मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत · · जनातलं, मनातलं
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका

वाचने 79992 वाचनखूण प्रतिक्रिया 405

बहुगुणी 19/08/2016 - 20:23
सिंधू थकलीये!

बहुगुणी 19/08/2016 - 20:24
सिंधू झगडते आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/08/2016 - 20:27
च्यायला, नेट जवळ खेळून खेळून सिंधु ला घायाळ केलं राव. पण चिड़ी खेळतेय आणि वेळ घेतेय. २०-१२ सेट आता तीसरा सेट बघूया. सिंधु सम्याशिंग कर रे बाबा.

बहुगुणी 19/08/2016 - 20:31
Commentator had said something interesting in game 2: One competitor is fighting to get a medal, another is fighting to get a gold

सामान्य वाचक 19/08/2016 - 20:36
रामरक्षा

In reply to by सामान्य वाचक

असंका 19/08/2016 - 20:37
मम

सामान्य वाचक 19/08/2016 - 20:36
रामरक्षा

राही 19/08/2016 - 20:37
४-९. दमलीय सिंधू.

पिलीयन रायडर 19/08/2016 - 20:40
७-९

बहुगुणी 19/08/2016 - 20:42
स्मॅश बाय सिंधू

पिलीयन रायडर 19/08/2016 - 20:45
पायाला काहीतरी झालं म्हणे मारिनाच्या.. थोडासा आनंद झाला तर चालेल ना? असं कुणाच्या दुखण्यावर खुश होऊ नये.. पण. तरी..

चतुरंग 19/08/2016 - 20:46
फक्त एक गुणाचा फरक कमॉन सिंधू!!!!!

राही 19/08/2016 - 20:52
उंच उडी मारून स्मॅश पण पुढचा पॉइंट गमावला.