सावली....
लेखनविषय:
काव्यरस
मी सांगितल माझ्या सावलीला,
जा तिला जाऊन भेटून ये.
ती नाही भेटली तर,
तिच्या सावलीशी बोलून ये.
घट्ट मिठी मार तिला,
थोडे अश्रूही गळूदेत खांद्यावर.
तिलाही कळूदेत काय होत माझ,
ती दूर दूर गेल्यावर.
त्रास देउ नकोस तिला
फक्त डोळे भरून पाहून ये.
आणता आली तर तिची छवी,
डोळ्यांत साठवून घेऊन ये.
शांत बैस तिच्याजवळ,
फक्त तिलाच बोलूदेत.
येताना ते सगळे शब्द,
कानात साठवून घेऊन ये.
निघताना काही दिल तिने तर
नको म्हणून सांगून ये.
थोड प्रेम देऊन ये माझ,
आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये…
आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये…
वाचने
3679
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुरेख.. आवडली.
In reply to सुरेख.. आवडली. by यशोधरा
धन्यवाद !!!!!
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद !!!!!
खूप छान!
In reply to खूप छान! by पैसा
धन्यवाद !!!!!
छान आहे,
In reply to छान आहे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !!!!!
सुरेख!!
In reply to सुरेख!! by रातराणी
धन्यवाद !!!!!
मस्त
आवडली
आवडली पुलेशु
धन्यवाद !!!!!
छान कविता आणि कल्पना पण.