साहित्य:-
१. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे
२. १ वाटी मटार
३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट
४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन
५. १ चमचा गरम मसाला
६. तेल
७. चीमूटभर साखर
८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर
९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग
१०. मीठ
११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स
१. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे.
२. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत.
३. कढईत तेल गरम करून फोडणी करावी त्यात आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट घालावी.
४. क्रश केलेले मटार घालून परतावे.
५. गरम मसाला,अर्धा चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर , साखर व मीठ घालूनपुन्हा परतावे व झाकण ठेऊन एक वाफ आणावि व गॅस बन्द करावा. हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
६. ५/६ ब्रेडचे स्लाइस पाण्यात भिजऊन ठेवावेत मऊ झाल्यावर त्यातिल पाणी काढुन टाकावे व स्मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करावे.
७. वरिल मिश्रणात उरलेला लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर व मीठ मिसळावे व मिश्रण एकजीव करावे.
८.वरिल मिश्रणाची पारी करून त्यात मटारचे मिश्रण भरावे व रोल करून रवा किव्वा ब्रेड्क्रम्समधे घोळवून तेलात खरपूस तळावेत
वाचने
11388
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
+१
In reply to मस्त by अनंत छंदी
असेच
In reply to +१ by किट्टु
+१ +१ आम्ही
In reply to असेच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्याप
In reply to असेच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to प्राध्याप by मानसी मनोजजोशी
पाकृतीला वाईट कुठे म्हटलं !
In reply to प्राध्याप by मानसी मनोजजोशी
हे
In reply to पाकृतीला वाईट कुठे म्हटलं ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो
In reply to मस्त by अनंत छंदी
माहिती
In reply to मस्त by अनंत छंदी
मस्तच
स्मॅश नव्हे मॅश
धन्यवाद
In reply to स्मॅश नव्हे मॅश by पक्या
छ्या!
नको वाचू
In reply to छ्या! by विसोबा खेचर
अजून एक पर्याय
कांदा + ओला नारळ + कोथिंबीर
तुमच्यावर
फोटो दिसत नाहीये ..