझा हार्ड आणि हार्डली अर्न केलेला पैसा यात टाकू शकत नाही असा निरोप मित्राला दिलाय. धन्यवाद ! तुम्ही काय ठरवलेय ? आज जोमात नि उद्या कोमात ? की अजून काय ?

वाचने 3561 वाचनखूण प्रतिक्रिया 6

तुषार काळभोर 08/10/2016 - 08:39
तुम्हाला नव्हे! चांगला कामधंदा सोडून हे भिकारधंदे करणारे व सर्वात आधी आपल्या जवळच्यांना त्यात ओढण्याचा प्रयत्न करणारे लोक कायमस्वरूपी मनातून उतरलेत. अजूनही हे एमेलेम प्रकार सुरु आहेत. अजूनही लोक सिग्नलला बस स्टॉपवर EXTRA INCOME, दर महिना १५०००-२०००० रुपये कमवा! असे कागद वाटत असतात. दुर्दैव हे की त्यात २०-३० चा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 08/10/2016 - 10:08
सहमत

रिम झिम 08/10/2016 - 08:54
सेम अनुभव मला ही आला होता ३-४ महिन्यांपुर्वी. ५०० डॉलर गुंतवा, मेंबर बनवा. ते देणार काय तर एक वेबसाईट (ज्यात तुम्ही ४-५ पाने माहिती ठेवू शकता आणि विडीओ ई-मेल.)