मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?

पथिक · · भटकंती
नमस्कार. दर ७-८ वर्षांनी फुलणारी कारवी यावर्षी पण फुलणार आहे असं वाचलं. मागे एकदा पेपर मध्ये कारवीच्या फुलांनी पूर्ण निळा झालेल्या डोंगराचा फोटो पहिला होता आणि ठरवलं होतं कि प्रत्यक्ष हे पाहायचंच. हे दृश्य पुण्याजवळ कुठे पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे कुणी सांगू शकेल काय ?

वाचने 11541 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by पथिक

प्रचेतस Fri, 09/16/2016 - 11:33
ह्म्म. बाकी कारवीची फुलं भीमाशंकर परिसरात बघायला मिळतील. यंदा फुललीय का ते माहित नाही.

In reply to by कंजूस

पथिक Mon, 09/19/2016 - 10:37
धन्यवाद. मी एकटा तीन चार वर्षांपूर्वी राजगड करून आलोय. पण सहकुटुंब जायचं आहे कारवी बघायला आणि त्यात असा गड चढणे हा पर्याय नाही...

In reply to by कंजूस

Nitin Palkar Mon, 09/19/2016 - 13:44
सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वी राजगड परिक्रमा केली होती. त्या वेळेस कारवीची झुडपे व फुले विपुलतेने पाहिली होती. प्रत्यक्ष राजगडावर कारवी बघितल्याचे स्मरत नाही.

In reply to by पथिक

जिन्क्स Mon, 09/19/2016 - 13:45
लोक एवढं का कास-कास करत असतात तेच कळत नाही. कास एवढीच किंबहुना त्यांहूनही सुंदर आणि जास्त प्रमाणात सुंदर फुले रायरेश्वर-कोळेश्वर पठार, तापोळा घाट उतरतानी डाव्या बाजूला उंचावर दिसणारे पठार, रायलिंग पठार इथे दिसू शकतात. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते सह्याद्री रांगेतल्या दुसऱ्या फळीतले सर्व पठारी प्रदेश अशा फुलांसाठी अनुकूल आहेत. अगदी सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वरही खूप सुंदर फुले फुललेली असतात.

Rahul Sable गुरुवार, 09/22/2016 - 20:05
मागील आठवड्यात परिवारासोबत सिंहगडला गेलो होतो तेव्हा सिंहगडच्या घाटात कारवी फुललेली पाहिली फोटो सुद्धा काढले लोनावळावरून राजमाची कडे जाणार्‍या मार्गावरही कारवी पहायला मिळेल लोनावळावरून सहारा सीटी कडे जानार्या मार्गावरही कारवी पहायला मिळते पण आता तिथे फुलोरा आला आहे की नाही ते माहीती नाही परिवारा सोबत जानार असाल तर सिंहगड हाच जवळचा उत्तम पर्याय आहे पण सिंहगडावरील वर्दळ वाढल्यामुळे कारवी चा मोठा फुलोरा पहायला मिळने कठिन आहे वाढत्या पर्यटनामुळे तेथील जैव विविधता धोक्यात आली आहे