मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईच्छा

पथिक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चांदण्यात एकदा न्हायचंय मला ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला वेळूच्या बनात दूर किर्र रानात गातो जे गीत वारा, गायचंय मला रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत स्वप्नांच्या गावाला जायचंय मला माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून त्याचा रूप एकदा पहायचंय मला

वाचने 2068 वाचनखूण प्रतिक्रिया 11

निनाव Tue, 09/13/2016 - 11:51
"माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून त्याचा रूप एकदा पहायचंय मला" -- खूपच सुन्दर कल्पना!

प्रभास Wed, 09/14/2016 - 00:23
सुंदर...!!! खूपच छान!!! अप्रतिम!!! तुमच्या अत्युत्कृष्ट रचनांपैकी एक म्हणावी लागेल!!! थोडेसे स्वयंशोधनाकडे वळलात की काय पथिकभाऊ? :)

In reply to by प्रभास

प्रभास Wed, 09/14/2016 - 00:28
शीर्षक थोडंसं चुकलं असं वाटतंय... अजिबात अपील होत नाहीये... पण तुमच्या नावाचा दराराच असा आहे की धागा वाचल्याशिवाय राहवलं नाही... आणि खरंच काव्य अत्युत्तम उत्कृष्ट आहे... खरंच...

In reply to by प्रभास

पथिक Wed, 09/14/2016 - 14:49
मलासुद्धा हे शीर्षक पटलं नाही. आळस केला.. ईतकी प्रशंसा बांधून कससंच वाटतंय हो... कारण मला मी त्यायोग्य वाटत नाही.. :)