पण तू मात्र - 2
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
1) देवाला मी सांगितले
आणू नको कुणावरही ही वेळ.....
मांडू नको आयुष्याचा
तू पुन्हा असा खेळ......
2) मी करतो साजरा उत्सव
माझ्या हृदयातील दु:खाचा.....
मी तर जगेल कसबसा
प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा.......
3) आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
4) तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
5) जर जायचेच होते आयुष्यातून
तर जीवनात का आलिस....
राख भरली स रांगोळीत
आणि रंग घेऊन गेलिस.......
6) सगळे काही संपवले मी
पण त्याआधी तूच संपवले होते.....
मनातले ओठांवर आलेच नाही
तू सारे काही लपवले होते........
7) एकही दिवस जात नव्हता
प्रिये, तुझ्या चुंबनाशिवाय.....
विसरलीस लिहाले होते पत्रात
"तू मला आयुष्यभरासाठी हवाय".......
वाचने
2178
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
ती व मी !
:)
छान !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
क्या बात है....
तुमचा पण तू मात्र चा पहिला भाग पण छान होता..
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
आभारी आहे.....मदनबाण प्रतिसादाबद्दल. हा पामराचा फक्त एक प्रयत्न.....
आपला,
प्रेमभंगी संजूबाबा
In reply to आभारी आहे..... by sanjubaba
प्रेम भंग झाले तरी
कधीच खचायचे नसते...
गोड आठवणींच्या
आधारानेच आयुष्य जगायचे असते...
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
ती व मी