वाट वेगळी तिथेच नक्की झाली
काव्यरस
जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली
हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली
दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली
दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली
पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
1408
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
सालं गझलेतल
In reply to सालं गझलेतल by चांदणे संदीप
संदीप चांदणे, प्रतिसादाबद्दल