एकेकाचे जगणे
लेखनविषय:
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची
कुणाला काय भावतं अन कुणाला काय
कुणाला काय सलतं अन कुणाला काय
अन ज्याला जे भावतं, जे सलतं
त्याला तेच महत्वाचं वाटतं ….
कुठे 'गोली मार भेजे में'
कुठे 'जिस्म'
कुठे 'जय जय राम कृष्ण हरी'
कुठे 'जय हिंद'
कुठे 'गांधीगिरी'
कुठे 'नथ्थुराम'
कुठे काय नि कुठे काय
या ना त्या प्रकारे
घेतो प्रत्येकजण
जगणे मोल
कुठे सोनेरी
कुठे बिलोरी
कुठे बेगडी ….
पण
प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल -
रक्ताची
अश्रूंची
हृदयाची
आत्म्याची
वाचने
1377
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
यापेक्षा भोंडल्याची गाणी
In reply to यापेक्षा भोंडल्याची गाणी by गणामास्तर
हो का...? :(
यावर आत्मुबुवा छान विडंबन
भावना चांगली आहे... पण कविता
In reply to भावना चांगली आहे... पण कविता by ज्योति अळवणी
हम्म. धन्यवाद ! अशी टीका
छानच.
In reply to छानच. by निनाव
धन्यवाद ! प्रतिसाद आवडला.