व्हिएतनाम युद्ध!, दक्षिणपूर्व आशियात कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि पर्यायाने रशियाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अमेरिका, 'व्हिएतनाम' या चिमुकल्या देशाविरुद्ध १९५४ पासून इनडायरेक्ट आणि ६०साली प्रत्यक्ष युद्धात उतरली. २० दिवसांत व्हिएतनामच्या मुसक्या आवळू या वल्गनेसह उतरलेली अमेरिका प्रत्यक्ष २० वर्ष या युद्धात अडकून पडली. हिच २० वर्षे थायलंडच्या तीन महत्वाच्या शहरांच्या अंतर्बाह्य बदलास कारणीभूत ठरली.
अमेरिकेचा आजही मित्र राष्ट्र असलेल्या 'थायलंड' देशात त्याकाळी अमेरिकेने "युद्ध-तळ" बनवला होता. व्हिएतनामच्या निबिड जंगलात लढणाऱ्या सैनिकांना "R&R" (Rest and Recuperation) पॉलिसी अंतर्गत वर्षातून दोनवेळा अशी ५ दिवस सुट्टी मिळायची. रेस्ट करण्यासाठी त्यांना बँकॉक, हवाई, मलेशिया, हाँगकाँग आणि सिंगापोर अशी ऑप्शन्स असायची. त्यात बँकॉकला ९०% टक्के सैनिकांची पंसंती असायची कारण इतर ऑपशन्स मधला प्रवासातील वेळ वाचून एक जास्त दिवस अराम करण्यासाठी मिळायचा. त्यासगळ्या घडामोडीत बँकॉकच्या जवळच समुद्राला लागून असलेल्या "पटाया" या खेडेगावावर सैनिकांची नजर पडली नसती तर नवलच.
१९६० पर्यंत 'पटाया' हे मासेमारीवर उपजीविका करणारे, धुळीत हरवलेले एक शांत 'गाव' होते. अमेरिकनांची नजर पडली आणि या गावात आमूलाग्र बदल घडू लागले. पुरुषांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पटायातील स्त्रियांना गोऱ्या कांतीच्या अमेरिकनांच आकर्षण वाटल्यास नवल ते काय? बघता बघता अमेरिकनांच्या आवडीचे, त्यांच्या सोईचे 'बार, पब्स, हॉटेल्स, मॉल्स, गोल्फ क्लब्स' उभे राहू लागले. पटाया सारख्या छोट्याश्या गावाचं शहर, शहराचं महानगर अशी वाढ झपाट्याने होऊ लागली. "R&R" या टर्मचा अमेरिकन सैनिकांनी "I&I" (Intercourse & Intoxication) असं नामकरण करून टाकलं. थाई सरकारही येणाऱ्या डॉलर्सच्या मोहापायी कानाडोळा करू लागले. लोकांचा विरोध असूनही १९६६ मध्ये "The Entertainment Places Act" नावाचा "वेश्या व्यवसायला बंदी आहे (असं नाही)" असा बरेच लूप होल असलेला कायदा बनवून अमेरिकनांना मोकळं रान दिलं. १९७५ साली अमेरिकन सैन्य व्हिएतनाम युद्धात सपशेल माघार घेऊन परत गेलं, पण जाता जाता पटायाचा "वॉकिंग स्ट्रीट", बँकॉकचा "नाना प्लाझा" आणि फुकेतचा "बांग्ला" एरिया. असे तीन प्रॉस्टिट्यूट झोन बनवून गेले. थायलंडची हि ख्याती कर्णोपकर्णी जगभरात पोहोचली मग यूरोपियन्सचा, रशियन्सचा, ओघ इथे वाढू लागला. गेल्या ७-८ वर्षात चिनी आणि भारतीय पर्यटकहि कमालीचे वाढू लागलेत.
हि झाली थायलंडच्या 'नाईट लाईफ' च्या जन्माची कथा. मला उत्सुकता होती या सगळ्या अपकीर्तीबद्दल लोकल आणि इतर थाईवासियांचं काय मत असेल? थाई संस्कृतीच्या श्रीमंत मूल्यांच्या विपरीत गोष्टी डोळ्यासमोर घडत असतांना थाई मंडळी शांत कशी? माझ्या ऑफिसमधील कलिग्स, अपार्टमेंट मधील शेजारी, काही बँकॉक वासिय आणि लोकल न्यूज पेपर मधील या संदर्भातील जुने आर्टिकल्स वाचून एकच सूर जाणवला. "इट वॉज ए बिग मिस्टेक". त्यावेळच्या थाई ऑफिसिअल्सच्या दुर्लक्षामुळे, भ्रष्टाचाराच्या अमंगल युतीमुळे प्रॉस्टिट्यूशन व्यवसायाच्या हातात हाथ घालून येणारे ड्रग्स, जुगार, हिंसा, किलिंग्स, अंडरवर्ल्ड, माफिया, HIV या आतापर्यंत थाई लोकांना माहित नसलेल्या गोष्टी मूळ धरू लागल्या. इतर थाई समाजावर विशेषतः तरुण मुला-मुलींवर विपरीत परिणाम होऊ लागला, लिंगबदलाच्या शस्त्रक्रियांच पेव फुटलं होतं.(आजही आहे)
बुद्धाच्या शांती संदेशाचा खोल प्रभाव असलेल्या थाई भूमीला हि लागलेली किड स्वाभिमानी थाई लोकांना अस्वथ करत होती. उत्तरोत्तर लोकांचा विरोध वाढू लागला. "बूमबूम फॅक्टरी" हि आपल्या देशाची ओळख बदला!! यासाठी रॅलीज निघू लागल्या. (बूमबूम हा शब्द थाई भाषेत सेक्स संदर्भांत वापरला जातो), अग्र लेखांचे रतीब पडू लागले, कित्तेक इलेक्शन्स मधे प्रॉस्टिट्यूशनचा नायनाट करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. लोक भावनेला झुकून १९९६ मधे "The Prevention and Suppression of Prostitution Act" हा कायदाही बनवला गेला. पण तोही दुबळा ठरला.
२००२ च्या स्वतःच्या वाढदिवसाच्या भाषणात राजे "भूमिबोल" यांनी "वॉर ऑन ड्रग्स"ची घोषणा केली. त्यावेळचे पंतप्रधान 'थकसिन शिनावात्रा' यांनी लागोलाग 'अँटी ड्रग' मोहीम चालू करून एका वर्षात २,५०० ड्रग्समाफिया, स्मग्लर्स, पेडलर्सना यमसदनी धाडले. पुढे ह्यूमन राईट्सच्या दबावामुळे ती मोहीम गुंडाळावी लागली. फाशीच्या शिक्षेच्या धाकाने ड्रग्सच्या व्यवसायाला बऱ्यापैकी निर्बंध आलेत पण व्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे 'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं' अशी परिस्थिती प्रॉस्टिट्यूशन बाबतीत झालीय.
माझ्या कलिगच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिएतनामने आम्हाला दिलेला शाप आहे. आपल्या महाभारतात जसं अश्वत्थाम्याला त्याने सोडलेले ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नव्हती तीच बिकट अवस्था थाई सरकारची झालेली आहे. अश्वत्थाम्याला जसा कल्पकल्पांतापर्यंत कपाळीची जखम घेऊन, जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील असा शाप आहे, अगदी त्याप्रमाणेच थाईवासी "बूमबूम फॅक्टरी" हि ओळख पुसण्यासाठी देशो देशीचे उंबरठे झिजवताहेत. मला तरी थाईवासीयांची हि जखम अश्वत्थामा प्रमाणे कायम भळभळत राहील असं वाटतंय.
ताजा कलम:-
परवाच थायलंडच्या नवनिर्वाचित महिला पर्यटन मंत्री 'कोबकार्न वाटानाव्रागकूल' यांनी सेक्स इंडस्ट्री संपवण्याचा विडा उचललाय.
वाचने
25590
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीत भर पडली लेखामुळे...पण
अमितदादा चूक मान्य
मलाही माहित नाही हो.
In reply to अमितदादा चूक मान्य by बाजीप्रभू
तुम्हाला हवा असलेला बदल केला
In reply to अमितदादा चूक मान्य by बाजीप्रभू
सहमत
In reply to तुम्हाला हवा असलेला बदल केला by डॉ सुहास म्हात्रे
कॉलींग टका
माहितीपूर्ण लेख!
धन्यवाद!!
In reply to माहितीपूर्ण लेख! by साती
नम्र विनंती
हं
धन्यवाद
आता इतका वेळ मुनी काही बोलले
In reply to धन्यवाद by बाजीप्रभू
अच्छा!! असं आहे तर
In reply to आता इतका वेळ मुनी काही बोलले by मोदक
थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत,
डांगे साहेब धन्यवाद!
In reply to थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत, by संदीप डांगे
ओ हो, दॅट्स ग्रेट! तुम्ही
In reply to डांगे साहेब धन्यवाद! by बाजीप्रभू
कैच्या कै !
In reply to थाई सरकारकडे दोन पर्याय आहेत, by संदीप डांगे
कैच्याकै, तुमच्या प्रतिसादात
In reply to कैच्या कै ! by चंपाबाई
वस्तुस्थितीच आहे ती.
In reply to कैच्याकै, तुमच्या प्रतिसादात by संदीप डांगे
....
In reply to वस्तुस्थितीच आहे ती. by चंपाबाई
HIV माहितीबद्दल धन्यवाद
In reply to .... by चंपाबाई
मुद्दयाला धरून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.....
In reply to HIV माहितीबद्दल धन्यवाद by बाजीप्रभू
You are not getting my point
In reply to वस्तुस्थितीच आहे ती. by चंपाबाई
...
In reply to You are not getting my point by संदीप डांगे
थॅन्क् गॉड, यु आर ऑन ट्रॅक...
In reply to ... by चंपाबाई
त्यांचा कामाचा विषय आहे रोजचा
In reply to थॅन्क् गॉड, यु आर ऑन ट्रॅक... by संदीप डांगे
आपल्या चंपाबाइ कडून फारच अपेक्षा....
In reply to त्यांचा कामाचा विषय आहे रोजचा by शलभ
त्या ठिकाणी
थाईलँड हा एक सुंदर देश आहे
धन्यवाद!!
In reply to थाईलँड हा एक सुंदर देश आहे by आतिवास
टुरिस्ट स्पॉट ऐवजी थायलंडच्या
In reply to धन्यवाद!! by बाजीप्रभू
थायलंडचा हा प्रश्न अमेरिकेमुळे निर्माण झाला आहेच
थायलंडच्या सुंदरतेला या
या लेखामागची तुमची भावना आणि
हेच म्हणते.
In reply to या लेखामागची तुमची भावना आणि by पद्मावति
+१
In reply to या लेखामागची तुमची भावना आणि by पद्मावति
+१
In reply to या लेखामागची तुमची भावना आणि by पद्मावति
पद्मावति
In reply to या लेखामागची तुमची भावना आणि by पद्मावति
एका गोष्टीचं कुतूहल वाटतंय.
थाई इकॉनॉमी
In reply to एका गोष्टीचं कुतूहल वाटतंय. by बोका-ए-आझम
सकारत्मक प्रतिसाद
चालू घडामोडी
लेखामागची कळकळ पोचली.
धन्यवाद!!
In reply to लेखामागची कळकळ पोचली. by एस
...
जुनं नाव सयाम आहे.
In reply to ... by चंपाबाई
चंपाबाईचि गाडि मगाशि चुकून
In reply to ... by चंपाबाई
तुमचं नेटीय वर्तन
In reply to ... by चंपाबाई
तरी बरे....
In reply to तुमचं नेटीय वर्तन by बाजीप्रभू
भलत्याच अपेक्षा बुवा तुमच्या !
In reply to तुमचं नेटीय वर्तन by बाजीप्रभू
लोक वॅल्यु अॅडिशनसाठी लिहितात की टवाळक्या करायला?
In reply to भलत्याच अपेक्षा बुवा तुमच्या ! by चंपाबाई
लेख माहितीपूर्ण आहे आणि
खूप चांगली माहिती दिलीत
In reply to लेख माहितीपूर्ण आहे आणि by निशाचर
सविस्तर प्रतिसादबद्दल आभार!
In reply to खूप चांगली माहिती दिलीत by बाजीप्रभू
बाजीप्रभू तुमची कळकळ अतिशय
ताजा कलम
देशपांडे भारी लिव्हलेत कि
थायलंड
थायलंड
हे असंय होय, आम्हाला वाटलं
बाजीप्रभु, माहितीपूर्ण लेख
एक खुलासा
एक माहीत(कुप्रसीद्धीने) असलेल्या
नाखु बहुधा
@ बाजीप्रभू,
मागे थाई लग्नाविषयी फोटोंसकट
उशिरा वाचनात आलेला चांगला धागा!