मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<म्हणजे...>

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शीतलची "म्हणजे..." कविता वाचून माझो सारस्वत जीव उचंबळान आयलो.... माशे म्हणजे काय तां, चव घेतल्याशिवाय समाजणां नाय... चव म्हणजे काय तां, काटे चावल्याशिवाय समाजणां नाय... काटो म्हणजे काय तां, घशात अडकल्याशिवाय समाजणां नाय... घसो म्हणजे काय तां, सांबार्‍यान भाजल्याशिवाय समजणां नाय.... सांबारा म्हणजे काय तां, भात कालवल्याशिवाय समाजणां नाय.... भात म्हणजे काय तां, ढेकर दिल्याशिवाय समाजणां नाय.... -डांबिस प्रभू (साळगांवकर!)

वाचने 5242 वाचनखूण प्रतिक्रिया 24

बेसनलाडू Tue, 02/03/2009 - 01:02
धनंजयांची धुकट सकाळ, आमची फुकट सकाळ यांमागोमाग डांबिसकाकांची रविवार सकाळ अनुभवायला मिळाली - ती सुद्धा सोमवारी सकाळी (हाय रे दुर्दैव!) मात्र सांबारा ऐवजी सोलकढी हवी होती डांबिसकाका! ;) सोलकढी भात नि तळलेली मासळी हा बेत झ्याक बॉ! (ढेकरदाता)बेसनलाडू

सुनील Tue, 02/03/2009 - 08:34
चविष्ट विडंबन! जाता जाता - "सांबारा" म्हणजे इडली-सांबारातील "सांबार" नव्हे, हे देशावरील मंडळींनी ध्यानात घ्यावे. (कर्ली-तारली प्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

=)) चविष्ट विडंबन! +१ सहमत सुनीलभौ, माहितीबद्दल (माझ्यासारख्या इतर अ-कोकणी) लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुनील Tue, 02/03/2009 - 10:31
आगाऊ शुभेच्छांबद्दल आगाऊ आभार! :) (आगाऊ) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by घाटावरचे भट

सहज Tue, 02/03/2009 - 10:38
=)) =)) पिडाकाका आता लवकर मालवणी पद्धतीचे मासे करावे लागणार, तुमचे विडंबन अपेटायजरच की वो. यशोधराताई तुम्ही लवकर एक रेशिपी टाका बघु. अवांतर- भटोबा ४० शब्दांपेक्षा मोठा प्रतिसाद.

दशानन Tue, 02/03/2009 - 10:38
:O पिडा पण विडबंन करतात :? B) मग मीपण करु का एक विडंबन :? *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

In reply to by दशानन

विजुभाऊ गुरुवार, 02/05/2009 - 21:35
हे घ्या इडम्बन "वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - » वाटते हादडावे इतके की कंटाळा तुला यावा वाढता वाढता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने जिलेबीची कढई तू मला हाणावी नेम साधुन लागलेल्या झार्‍याची ती जखम मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - »

केशवसुमार Tue, 02/03/2009 - 14:41
अरे मछिंद्रनाथा, अरे आज काय चालयं काय.. आता ते प्राण्यांच्या प्रेतातल मला काही कळत नाही.. नाहितर विडंबन एकदम चविष्ठ झाल आहे म्हटले असते.. असो..विडंबन एकदम झकअसो..चालू दे.. (सुमार)केशवनाथ

लिखाळ Tue, 02/03/2009 - 16:48
मस्त विडंबन..फार आवडले. आधीच्या कडव्यातला मुख्य शब्द पुढच्या कडाव्याचा विषय असा तर्कसंगत प्रवाह केल्यामुळे मला हे काव्य जास्त आवडले. -- लिखाळ.

प्राजु Tue, 02/03/2009 - 21:08
यल्लो नॉटी अंकल.... यू जस्त रॉक! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

साती Wed, 02/04/2009 - 11:30
वा:, काटेरी माशे ना माशांचा सांबारा.... पिडा, तुमचे चविष्ट कवितेबद्दल शतशः आभार. बेला, आमच्यात माशांच्या आमटीला "सांबारं (र वर टिंब रं हो)" चं म्हणतात. साती

झेल्या Wed, 02/04/2009 - 16:16
चांगले पिडंबन..... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.