Skip to main content

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

Published on गुरुवार, 22/09/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं.. ओळखीचं हसून बोलायला हवं.. किती ती धूळ गैरसमजांची, मनाला स्वच्छ झाडायला हवं.. कुठंतरी आत सलतंय का काही? समजूतीचं मलम तिथं लावायला हवं.. जे झालं ते झालं, ते होणारच होतं अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं.. पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आनंदानं जीवन आता जगायला हवं.. अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
लेखनविषय:

याद्या 4369
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

'अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..'

"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो" आठवलं!

In reply to by पैसा

हेच म्हणायला आले होते पै तै! साधी पण सोपी नसलेली कविता! आवडली.