अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध
In reply to शीतयुद्ध संपल्यापासून आणि by पिवळा डांबिस
In reply to हा हा! by विकास
नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही.मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... https://www.youtube.com/watch?v=IAR3cb1V_ss :)
पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो!असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. कळावे. लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती.. :)
In reply to त्यांना भाग होतं कायद्याने.... by पिवळा डांबिस
In reply to वॉल स्ट्रीट by विकास
कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)ते महत्वाचं. बाकी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही जाउद्या **** ***!! :)
In reply to शीतयुद्ध संपल्यापासून आणि by पिवळा डांबिस
In reply to :) by आबा
In reply to छान लेख. आवडला आढावा. by अनुप ढेरे
यामुळे अमेरीका कायमच संशयाने आपल्याकडे पहात होती...गेले काही दिवस या चर्चेत यायला तितका वेळ आणि उत्साह नव्हता. या क्षणी दोन्ही गोष्टी असल्यामुळे आणि विशेषतः मुविकाकांनी लिहिल्याप्रमाणे इथे प्रतिसाद देत आहे. हा प्रतिसाद मी पूर्वी मिपावर लिहिलेल्या प्रतिसादांचे एकत्रिकरण करून लिहित आहे. मला वाटते की १९४७ नंतरच्या काळात भारत आणि अमेरिकेचे वितुष्ट येणे क्रमप्राप्तच होते. कारण दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परविरोधी झाले होते.तसेच काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि त्याचवेळी चीनमध्ये यादवी चालू होती ती अस्थिरता लक्षात घेता काश्मीरात आपला तळ असणे हे अमेरिकेला नक्कीच महत्वाचे वाटत असणार.आणि तसे करायला नेहरूंचा भारत तसे करायला कधीच परवानगी देऊ शकणार नाही पण पाकिस्तान देऊ शकेल हे काही अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही.त्यातूनही नंतरच्या काळात भारताने नॅममध्ये महत्वाची भूमिका स्विकारणे, अमेरिकेच्या कुठल्याही आगळीकीचा ताबडतोब निषेध करणे पण रशियाने हंगेरीत जे काही केले त्याविरूध्द निंदाव्यंजक ठराव यु.एन मध्ये आल्यावर त्या ठरावाचे समर्थन न करणे, १९५० च्या दशकात अमेरिका आणि चीनचे वाकडे असताना भारताचे मात्र वरकरणी चीनशी गळ्यात गळे असणे, सीएटोमध्ये सामील व्हायचे आमंत्रण पाकिस्तानने स्विकारणे पण भारताने नाकारणे इत्यादी अनेक कारणांमुळे भारत आणि अमेरिका नंतरच्या काळात एकमेकांपासून आणखी दूर गेले. नंतर १९६० च्या दशकामध्ये एक तर १९६५ चे भारत-पाक युध्द आणि नंतर भारताने व्हिएटनाम प्रकरणी अमेरिकेचा जोरदार निषेध करणे या कारणांची आणखी भर पडली. लिंडन जॉन्सन यांनी पाकिस्तानला भेट दिली पण भारताला भेट द्यायचे मात्र टाळले. त्यामुळे इतकी वर्षे भारत आणि अमेरिका या दोन estranged democracies होत्या. शीतयुध्दाच्या काळात भारत अमेरिकेचे सर्वात चांगले संबंध होते केनेडी अध्यक्ष असताना. त्यावेळी चीनविरूध्दच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला मदतही केली होती.तर सर्वात वाईट संबंध होते रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना.१९७१ च्या युध्दाच्यावेळी अमेरिकेने भारताविरूध्द सातवे आरमार बंगालच्या उपसागरात धाडले होते. १९७७ मध्ये झिया उल हकने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि झिया हे दोघेही parriah ठरले होते (ज्याप्रमाणे ९/११ होण्यापूर्वी मुशर्रफ parriah ठरले होते). ज्याप्रमाणे ९/११ मुशर्रफला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले त्याप्रमाणे रशियाचे अफगाणिस्तानातील आक्रमण झियाला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले.त्यानंतर रशिया अफगाणिस्तानात असताना अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी पाकिस्तानला अगदी भरपूर मदत केली होती. इतकेच नाही तर अफगाणिस्तानातील मुजाहिदींना "the moral equivalent of our founding fathers" असेही म्हटले होते. पुढे जॉर्ज डब्ल्यू बुशनी मुशर्रफला कसे समर्थन दिले हे पण आपण बघितलेच.पण बुशच्या दुसर्या टर्ममध्ये मात्र भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले. मला वाटते की या सर्व घडामोडी झाल्या त्यात दोन्ही देशांची भूमिका त्या त्या काळाला अनुसरून आपापले हितसंबंध जपायला घेतलेली होती.म्हणजे १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन यांच्याऐवजी कोणी डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असता तरी त्याने रेगन यांनी केले त्यापेक्षा फार काही वेगळे केले असते असे नाही. कारण ती अमेरिकेच्या तत्कालीन राजकारणाची गरज होती. अनेकदा आपण असे निर्णय त्या काळच्या परिस्थितीच्या आणि राजकारणाच्या चष्म्यातून न बघता व्यक्ती/पक्ष या चष्म्यातून बघतो. त्यामुळे भारतासाठी केनेडी १९६२ मध्ये चांगले पण निक्सन १९७१ मध्ये वाईट म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच.भारतातही नेहरू समाजवादाकडे झुकलेले होते आणि भांडवलदारांना त्यांचा विरोध होता या कारणामुळे नेहरूंचा ओढा अमेरिकेपेक्षा रशियाकडे जास्त होता असेही काही लोक म्हणतात.मला तसे वाटत नाही.कारण असेच लॉजिक लावायचे झाले तर अमेरिका हा लोकशाही असलेला आणि लोकशाही रूजलेला देश होता तर रशियाचा आणि लोकशाहीचा दुरूनदुरूनपर्यंत संबंध नव्हता.नेहरूंचा लोकशाहीवरील विश्वास किती होता हे आपल्याला माहितच आहे. मग नेहरूंचा ओढा त्याच न्यायाने अमेरिकेकडे राहायला हवा होता!! तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या काही घटना घडल्या त्यात तत्कालीन राजकारणाचा आणि हितसंबंधांचा वाटा जास्त होता. (अवांतरः तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्यकर्ते असे वरकरणी अनाकलनीय वाटणारे निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ १९९०-९१ च्या आर्थिक संकटाच्या वेळी चंद्रशेखर पंतप्रधान होते. ते समाजवादी विचारांचे होते. अशा मंडळींचा आय.एम.एफ सारख्या संस्थांना किती विरोध असतो हे वेगळे सांगायलाच नको. तरीही तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता चंद्रशेखर यांचेच सरकार आय.एम.एफ ला अॅप्रोच झाले आणि त्यांनीच सोनेही गहाण टाकले होते. तेव्हा अशा निर्णयांमध्ये वैचारिक भूमिका वगैरे गोष्टी प्रत्येक वेळी येतीलच असे नाही). याचा अर्थ सत्तेत कोण होते हा मुद्दा पूर्ण गैरलागू होता का? अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही.याचे कारण १९४७ नंतर कित्येक वर्षे भारत हा अमेरिकेसाठी फार महत्वाचा देश होता असे नाही.पण इतर देशांमधील सत्ताधारी मात्र अमेरिकेला अनुकूल्/प्रतिकूल भूमिका घेऊन दोन देशांमधील संबंध वेगळ्या वळणाला नेऊ शकत होते.उदाहरणार्थ इराणमध्ये पेहलवी अमेरिकेचे मित्र होते पण त्यानंतरचे खोमेनी विरोधात. त्यामुळे अमेरिकेची त्या देशाबरोबरच्या भूमिकेत पेहलवी आणि खोमेनी सत्तेत असतानाच्या काळात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसेल. भारतात मात्र अगदी १९४७ पासून दोन देशांमध्ये वितुष्ट यावेच अशीच परिस्थिती असल्यामुळे नेहरूंऐवजी अन्य कोणी सत्तेत असते तरी फार मोठा फरक पडला असता आणि दोन देशांचे गळ्यात गळे असते असे वाटायचेही काही कारण नाही. हा प्रतिसाद काहीसा विस्कळीत झाला आहे याची कल्पना आहे.पण याक्षणी यापेक्षा वेगळे लिहिता येत नाही. नंतर १९९० च्या दशकापासूनच्या घटनांविषयी लिहेन.
In reply to काहीसे विस्कळीत-१ by गॅरी ट्रुमन
In reply to काहीसे विस्कळीत-१ by गॅरी ट्रुमन
In reply to हुमा अबेदीन by रमेश आठवले
In reply to हुमा अबेदीन by रमेश आठवले
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई,हुमा अबेदीन यांचे वडील भारतीय आहेत. हुमा अबेदीन यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्या अमेरिकन नागरिक आहेत. हुमा अबेदीन यांचे पती ज्यू धर्मीय आहेत. आपणच दिलेल्या लिंकमध्ये ही माहिती आहे, ती इथे निदर्शनास आणून दिली. बाकी चालू द्या.
In reply to काही अन्य फॅक्ट्स by नंदन
In reply to भारतीय वंशाच्या हुमा अबेदीन by शाम भागवत
In reply to नवीन माहिती by रमेश आठवले
In reply to काही अन्य फॅक्ट्स by नंदन
In reply to मला तरी अस कळल बॉ. by शाम भागवत
In reply to मूळ स्वभाव जाईना by रमेश आठवले
In reply to उडदामाजी काळे गोरे by रमेश आठवले
In reply to उडदामाजी काळे गोरे by विकास
In reply to नावडतीचे मीठ अळणी! by हुप्प्या
In reply to लिबिया आणि इजिप्त यातील by अमितदादा
In reply to काही खुलासे by हुप्प्या
In reply to बहुतांश खुलासे पटले पण हिलरी by अमितदादा
In reply to उडदामाजी काळे गोरे by विकास
राजकारणात विशेष रस नाही...