मी एकटी ....
लेखनविषय:
काव्यरस
मी एकटी ....
एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही
परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही
रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?
बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?
राजेंद्र देवी
वाचने
2844
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
कविता आवडली
In reply to कविता आवडली by पैसा
धन्यवाद...
सुंदर... आवडली
In reply to सुंदर... आवडली by ज्योति अळवणी
धन्यवाद...
आवडली
In reply to आवडली by एक एकटा एकटाच
धन्यवाद....