मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही तोंडी लावणी

औरंगजेब · · पाककृती
जर घरात पोळी आणि भाताशी काहीही खायला नसेल तर खालील पदार्थ करता येतील. स्वतःच्या जबाबदारीवर हे पदार्थ करावेत. मी केले तेव्हा मला आवडले. ते तुम्हाला आवडतीलाच अस काही नाही. लोणचे+दाणे भाताबरोबर खायला उत्तम. साधे शेंगदाणे भाजून घ्यायचे मग त्यावर लोणच्या चे तेल घालायचे. सगळे एकदम मिक्स करा. मग आनंदाने खाणे. दाणेकूट+ तूप + साखर ह्याचे प्रमाण २:१:१ असे आहे. दोन चमचा दाणे कूटला १ चमचा तूप आणि एक चमचा पिठी साखर. मिक्स करा आणि मस्त खा पोळी बरोबर अजून काही ऑपशनल तोंडी लावणी दिली आहेत त्याची कृती मला माहित नाही. १- पोहा डांगर २- सांडगी मिरची [ दही भातात बरोबर कोथिंबीर घालून खावी] ३- कॉर्न फ्लेक्स ४- बटाटा भरीत [ दही + उकडलेले बटाटे + तिखट + दाणे कुटं + मीठ + साखर] बाकी मिपाकर अनाहिता सुगरणी आहेत त्या अजून सुचवू शकतील. पाककृती सदरात टाकलेले हे माझे पहिलेच पाऊल आहे जरा सांभाळून घ्या :-)

वाचने 7676 वाचनखूण प्रतिक्रिया 7

पद्मावति Tue, 08/30/2016 - 23:18
तिखट, मीठ आणि गोडा मसाला यावर तेल. जमलं तर त्यात कांदा, कोथिंबीर चिरून टाका. भाजलेला पापड चुरून टाका. हे अगदी बेर बोन्स तोंडी लावणं. अजुन सुचेल तसं लिहीन. पोळी असल्यास तिचे बारीक तुकडे करा. त्यामधे लिंबाच्या लोणच्याचा खार टाका. लोणचे नसल्यास कच्चं तेल, मीठ, तीखट, कोथिंबीर.

In reply to by अभ्या..

मलाबी वाटलं लावणी आहे, बरं पाककृती त्यात फोटू नै, अन त्यात सध्या वाचायचा जाम कंटाळा आलाय. :( -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Mon, 09/05/2016 - 17:30
शेंगदाणा तेल + तिखट + मीठ किंवा वरणाचा गोळा + तिखट + मीठ + शेंगदाणा तेल वगैरे सुद्धा मस्त लागते. शिवाय चटण्या, कोशिंबीर + विविध लोणची हे सर्व आहेच.

गौरी कुलकर्णी २३ गुरुवार, 11/03/2016 - 13:32
भूर्का....अहाहा...हा एक फर्मास प्रकार आहे . गावरान लसूण बारिक चिरुन , गावरान तिळ , कढिपत्ता हे सर्व नेहमीची फोडणी करुन खरपूस फ्राय करुन घ्यावे. नंतर हवे तेव्हढे तिखट , अंमळ जास्तच अन् मीठ टाकून मिक्स करावे. जिभेवर खमंग चव लागते. आम्हाला हा भूर्का आवडतो . तूम्हीही करु शकता !