सफर ग्रीसची: भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या मायसिनीतून पाय निघत नव्हता. पण ३ वाजून गेल्यावर तिथल्या रखवालदारांनी हाकलण्याआधी निघालो. बाहेर मस्त उन पडलं होतं. निळंशार आकाश आणि समोर ऑलिवच्या झाडांना घेवून उभे असलेले डोंगर! आणखी दोनतीन तास सहज उजेड असणार होता. ३ वाजता साइट बंद करण्याच्या आळशीपणाला नावं ठेवत बाहेर सावलीत गप्पा मारत बसलो. तिथे काम करणार्यांच्या गाड्या एकेक करून निघू लागल्या. आम्हाला तिथे बघून एकदोघांनी चौकशी केली. मग त्यांच्यामागोमाग आम्हीही नाफ्प्लिओच्या दिशेने निघालो.
पुढचे चार दिवस नाफ्प्लिओला (Nafplio) मुक्काम होता. ग्रीसमधील सगळ्यात सुंदर आणि रोमँटिक शहरांमध्ये हे शहर गणलं जातं. त्याशिवाय ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराला अनन्यसाधारण स्थान आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या भागात येईलच. पायाशी समुद्र आणी उशाशी पालामिडी किल्ला असलेलं नाफ्प्लिओ हे अथेन्सवासीयांचं सुट्ट्यांसाठी आवडतं ठिकाण. २२ डिसेंबरला फारशी गर्दी नव्हती, पण पुढच्या दोन दिवसात पर्यटक यायला लागले आणि मस्त उत्सवी वातावरण तयार झालं.
हॉटेल जुन्या शहराच्या मागच्या बाजूला उंचावर होतं. गाडी थोडी दूर पार्क करून सामान घेवून चालत गेलो. हॉटेल छोटंसं असलं तरी छान सजवलं होतं. गावात जाण्यासाठी रस्त्याने वळसा घेवून जाण्यापेक्षा समोरच पायर्या होत्या. खिडक्यांतून खाली पसरलेल्या जुन्या पद्धतीच्या इमारती, समुद्र आणि त्याच्या पलीकडे डोंगररांगा दिसत होत्या.
दुसर्या दिवशी सकाळी तयार होवून न्याहारीला गेल्यावर कळले, हॉटेलमध्ये जास्त पाहुणे नसल्याने आज बुफे नाही आणि आम्हाला हवी ती न्याहारी बनवून मिळेल. अंड्याचा पोळा, चीजटोस्ट आणि चक्क्यासारखं ग्रीक दही अशी मस्त पोटपूजा झाली.
न्याहारीची जागा
नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय
संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही इमारत ग्रीसमधील वेनिशिअन स्थापत्याचं उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला शस्त्रागार म्हणून बांधलेली ही इमारत नंतर सैनिकांना राहायला, तसेच दुसर्या महायुद्धात जर्मन इंटरोगेशन सेंटर म्हणून वापरली गेली. नाफ्प्लिओचा मुख्य चौक असलेल्या सिंटाग्मा (राज्यघटना) चौकाची एक बाजू म्हणजे ही इमारत..
१९५२-५३ साली मायसिनीला झालेले उत्खनन
कांस्य हत्यारे
.
एपिडाउरोस
प्राचीन ग्रीकांचा सूर्यदेव अपोलोच्या अनेक मुलांपैकी एक अस्क्लिपिअसच्या (Asclepius) जन्माची गोष्ट अद्भुतरम्य आहे. त्याचा जन्म एपिडाउरोसला झाला, असे समजले जाते. अपोलो हा धन्वंतरी म्हणूनही ओळखला जातो आणि अस्क्लिपिअसकरवी तो लोकांवर उपचार करतो, असा समज प्रचलित होता. एपिडाउरोसपासून थोडं दूर अस्क्लिपिअन हे आश्रयस्थान किंवा उपचारकेंद्र (sanctuary) होते. ख्रिस्तपूर्व तिसर्या आणि चौथ्या शत़कात या ठिकाणाची भरभराट झाली. रुग्णांसाठी निवास, चिकित्सागृह, क्रीडांगण, नाट्यगृह अश्या अनेक सुविधा होत्या. तिथे शल्यकर्मही होत असत. क्रीडांगण आणि इतर अवशेषःभावी दर्याचा राजा
वाचने
7701
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
जबरदस्त. आता आधीचे भाग वाचतो.
जबरदस्त आहे ही प्राचीन ग्रीक संस्कृती.
छायाचित्रेसुद्धा सुरेख.
इथे पुण्यात डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व संग्रहालयातील विथिकांमध्ये अश्मयुग, ताम्रपाषाणीयुग, लोहयुगातील अवशेष पाहिले होते त्याची आठवण झाली.
In reply to जबरदस्त आहे ही प्राचीन ग्रीक by प्रचेतस
मायसिनिअन शिवाय मिनोअन सारख्या आणखी प्राचीन ग्रीक संस्कृतींचे अवशेष अथेन्सला बघता आले. त्याबद्दलही लिहायचं आहे.
डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयाचं वेबपेज बघितलंय. गेल्या एकदोन वर्षांतच कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या कामाबद्दल कळलं. अश्या कामाला अजून exposure मिळायला हवं, असं वाटतं.
फारच सुंदर आहे हा भाग! ह्या लेखांमुळे जायलाच हवे अशा देशांच्या लिस्ट्मध्ये ग्रीस आलेले आहे!
पुभाप्र!
वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.
वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.
वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.
हाही भाग अतिशय छान झाला आहे. खूप आवडला. पुढील भाग लवकर टाका प्लीज़.
छान माहितीपूर्ण भाग आजचाही.पुभाप्र.
सुंदर ! मस्तं चालली आहे सफर !
प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार! तसेच काही सूचना असल्यास स्वागत आहे.
In reply to प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार by निशाचर
@पद्मावति, तुमची सूचना लक्षात ठेवली आहेच :)
जबरदस्त.