रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन
रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......
रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे
भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली
रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत ४ पदक मिळाली , पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा या सगळ्या खेळाडूंच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम.
Sports Tag
वाचने
13300
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
सही..
हे कोणत्या चॅनेलवर आहे आणि किती वाजता..
In reply to सही.. by शलभ
सगळ्या चॅनेलवाल्यांनी अर्धा एक मिनिट दाखवली ही बातमी ,
आणि कुठल्याही चॅनेलवर पॅरालिम्पिक च्या स्पर्धेचे प्रक्षेपण दाखवणार नाहीयेत
दोघाही खेळाडूंचे अभिनंदन!! ग्रेट..
थंगावेलूला पाच वर्षांचा असताना पायावरून गाडी गेल्याने अपंगत्व आले. त्याने हिंमत न हरता यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा जिंकल्या होत्या.
आज चेपू वर बघितलं होत. दोघांचं अभिनंदन.
बाबा योगीराज.
अभिनंदन
हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत आणि पॅरालिम्पिक मध्ये पदकांची संख्या वाढून ते बॅनर पुन्हा पुन्हा अपडेट करायला लागावे हि इच्छा
In reply to हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत by _मनश्री_
अगदी!! बॅनर हवंच ह्याचंही!!!
In reply to हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत by _मनश्री_
अनुमोदन!
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!
In reply to दोघांचे अभिनंदन! by बोका-ए-आझम
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!+१००००
In reply to दोघांचे अभिनंदन! by बोका-ए-आझम
खरोखर
In reply to दोघांचे अभिनंदन! by बोका-ए-आझम
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!
हा घ्या दुवा
०२:४३:३५, ०२:५६:३५ आणि ०३:३५:१५ पासून
टीप - पहिल्या प्रयत्नाच्या वेळा माझ्याकडुन मिसल्या गेल्या आहेत.
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत! + १००
या दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन ! सर्व भारतियांना अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे !!
दोघांचेही अभिनंदन आणि तुम्ही धागा काढलात त्याबद्दल अनेक धन्यवाद! मागच्या दोन पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताचे दमदार प्रदर्शन झालेले आहे, पदक तालिका इथे कुणाला देता आली तर बघा ना..
In reply to दोघांचेही अभिनंदन आणि तुम्ही by संदीप डांगे
पॅरालिम्पिक मधे भारताला आत्तापर्यंत १० पदक मिळालेली आहेत

पदक तालिका

कर्जफेड करण्यासाठी करणार आहे हे वाचलं. वाईट वाटलं. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना हळूहळू लोकाश्रय मिळतोय. पण या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करूनही अजून लोकाश्रय आणि राजाश्रय फारसा मिळालेला नाही.
In reply to मरियाप्पन त्याच्या बक्षिसाचा वापर by बोका-ए-आझम
मिळेल मिळेल...!!!
बाकी या खेळाडूंबद्दल काय बोलायचे...
__/\__..दंडवत..__/\__
थांगावेलूला तमिळनाडू सरकारने २ कोटी बक्षिस देणार अशी घोषणा केली आहे , वरुण भाटी उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे पण UP सरकारने अजून तरी त्याला बक्षीस देण्याची कसलीही घोषणा केलेली नाही
केंद्र सरकारने थांगवेलूला ७५ लाख आणि वरुण भाटीला ३० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे
प्रसार माध्यमांनीही ह्या दोघांच्या कामगिरीची म्हणावी तशी दखल घेतली नाही .
दीपा मलिक यांना गोळाफेकीत रौप्यपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन!
४५ व्या वर्षी ही कामगिरी केल्याने अजून विशेष वाटले. यापूर्वी अर्जुन पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहेच.
या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन!
दीपा मलिक यांना प्रशिक्षण देणारे बाबर सर मलाही शाळेत खेळाचे शिक्षक म्हणून होते. त्यांचेही अभिनंदन! _/\_
देवेंद्र झाझरियाला भालाफेक मधे सुवर्णपदक मिळाले आहे. अभिनंदन..!
शुभेच्छा!
वा बर झाल हा धागा आला, अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम !!!
पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा
+१०००खरंच मनापासून अभिनंदन ह्या सगळ्या खेळाडूंचं.
हे खेळाडू बॅनरवर झळकावेत
सही..