सुगंधसय
लेखनविषय:
चाहूल चाहूल,
सोनचाफा,
मंद पाऊल,
बकुळीला;
तीट काजळीला,
साजिरा प्राजक्त,
आणि वाटेवर,
आकाशमोगरा.
त्याचा निवारा,
चांदण्यात..
सुगंधसय,
पाझरे मनात-
गेली अत्तरे,
कधीची उडून..
वाचने
2609
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
नाजूक कविता आवडली.
सुगंधी कवीता आवडली.
वा!
सुगंधित, अल्पाक्षरी कविता. बरीच सूचक. आवडली.
वा!! आवडलीच कविता.
मस्तं!
धन्यवाद!
क्या बात है!
सुरेख कविता! कविताही मनात पाझरून गेली!
Sandy
छानंय कविता.
सुगंधसय शब्द आवडला.
सुंदर
वाह.. नाजूक.. सुंदर..
एक नज़्म
ख़ुशबू के झौंके जैसी
सुगंध पोहचला!
मस्त कविता!
सर्व दिग्गजांना धन्यवाद! तुम्ही नोंद घेतली याचाच मोठा आनंद वाटला.. :)
सुंदरच!
वरच्या सगळ्यांना..
नाजूक कविता आवडली.