सासवडची यादवकालीन मंदिरे
सासवड तसं ऐतिहासिक गाव. इथे अनेक जुने पुराणे वाडे आहेत. पुरंदरेंची भली मोठी गढी आहे, सोपानकाकांची समाधी आहे, वीरगळ आहेत. गावच्या पाठीमागे भला मोठा पुरंदर त्याचा जोडीदार वज्रगडासह दिमाखात उभा आहे. ह्या सासवडाचा वारसा मात्र शिवकाळाच्याही आधी जातो तो थेट यादवकाळात. तत्पुर्वीचा त्याचा इतिहास मला ज्ञात नाही. खुद्द पुरंदर हा यादवकालीन किल्ला. गडावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर ही तत्कालीन मंदिरे त्याची अजूनही साक्ष देतात.
ह्याच सासवडात दोन यादवकालीन मंदिरे आहेत आणि पुरंदरच्या पायथ्याच्या पूर गावात एक. ही तिन्ही मंदिरे साधारण १३/१४ व्या शतकातली असावीत.
सासवडला कर्हेच्या काठावर सोपानकाकांचं समाधी मंदिर आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला आहे ते संगमेश्वर मंदिर. पावसाळा सोडता कर्हा नदीला नगण्य पाणी असतं तेव्हा ती सहज ओलांडता येते मात्र पावसाळ्यात नदी अगदी फुफाटत वाहत असते तेव्हा संगमेश्वरला जायला थोड्या अंतरावरचा नदीपूल वापरावा लागतो.
संगमेश्वर मंदिर तसं उंचावर वसलेलं आहे. म्हणजे एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात शिल्पं अजिबात नाहीत पण एकंदरीत मंदिराचं बांधकाम देखणं आहे. सभामंडप आणि गाभारा हे यादवकालीन शैलीत तर कळसाचा भाग हा नंतर पेशवेकालीन मराठा शैलीत बांधला गेला किंवा जीर्णोद्धारीत झाला. येथे नंदीमंडप नाही किंवा तो पूर्वीच भग्न झाला असावा. एक जुना भग्न नंदी मंदिराच्या आवारात दिसतोच. सभामंडपात पेशवेकाळात कधीतरी नव्या नंदीची स्थापना झालेली दिसते.
संगमेश्वर मंदिर
कर्हेच्या काठावरील संगमेश्वर
यादवकालीन सभामंडप
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डाव्या सोडेचा गणेश असलेली गणेशपट्टीका आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील दगडी नक्षीकाम कमालीचं देखणं आहे. येथे असलेली शिल्पांची उणीव ही नक्षी भरुन काढते हे अगदी निश्चित,
मंदिराचे पेशवेकालीन कळस तर अतिशय सुंदर दिसतात. ह्याच कळसांवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत.
वटेश्वर मंदिर
यानंतर आमचा पडाव होता ते सासवडच्या वटेश्वर मंदिरात. ह्यालाच चांगावटेश्वर मंदिर असंही म्हणतात. हे तसं गावापासून थोडं दूर. सासवड पूर रस्त्यावर. गाव संपलं की साधारण दिडेक किमी अंतरावर. हे मंदिर पण कर्हेच्याच काठी, उंचावर. इथे नदीकाठी भरपूर झाडी आहेत आणि त्या झाडीत भरपूर मोर विहरताना दिसतात.
ह्या मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वर मंदिरासारखाच. दगडी सभामंडपावर केलेलं कळसांचं विटांचं बांधकाम हे मराठा शैलीतलं. मात्र मंदिराच्या सभामंडपातल्या भिंतींवर विविध प्रकारची शिल्पं आहेत ते येथलं वैशिष्ट्य.
मंदिराचा दर्शनी भाग.
स्तंभांवरील शरभ
येथे एका स्तंभावंवर दोन ठिकाणी महिषासुरमर्दिनीची शिल्पे आहेत. हाती शस्त्र घेऊन दुर्गा महिषाचा संहार करतेय. वध होत असताना महिष आपले महिषरुप टाकून धडातून प्रकट होताना दिसतोय.
शरभ आणि अश्व
गजाबरोबर असलेलं हे शिल्प गेंड्याचं का रानडुकराचं हे मला नीटसं कळत नाहीये.
ताक घुसळणारी स्त्री
नर्तक
सुबक नक्षीकाम
शाखामृग
कुस्तीगीर आणि नर्तक
अजून काही शिल्पे
--
--
मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवरच उपरोक्त शिल्पे आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराळ आहे.
मंदिराचा अंतर्भाग
अंतराळ व गाभारा
वर सांगितल्याप्रमाणेच मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वरासारखाच आहे. पेशवेकालीन कळस मात्र हल्लीच सोनेरी रंगाने रंगवुन काढलेला आहे.
पेशवेकालीन कळस
मंदिराच्या बाह्यभिंती
मंदिरातून दिसत असलेले उडणारे मोर :)
चांगावटेश्वर मंदिर पाहून आम्ही निघालो ते पुरंदरच्या पायथ्याला असणार्या पूर गावात. ह्याच गावात आहे ते नारायणेश्वराचं सुरेख मंदिर.
पूरचा नारायणेश्वर
पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं सुंदर देऊळ.
माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता येतो.
ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.
वीर मारुती
नारायणेश्वर मंदिर
काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.
गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्याच्या हाती डमरु आणि नाग आहे.
----
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे शेतात काही सतीशिळा दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातली एक सतीशिळा तर कमालीची देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सतीशिळेवर सतीचे चार हात कोरलेले आहेत. ह्याचा अर्थ चार वेगवेगळ्या वीरपत्नी येथे सती गेल्यात असा होतो. एकाच वीराच्या चार पत्नी सती जाणे हे संभवनीय नाही.
सतीच्या हातांखाली युद्ध करण्यार्या वीराचा प्रसंग कोरलेला आहे. व त्याचे खाली चार वीरपत्नी प्रार्थना करताना दाखवलेल्या आहेत. सर्वात खालच्या प्रसंगात चितेवर बसून सती जाणार्या स्त्रीचा प्रसंग कोरलेला आहे. व सर्वात वरच्या पट्टिकेवर ह्या स्त्रीया कैलासास जाऊन शिवलिंगाची आराधना करताना दाखवलेल्या आहेत.
ह्याच सतीशिळेच्या जोडीला वीरमारुतीची एक मूर्ती आहे.
ह्याच्या समोरच शेतात असलेली एक दुर्लक्षित सतीशिळा.
ही झाली सासवडच्या काही प्राचीन मंदिरांची थोडक्यात ओळख. अजूनही काही प्राचीन मंदिरे ह्या परिसरात असतील. थोडा शोध घेतला पाहिजे. पण सासवडच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. ह्याच्या आसपासच्या नाझरे, माळशिरस, नायगाव ह्या लहानशा गावांमध्ये असणारे कित्येक वीरगळ, सतीशिळा, काही मोडलेली मंदिरे, काही अजूनही शाबूत असणारी पण मूळचे सौंदर्य हरवलेली मंदिरे मी हिंडून पाहिली आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
वाचने
32911
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
छान धागा.
In reply to छान धागा. by यशोधरा
+१
छान वल्लीस्टाईल लेख.
In reply to छान वल्लीस्टाईल लेख. by बॅटमॅन
अरे त्या लेखाचा फोटो नेमका
In reply to अरे त्या लेखाचा फोटो नेमका by प्रचेतस
अच्छा, ओक्के. पण याही
In reply to अच्छा, ओक्के. पण याही by बॅटमॅन
रैट्ट.
सुंदरच
In reply to सुंदरच by मोक्षदा
शरभ म्हणजे सिंहासारखा
In reply to शरभ म्हणजे सिंहासारखा by प्रचेतस
:)
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील
उत्तम
मस्त रे वल्ली.
माहीती ओथंबीत धागा
संगमेश्वर आणि वटेश्वर मंदिर
सुंदर!
In reply to सुंदर! by पैसा
ह्यातले कुठलेच मंदिर संरक्षित
मस्त
सुरेख लेख.
काही काळ सासवड मध्ये राहिलेलो
सुंदर लेख आणि फोटो ! वल्ली
तुमच्या लेखांना छान लिहीले
In reply to तुमच्या लेखांना छान लिहीले by सतिश गावडे
चांगदेव हे नाथपंथी होते हे
In reply to चांगदेव हे नाथपंथी होते हे by प्रचेतस
लहान तोंडी मोठा घास,
In reply to लहान तोंडी मोठा घास, by रातराणी
हो.
सुंदर फोटो आणि लेख.डाव्या
In reply to सुंदर फोटो आणि लेख.डाव्या by संत घोडेकर
बरेचवेळा आढळतो. मी स्वत: चार
सुंदर.
लेख आवडला आणि त्यापेक्षाही
सुंदर लेख
In reply to सुंदर लेख by अनिरुद्ध.वैद्य
:)
In reply to सुंदर लेख by अनिरुद्ध.वैद्य
केदारेश्वर मंदिरात मूर्ती
In reply to केदारेश्वर मंदिरात मूर्ती by बॅटमॅन
हा राईट्ट
छान माहिती. लेखातून आपला
भारी आहे.शाखामृग ?दोन माकडे
In reply to भारी आहे.शाखामृग ?दोन माकडे by कंजूस
माकडांना शाखामृग ही संज्ञा
लाइन ड्रॅाइंग रोडम्याप हवाच
सासवड-कोंढवा रस्त्यावर हिवरे गाव
पुरंदरला जाण्यासाठी जवळचे
In reply to पुरंदरला जाण्यासाठी जवळचे by कंजूस
सासवडच. तिथून पुरंदरापर्यंत
In reply to पुरंदरला जाण्यासाठी जवळचे by कंजूस
सासवड ते भोर बस पण असते. तिने
त्या सतीशिलांवर शेंदूर फासून
In reply to त्या सतीशिलांवर शेंदूर फासून by कैलासवासी सोन्याबापु
शरभ म्हणजे सिंहासारखा
In reply to शरभ म्हणजे सिंहासारखा by प्रचेतस
शरभ कसा असतो ते जरा डिटेल
In reply to शरभ कसा असतो ते जरा डिटेल by कैलासवासी सोन्याबापु
शरभाचे मुख कधीच बकर्यासारखे
In reply to शरभ म्हणजे सिंहासारखा by प्रचेतस
छान लेख..
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख
In reply to नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख by अजया
तुमचे लेख वाचल्याने कुठेही
भारी फोटो.
मस्त फोटो.
In reply to मस्त फोटो. by शान्तिप्रिय
कचकून हनुमोदन वल्लींसोबत एक
छान माहिती.
मस्त माहिती....
लेख छानच..
प. ..ण,
एकटाच कधी गेलेलास रे... दू दू आगोबा.ती असल्या बटबटीत रंगात
In reply to ती असल्या बटबटीत रंगात by सूड
आज्काल
In reply to आज्काल by अनिरुद्ध.वैद्य
1) मुर्त्यांची तोंडात पेढा का
In reply to आज्काल by अनिरुद्ध.वैद्य
1) मुर्त्यांची तोंडात पेढा का
एक नंबर !!
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख,
सुंदर माहिती.
In reply to सुंदर माहिती. by गामा पैलवान
गेंडाच आहे तो पण चरबीचे
In reply to गेंडाच आहे तो पण चरबीचे by अभ्या..
अधांतरी अलंकारण ....?
In reply to अधांतरी अलंकारण ....? by गामा पैलवान
नाही पैलवान. अलंकरण म्हनजे
In reply to नाही पैलवान. अलंकरण म्हनजे by अभ्या..
याला म्हणतात होय अलंकरण.
यादव काल ?
In reply to यादव काल ? by जिप्सी
स्तंभांवरुन. वटेश्वर बहुधा
अशा बांधकामावरचं शेवाळ घासून
यादवकाळ म्हणताना आपण मधली ३-४
In reply to यादवकाळ म्हणताना आपण मधली ३-४ by जिप्सी
ते बाकी खरं.
यादवकाळ म्हणताना आपण मधली ३-४
धन्यवाद ... माझ्या गावाच्या
मस्त!
नेहमीप्रमाणे लेख आणि माहीती