मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दभूली

यशोधरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अचानक कधीतरी, तू उमलून येतेस. काळ वेळ न पाहता, राग लोभ न जाणता. पापणीतल्या पाण्यात कोणाच्या मुग्ध हास्यात, चुकार निवांत क्षणी कोण्या विस्कटल्या मनी. शब्दांचा आधार घेतेस तशी मौनातही बोलतेस उलगडतेस, तरीसुद्धा अलगद मिटू मिटू होतेस... तुझा सूर, तुझा नूर कधी फटकून दूर, गूज जीवाचे सांगण्या शब्द कधी महापूर. सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

वाचने 7247 वाचनखूण प्रतिक्रिया 45

नीलमोहर 23/09/2016 - 22:48
तुम्ही कविता करता माहित नव्हते, शब्दभूलीचे गाव, शब्दांची नक्षत्रं, नक्षत्रांचा माग, सगळंच सुंदर..

मनिष 23/09/2016 - 23:27
किती सुरेख आहे हे...
सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

एस 24/09/2016 - 01:10
कविता खूप तरल आहे. आवडली. यावरून याच्या अगदी विरुद्ध म्हणता येईल अशा आशयाची माझी एक इंग्रजी कविता आठवली. कधीतरी शेअर करेन.

तिमा 29/09/2016 - 18:16
कविता आवडली. कवितेला उद्देशून किंवा एखाद्या बोलक्या मैत्रिणीला उद्देशून, या अर्थाने पाहिली तरी चांगली वाटते. तुम्ही नेहमी लिहिलं पाहिजे.

नाखु 28/12/2017 - 17:28
खरं या वेळी उपस्थित नसल्याने​ दृष्टीस पडलीच नाही ही अप्रतिम कविता कवितेतील औरंगजेब नाखु खालमाने

In reply to by नाखु

इथेच वरती...
कवितेच्या वाटेला फारसा जात नाही पण ही रचना आव्डली ! हिमालयीन कवयत्रीचा गो(वा)डुला अविष्कार
येऊन गेलात तुम्ही... ! असो, यानिमित्ताने पुन्हा एकदा कविता वाचली. पुन्हा आवडली. Sandy