चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
लेखनविषय:
काव्यरस
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
सगळ्या कविता झाल्या करून
मग पाटी कोरी केली
आणि खूप वाट पाहिली
पण काहीच सुचेना
मग एक चंद्र काढला
आभाळासारख्या पाटीवर उठून दिसला
मग त्याला सोबत म्हणून चार चांदण्या
भरतीच्या लाटा आदळल्या खडकांवर
मग लगोलग पाऊसही बरसला
ओलेत्या वाळूत तुझं नावही लिहिलं
तुला आवडतात म्हणून
सगळ्यांना आणलं होतं सोबत
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
पण नेमकी तू आली नाहीस
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
एवढंचं कळवलंस
मी त्या मेंदीत चंद्र असेल का?
चांदण्या असतील का?
समुद्राच्या लाटांसारखी नक्षी असेल का?
तुझ्या डोळ्यातल्या पावसाने मेंदी ओलीचं राहिली का?
काय काय विचार करत बसलो
अचानक कुठून सर आली
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
सगळं चित्र पुसून गेलं
तुझ्या मेंदीला रंग चढला असावा
कारण माझी पाटी कोरीच राहिली
वाचने
3862
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
कविता आवडली. छानच लिहिली आहे. मनापासुन.
कविता वाचताना मिकाची आठवण आली. त्याची कविता लिहायची स्टाईल काहीशी अशीच आहे.
सध्या स्वारी कुठे आहे त्याची कोणास ठाउक.
पैजारबुवा,
एहेहे, भारिय हे. भारी म्हणजे काय एकदम दिलको छु लेनेवालेच है.
मिकाची आठवण आली हे मात्र खरं.
बँकॉक वरून आल्याशिवाय काय भेटत नाय तो.
तुम्ही सध्या दमदार लेखन करताय :)
सुरेख लिहिलेय,
सुरेश वाडकरांचं 'तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला, माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा' आठवलं.
भारी.
आवडले
मस्तच!
आवडली!
कविता आवडली!
Sandy
भारीच !!
सर्वांचे आभार :)
छान उतरलीये.
व्वाह!
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
आवडली.
कविता आवडली. आपले आयुष्य हि असेच आहे, शेवटी पाटी कोरीच राहते.
मस्त
:)
छान!
छान कविता!
सुंदर कल्पना... छान आहे कविता
फार सुंदर रचना.
आवडली. पाऊस असतोच त्रासदायक.
मस्तच
आवडली.मस्तच.
मस्त...