गुडगांव
लेखनविषय:
आपणच खरवडून काढावे
आपल्या अजस्र जखमेवरच्या
अपक्व खपल्यांचे तुकडे....
तसं हे शहर
भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर
दिवास्वप्नांच्या भीतीने
टक्क जागे राहावे.....
तसं हे शहर
सागराचा थांग घेताना
अथांग व्हावे नदीने
अन् त्याचा माज करावा......
असं हे शहर
उत्फुल्ल पाण्यात
कळकट शेवाळी
तवंग तरंगावा.....
तेच हे नगर
एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव....
.....गुडगांव
वाचने
3067
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
जबर्र्दस्त!
बॅडगाव आहे म्हणा कि हे.
कविता मस्त आहे स्वामीजी
हा धागा दोनदा का आलाय?
In reply to हा धागा दोनदा का आलाय? by अभिजीत अवलिया
कल्पना नाही ब्वा! इंटरनेटच्या
वा! आवडली !
कविता छान !!
दिल्ली/नोइडाही चालेल ना?
In reply to दिल्ली/नोइडाही चालेल ना? by कंजूस
बर्यापैकी चालू शकेल. पण या
वा!
मस्त!!
नाही आवडली
In reply to नाही आवडली by ज्योति अळवणी
का ब्रे
नकारात्मक भावना जाणवते कवितेत
In reply to नकारात्मक भावना जाणवते कवितेत by ज्योति अळवणी
हाहाहा! कविता सकारात्मकच
In reply to हाहाहा! कविता सकारात्मकच by स्वामी संकेतानंद
कविता मला का आवडली नाही ते मी
आवडली....
गुडगावात कुत्री असतात का हो?
दिल्ली आणि गुरूग्राम दोघांचे
एका पराभवातून अलगद