गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
वाचने
44726
प्रतिक्रिया
202
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त धागा..
सब जंतर मंतर है.. बाबा रे बाबा
In reply to मस्त धागा.. by मराठमोळा
दलेर मेहंदी
दलेर मेहंदी
लिसा रे
In reply to दलेर मेहंदी by मनिमौ
आणखी काही प्रयत्नही झाले....
मुंभाय बहुदा बॉम्बे बॉयस
In reply to आणखी काही प्रयत्नही झाले.... by माम्लेदारचा पन्खा
गोविंदानेही गायचा प्रयत्न केला होता.....
In reply to मुंभाय बहुदा बॉम्बे बॉयस by कैलासवासी सोन्याबापु
गोरी 'तेरी आंखे कहे, के रात
आमच्या अल्ताफ राजा ची आठवण
वडाप च्या जीपड्यांमध्ये आजही
In reply to आमच्या अल्ताफ राजा ची आठवण by महासंग्राम
हेच
In reply to आमच्या अल्ताफ राजा ची आठवण by महासंग्राम
आमच्या कल्चरल नाईटला मी ते
In reply to आमच्या अल्ताफ राजा ची आठवण by महासंग्राम
वो माह जनवरी था.... पासून ते वो साल दुसरा था ये साल दुसरा है
In reply to आमच्या कल्चरल नाईटला मी ते by कैलासवासी सोन्याबापु
अक्षरशः उचलून बाहेर फेकला .....
In reply to आमच्या कल्चरल नाईटला मी ते by कैलासवासी सोन्याबापु
अल्ताफ राजा एक नंबर आहे!
In reply to आमच्या अल्ताफ राजा ची आठवण by महासंग्राम
धन्यवाद !
अरे भावांनो
मस्तच आहे! पण वन हिट वंडर
In reply to अरे भावांनो by पुजारी
एकदम कल्ला ना राव......
अभिजित चे
मिका ला विसरलात राव
एक नंबर धागा!
एक नंबर धागा लय भारी गाणी होती त्यातली काही
मस्तच धागा!
इंडिपॉप म्हणजे माझा विक पॉइंट
एक नंबर धागा!!!
सुनहरी यादें
बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या
In reply to सुनहरी यादें by वैदेही बेलवलकर
चाँदनी रातें - शमसा कंवल !
Misty Rhythms- Aye Laila---
रेमो चे
ओ मेरी मुन्नी, मुन्नी मुन्नी
In reply to रेमो चे by नाखु
के सरा सरा
In reply to रेमो चे by नाखु
रेमोने गायलेलं फेमस हिंदी
In reply to के सरा सरा by बोका-ए-आझम
अहाहा...
ओ सनम 'तेरी आँखोंकी कि कसम by
आय माय स्वारी....
In reply to ओ सनम 'तेरी आँखोंकी कि कसम by by झुमकुला
ओ सनम मोहब्बत कि कसम, असे वाचावेचालतय चालतय, आक्ख्या गाण्यात
In reply to आय माय स्वारी.... by झुमकुला
विविधभारती च्या म्युझिक मसाला
विवा कसे काय आठवले नाही अजुन
अर्रे हो! विवाची चोरी चोरी
In reply to विवा कसे काय आठवले नाही अजुन by मोदक
अरे हे विवा नाही आठवत बुवा
In reply to विवा कसे काय आठवले नाही अजुन by मोदक
अमिताभ चे गाणे?? "एक रहे...
अमिताभ चे गाणे?? "एक रहे...
आठवतात
अली हैदर ला विसरून कसे चालेल ? पुरानी जीन्स हे
- पुरानी जीन्स
- करार
- संदेसा
- गा रहा था कोई
- बारीश का है मौसम
यामधील "गा रहा था" कातरवेळी / रात्री एकटे असताना ऐकण्यास खास वाटते. "बारीश का है मौसम" ही तर निव्वळ एक घटना / कथा आहे, पण ज्या प्रकारे त्याचे गाण्यामध्ये रुपांतर केलेले आहे ते उल्लेखनीय आहे.https://www.youtube.com/watch
कांटा लगाSSSSSSSSSSS हाय लगा.
शेफाली जरिवाला माझ्या कॉलेज
In reply to कांटा लगाSSSSSSSSSSS हाय लगा. by टवाळ कार्टा
हायला...एसपीचे का तुम्ही?
In reply to शेफाली जरिवाला माझ्या कॉलेज by वेदांत
ट का तुम्ही पण एसपीचे ?
In reply to हायला...एसपीचे का तुम्ही? by टवाळ कार्टा
हाय इतनी मेरी किस्मत कहा
In reply to ट का तुम्ही पण एसपीचे ? by हेमन्त वाघे
मस्त धागा!
अजून काही...
ही सुचित्रा कृष्णमुर्ती
In reply to अजून काही... by टिलू
बरोबर
In reply to ही सुचित्रा कृष्णमुर्ती by मारवा
'जिंदगी मेरी'
In reply to ही सुचित्रा कृष्णमुर्ती by मारवा
लै भारी धागा!!!
अच्छा सिला दिया तुने मेरे
त्यातली सगळ्यात कल्ला लाइन
In reply to अच्छा सिला दिया तुने मेरे by संपत
Khalid & HISHAM abbas
गझब आहेत मिपाकर
क्या सुरत है क्या सुरत है
इंडिपॉपच्या जमान्यात
आशाजींचं ....!
In reply to इंडिपॉपच्या जमान्यात by नरेश माने
एका गान्यात 'सुनाली बेन्ड्रे'
In reply to आशाजींचं ....! by एस.योगी
जसबीर जस्सी...
आजा पिया तोहे प्यार दू
Shyla Lopez. Khatranak.
In reply to आजा पिया तोहे प्यार दू by कपिलमुनी
+१००
In reply to Shyla Lopez. Khatranak. by अभ्या..
जबरी
शंकर महादेवनचे
In reply to जबरी by सुमीत भातखंडे
कलोनिअयन कझन्स
बॉम्बे व्हायकिंग
आठवलेली आणखी काही गाणी
"बजा के बाजा, बना मै राजा,
हाच का?
In reply to "बजा के बाजा, बना मै राजा, by टवाळ कार्टा
हा हा...हेच्च
In reply to हाच का? by भाते
.धन्स...लय भारी....!!!
क्या बात...क्या बात! मस्त
धम्माल धागा ... त्याकाळात
सुखविंदर
In reply to धम्माल धागा ... त्याकाळात by भावना कल्लोळ
आनंद शिंदे मिलिंद शिंदेची
बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत
In reply to आनंद शिंदे मिलिंद शिंदेची by अभ्या..
आरारारारारा बाजारच उटीवला
In reply to बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत by संदीप डांगे
कुणाच्याही भावना दुखावल्या
In reply to आरारारारारा बाजारच उटीवला by कैलासवासी सोन्याबापु
चिंधीपॉप. खत्तरा शब्द.
In reply to बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत by संदीप डांगे
Babul Supriyo...
Babul Supriyo