मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
In reply to प्रतिसाद देताना किमान सभ्यता by मितभाषी
In reply to मितभाषी साहेब, by गंगाधर मुटे
In reply to मुटेकाका तो प्रतिसाद by मितभाषी
In reply to मुटे इथे तुम्ही लोकांची by आनन्दिता
In reply to प्रत्यूत्तर by गंगाधर मुटे
मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही.ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं.इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.
दोन वर्षात मी काही आयड्यांशी (सर्व नव्हे) असे का वागतो, याचाही शोध तुम्हीच घ्यावा.बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?
हा जुना शेर आहे. मी फक्त शेर ऐकवला, नाही तर तुम्ही म्हणाल की मी लोकांना लांडगा म्हटले.कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय! असो!!
In reply to मी कधी कुणाची अक्कल, दानत by आनन्दिता
इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.माझा प्रतिसाद नीट वाचलात का? वाचला असेल तर समजला का? का निष्कारण धाग्याची लांबी वाढवता? मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही. ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं. जसा प्रश्न असतो तसे उत्तर असते. जसे उत्तर असते तसे प्रत्यूत्तर असते. असे लिहिले होते मी...!
बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?कधीचाच घेतला आहे. रोग कळला आहे म्हणून उपचार नेमकेपणाने सुरू आहेत. औषध कडू असल्याने रोग्याला व त्याच्या नातेवाईकाला आवडत नसेल तर त्याला इलाजकर्त्याचा नाईलाज आहे.
कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय!हे तुमचं स्वतःच मत आहे. वाटेल तसं मत बाळगण्याचं स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला आहे. मी यात दखल द्यावी असं काहीही नाही.
In reply to इतक्या सगळ्या उर्मट by गंगाधर मुटे
In reply to तुमचे प्रतिसाद म्हणजे काय by आनन्दिता
In reply to __/|\__ by गंगाधर मुटे
In reply to तुमचे प्रतिसाद म्हणजे काय by आनन्दिता
In reply to सहमत by सामान्य वाचक

In reply to मुटे इथे तुम्ही लोकांची by आनन्दिता
In reply to छान by चंपाबाई
In reply to अहो रूपं अहो ध्वनिम by सामान्य वाचक
: समारोप :
आंतरजालाच्या सुसंस्कारीत, सुशिक्षित, सुजान, आणि अभ्यासू जगतात २००९ मध्ये माझा चंचूप्रवेश झाला. २००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे कारण ......... सांप्रत हिंदुस्थानातल्या मनुष्यजातीच्या एका झुंडीला लढायची व संघर्ष चेतवता ठेवण्याची प्रचंड आवड आहे. त्यातूनच एकटेपणाने लढण्याऐवजी झुंडीने लढण्याची प्रवृती वाढत गेली असावी. यातूनच निर्माण झाला असावा वर्गसंघर्ष. वर्गसंघर्षाची काही लक्षणे आणि वैशिष्टे : १) एका वर्गाने दुसर्या वर्गाला हीन/न्यून लेखने. २) एका वर्गाने दुसर्या वर्गाचे शोषण करून त्या वर्गाला आपल्या पायदळी ठेवण्याचा प्रयत्न करणे. ३) एका वर्गाला दुसर्या वर्गाची बरोबरी करता येत नसले तर थेट दुसर्या वर्गाचे अहीत चिंतने. ४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्या वर्गाला जबाबदार ठरवणे. ५) एका वर्गाने दुसर्या वर्गाच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्याच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या कशा होतील, याचेच प्रयत्न करणे. ६) वगैरे वगैरे. वर्गसंघर्षाची काही उदाहरणे : १) दलित विरुद्ध सवर्ण २) हिंदू विरुद्ध मुस्लिम ३) मराठा विरुद्ध ब्राह्मण ४) बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक ५) अल्पजन विरुद्ध बहुजन ६) वगैरे वगैरे खरं तर वर्गसंघर्षाची ठीणगी पाडायला आणि ज्योत पेटती ठेवायला कोणत्याही वर्गातल्या सर्वच व्यक्ती अजिबात कारणीभूत नसतातच. कारणीभूत असतात फ़क्त त्या-त्या वर्गातल्या झुंडी. झुंडीच हे कार्य इमाने इतबारे करित असतात आणि त्याचे फ़टके तो संपूर्ण वर्ग, तो संपूर्ण समाज, ती संपूर्ण जात भोगत असते. ही बाब सर्वमान्य नसली तरी माझ्या ७ वर्षाच्या आंतरजालीय अनुभवावरून या निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतकरी विरुद्ध सुशिक्षित बिगरशेतकरी असा छुपा संघर्ष अस्तित्वात आहे. हा वर्गसंघर्ष नसला तरी वर्गसंघर्षाची बहुतांशी लक्षणे आणि वैशिष्टे जशीच्या तशी लागू होत आहेत. यातून या देशाची सुटका कधी होणार आहे हे भगवंताशिवाय कोणीच सांगू शकत नाही, अशी स्थिती मात्र नक्कीच आहे.In reply to : समारोप : by गंगाधर मुटे
In reply to भयंकर चुकीचे अतिसुलभीकरण आणि by एस
In reply to : समारोप : by गंगाधर मुटे
In reply to -१ by शलभ
In reply to माझं वरातीमागुन घोडं आहे पण by पिलीयन रायडर
In reply to माझं वरातीमागुन घोडं आहे पण by पिलीयन रायडर
In reply to राजकीय चर्चा वाचत नाही का ओ by उडन खटोला
In reply to अनुमोदन by राही
In reply to अनुमोदन by राही
In reply to संतुलित, अनुभवी प्रतिसाद. by अभ्या..
In reply to माझं वरातीमागुन घोडं आहे पण by पिलीयन रायडर
In reply to पिरातै शी बाडीस by गणेश उमाजी पाजवे
मितभाषी साहेब,