मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
In reply to खटपट्या साहेब, by गंगाधर मुटे
हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.हेही सांगून टाका. बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता. हा रोख तुम्हालाही मान्य असेल. शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या. शहरी लोकही कधीतरी शेतकरी होतेच की. तुमच्या दुसर्या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात. आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.
In reply to हे कशासाठी एवढा तमाशा करतात by खटपट्या
बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता. हा रोख तुम्हालाही मान्य असेल.खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता? त्यांना जाऊ द्या ते बेभान झालेत. तारतम्याशी त्यांचा काही संबंध उरलेला नाही. आपण वाचाना माझे धागे. मिसळपावर उपलब्ध आहेत ना! मग सांगा मला.
शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या.भरपूर आणि सविस्तर लेखन केले आहे मी. बोलणारे नुसतेच बोलतात. वाचतात कुठे?
तुमच्या दुसर्या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात.त्या कवितेत मी फक्त जसे आहे तसे वास्तव मांडले आहे. कविता म्हणजे ग्रंथ नसतो की प्रस्तावनेपासून समारोपापर्यंतचा सर्वच वृत्तांत यायला पाहिजे.
आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.मिसळपाववरिल १५-२० आयडींची झुंड म्हणजे संपूर्ण आंतरजाल नव्हे. हे झुंड सोडली तर कोणीच तापत नाहीत. त्यांना कविता कळते, लेख कळतो. त्यातले मर्म कळते. मी एकाच वेळी माझे लेखन ४ संकेतस्थळावर, २ ब्लॉगवर, २५ फेसबूकगृपवर, ३५० व्हाटसप गृपवर प्रकाशित करत असतो. लेखन प्रकाशित केल्यावर किमान १०,००० लोक ते वाचतात. ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हे, हे तुम्हीच समजून घ्या.
In reply to बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा by गंगाधर मुटे
ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हेकडक. तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटते, कळत नाही म्हणजे त्यांना अक्कल नाही असे नाही. आयटीतल्या प्रॉडक्ट सायकलवर एखादा इथे लिहित असेल तर जसे तुम्हाला-मला कळणार नाही तसे त्यांना कळत नाही. शेतीमधे भरमसाठ विषय आहेत व ते सर्व एकमेकांशी विचित्र पद्धतीने गुंतलेले आहेत हे प्रत्यक्ष फिल्डवर काम करायला लागल्यावर कळत आहे. ह्यातले ढोबळमानाने, सुटसुटीत पद्धतीने बातम्यांमधून येणारे विषय सर्वसामान्य पब्लिकला -जी स्वतः शेतकरी नाही- माहित होतात. प्रत्यक्ष अनुभव नसल्याने काही बाबतीतले आवश्यक तपशील तर्कशुद्ध विचार करतांना कमी पडतात व त्यातून गैरसमज होतात. शेतीविषयी इथे लिहितांना मला ह्या मर्यादा जाणवत आहेत. प्रत्येक ठिकाणची शेतीची पद्धत, मानसिकता, भौगोलिक परिस्थिती थोडीफार, कमीजास्त प्रमाणात बदलत असते. अगदी पाच-दहा किमीवरही दोन शेतातल्या एकाच पिकामधे फरक दिसून येतो, हवामान वेगळे असते. त्यामुळे एखाद्या भागातला शेतकरी दुसर्या भागातल्या शेतकर्याचे प्रश्न समजून घेऊ शकेलच ह्याबद्दल मला शंका वाटते. दुसरे असे की तुम्ही कायम चळ्वळीत, संबंधित लोकांमधे राहत असल्याने, चर्चा करत असल्याने तुमचे सर्कल इथल्या वाचकांच्या सर्कलपेक्षा भन्नाट वेगळे आहे. तुम्ही आयुष्य ह्याच विषयाला वाहून घेतले असल्याने तुम्ही सतत कॄषीविषयक अनेक तपशीलांना मनात ठेवून पंधरावीस ओळीची कविता सादर करता. त्यामागचे संदर्भ इथल्या वाचकांना कळत नसल्याने गैरसमज होऊन तुम्ही फक्त वल्गना करता, बाकी काही नाही असे इथे वाटते. काहींच्या प्रश्नांना उत्तर मिळाली नाहीत अशीही तक्रार आहे. माझे अशांना आवाहन आहे की किमान तीन दिवस सुटी काढून मुटेसरांबरोबर घालवावा, ते काय काम करतात, कोणत्या लोकांमधे असतात, काय घड्तं हे सगळं फर्स्ट ह्याण्ड कळेल. मुटेसाहेब काही नाही म्हणणार नाहीत. काही लोकांना अंगवळणी पडलेले डिटेल्स देणे जीवावर येते, कदाचित त्यामुळेच मुटेसरांना अशा प्रश्नांची उत्तरे देणे फोलपणाचे वाटत असावे हे प्रश्नकर्त्यांनीही समजून घ्यावे आणि वादावर पडदा घालावा असे माझे मत आहे.
In reply to ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे by संदीप डांगे
तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटतेअत्यंत चुकीचे मत हे तुमचे. मिसळपाववर काय १५-२० च सदस्य आहेत का? त्यापेक्षा जास्त असेल तर उरलेल्यांना कसे काय समजते? मी वारंवार सांगतो आहे की जो प्रॉब्लेम आहे तो फक्त १५-२० जनांच्या झुंडीचा आहे. संपूर्ण मिसळपावकरांचा नाही. कविता कळत नाही तर वेडेवाकडे प्रतिसाद देण्याची ह्या झुंडीला गरजच काय? ज्याला कळेल तो चांगली म्हणेल किंवा वाईट म्हणेल. कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.
In reply to बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा by गंगाधर मुटे
किमान १०,००० लोक ते वाचतातसर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?
हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.हेही जाहीर करुन टाका
In reply to किमान १०,००० लोक ते वाचतात by खटपट्या
सर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?मी १०,००० पैकी १५-२० म्हटल्यावर सर्वच झूंडशाहीत कसे काय येतील बुवा? तुम्हीच मला बेरीज्,वजाबाकी,गुणाकार, भागाकार करुन उत्तर सांगावे? मला प्रश्न विचारणारे हे काय १५-२० च आहेत? अन्य कुणीच नाही? का असा ध चा मा करता आहात? माझ्या फेसबूकला भेट द्या, व्हाटसप गृपवर या तिथे तुम्हाला प्रश्न विचारांची आकडेवारी कळेल. मिसळपावरील माझे मागील काही धागे उघडा. तिथे राडा घालणारे आणि कशापायी कोण करत होते हे ही शोधा. म्हणजे झुंडीतली नावे तुम्हालाच कळून चुकतील. एवढा तमाशा का केला जात आहे, त्याची अनेक कारणे आहेत. पैकी सर्वच मी सांगणार नाही पण किरकोळ कारण असेही आहे की यांना मी मिसळपाववर नको आहे. कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.
In reply to हां ना राव... by संजय पाटिल
In reply to या धाग्यावरील प्रतिक्रिया by श्रीगुरुजी
In reply to इथे डाॅ खरेंचा प्रतिसाद होता by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to सगळ्यआ व्रूदांपनो मजा करा. by मितभाषी
,,,,,,,, ब्रेक के बाद ,,,,,,,,
===========================================
दोन मूठ राख
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...
म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं......
म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...
आणि
अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"
पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
===========================================
In reply to ब्रेक के बाद by गंगाधर मुटे
१) मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत
२) ...तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन
मुटे, तुम्ही नक्की काय तो एक स्टँड ठरवा. उत्तरे दिली आहेत की नाही. उत्तरे दिली असतील तर त्याच्या लिंका द्या. संक्षिप्त किंवा कसेही.
प्रश्न आणखी एकदा -
सगळ्याच सरकारांनी शेतकर्यांचा कसा काय घात केला..?
..आणि इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)In reply to १) मी तुमच्या प्रश्नांना by मोदक
इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)मी वैयक्तीक टिका कुणावरच करत नाही. कुणी माझ्यावर केली तर उत्तरादाखल केली तर मी काय उत्तर देईन, हे मलाही माहीत नसते. त्यामूळे इथे धमकी वगैरे कुचकामी ठरते. खालील ओळी मोदकराव तुम्हाला उद्देशून नाहीत. त्यापेक्शा १) यापुढे मिसळपाववर आलात तर याद राखा. २) यापुढे कविता लिहाल तर याद राखा. ३) यापुढे सरकारवर टीका केली तर याद राखा. वगैरे अशा कुणी धमक्या दिल्या तर ते राष्ट्रहिताचे तरी होईल.
In reply to इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत by गंगाधर मुटे
In reply to कुणी माझ्यावर केली तर by गंगाधर मुटे
In reply to उत्तरांच्या लिंका? by मोदक
आणखीही २४ पुस्तके आहेत. सर्व पुस्तकांची किंमत ४००० रु. चे वर जाईल.
पण जे पाठवायचे आहे ते पुस्तक पोस्टेजखर्चासह २५०/- च्या आसपास जाते. तरीही मी तुम्हाला
पैसे द्या म्हटले नाही फक्त पत्ता द्या म्हटले.In reply to लिंक देतो असे मी म्हटलेले by गंगाधर मुटे
In reply to ठीक. इतके सोपे होते तर या by मोदक
In reply to बहुतेक त्यांनी चारशे का सहाशे by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा.. त्यांनी by मोदक
In reply to गुड डिसिजन.. by संदीप डांगे
In reply to :) by मोदक
In reply to १) मी तुमच्या प्रश्नांना by मोदक
In reply to ब्रेक के बाद by गंगाधर मुटे
In reply to तुम्ही खालील दिलेली कविता by सुबोध खरे
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०
५) “नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६
****
५) ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार - सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.
सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास.
४) २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा येथे आयोजित पहिल्या व २०,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.
१) १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.
३) नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि "कणसातली माणसं" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन.
In reply to संक्षिप्त परिचय by गंगाधर मुटे
In reply to ह्म्म्म by इरसाल
In reply to शेतीवर पोट by गंगाधर मुटे
In reply to >>>>>मी एकाच वेळी माझे लेखन ४ by उडन खटोला
In reply to आपल्या आस्वादासाठी माझा एक by गंगाधर मुटे
In reply to तो म्हणाला काव्य कसले? by उडन खटोला
In reply to कसा जोम यावा खुरटल्या पिकांना by गंगाधर मुटे
In reply to आहात अस्सल मातीतले, आहे जाण by उडन खटोला
In reply to मातीत राबताना इतके कळून आले by गंगाधर मुटे
In reply to फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव by उडन खटोला
In reply to शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज by गंगाधर मुटे
In reply to आता याचा अर्थ सुद्धा सांगा. by उडन खटोला
एक जाहीर प्रश्न
याच धाग्यावर एक अस्तित्वहीन आयडी माझ्या नावावर आणि आडनावावर व्यंग कसायला लागली, तेव्हा त्या आयडीला वैयक्तीक पातळीवर टीका-टिपणी करणे अयोग्य आहे, असा सल्ला देणारा मिसळपावर कोणीच नव्हता का?
मला सल्ले द्यायला बर्याच आयडी सदैव उताविळ असतात, म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन. बाकी विशेष काही नाही.
- गंगाधर मुटे
In reply to जाहीर प्रश्न by गंगाधर मुटे
In reply to +१ by संदीप डांगे
In reply to हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत by सामान्य वाचक
In reply to हा धागा आणि सचिन चा धागा एकाच विषयावर आहेत by सामान्य वाचक
In reply to सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे by कविता१९७८
मुटेंनी कधीच स्वतःचे धागे सोडुन दुसर्यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीतदुसर्यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिलेच नाहीत असेही नाही पण जितके द्यायला हवे तितके देऊ शकत नाही. पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही (पूर्वी पडीक असायचो) याचे शल्य मलाही आहे. मिसळपाववरच म्हणून नव्हे तर अन्य कुठल्याही संकेतस्थळावर, फेसबूकवर अथवा व्हाटसपवर देखील मी प्रतिसाद देऊ शकत नाही याला नाईलाज आहे आणि त्याला पर्याय नाही. कारणेच सांगायची तर .... १) एका व्यक्तीला असणार्या मर्यादा २) दिवस फक्त २४ तासाचाच असणे ३) नित्यनेमाची कामे टाळून वेळ न वाचवता येणे उदा. जेवण ४) झोपेला अन्य पर्याय नसणे ५) दोनवेळेचे पोट भरण्यासाठी खाजगी कामांना वेळ द्यावाच लागणे वगैरे... पण दुसर्यांच्या धाग्यांवर प्रतिसाद न देणे हे चांगले नसले तरी गुन्हा नाही असे मला वाटते.
त्यांना वाटतय की सर्वांनी त्यांच्या धाग्यावर त्यांची फक्त वाहवाईच करावी.असे मी म्हटले नाही. यापुढे तसे म्हणण्याची शक्यता नाही.
ज्यांनी केली नाही त्यांना कविता समजत नाही असे त्यांचे मत.असे मी कधीही म्हटलेले नाही. एखाद्या व्यक्तीला म्हटले याचा अर्थ सर्वांना होत नाही.
मग तो कुणी ही असो त्यांचा अपमान करत रहा ही त्यांची सवय.मी कुणाचाही अपमान करत नाही. मात्र मी म. गांधींचा वारस नसल्याने कुणी माझ्या एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करत नाही. मला देवाने हात दिले आहे आणि माझा अपमान करणार्यालाही देवाने गाल दिले आहेत, याचे मला भान असते, इतकेच.
मी तर त्यांना शक्यतो कधी प्रतिसाद ही देत नाही तरी त्यांनी मला या धाग्यावर तुम्ही नियमित अस लिहिता आणि तसं लिहिता असे प्रतिसाद दिलेत.शितावरून भाताची परिक्षा होत असे म्हणतात.
अशा आयडीला विनातक्रार झेलतय ते आपलं मिपा. चांगलय.हा सर्वस्वी मिपाचा निर्णय आहे. मी त्यावर मत नोंदवू शकत नाही.
In reply to प्रतिसाद दिले नाहीत by गंगाधर मुटे
In reply to श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली by सुबोध खरे
In reply to श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली by सुबोध खरे
In reply to मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला by अजया
In reply to काय म्हणतेस? बोका - ए - आझम by कविता१९७८
In reply to +1 by सामान्य वाचक
In reply to काय म्हणतेस? बोका - ए - आझम by कविता१९७८
In reply to मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला by अजया
अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद देत असतानामी प्रतिसाद दिलेले नाहीत. केवळ उत्तरादाखल उपप्रतिसाद दिलेले आहेत. मी कुणावर वार केला नाही फक्त स्वसंरक्षण केले आहे.
बोका ए आझम सारखा आय डी बॅनमी तशी मागणी केलेली नव्हती.
वैयक्तिक प्रतिसाद हे जर कारण असेल तर पत्ता मागणे काय सार्वजनिक कारण आहे?मी सर्वांना त्यांचे पत्ते मागीतलेले नाहीत. ज्यांच्या पत्त्यांची मला गरज भासली त्यांनाच मागीतली. सार्वजनीक द्या म्हटले नाही, मी माझा इमेल आयडी देऊन व्यक्तीगत पाठवा असे म्हटले. मात्र का म्हटले ते येथे विस्तृत लिहित बसणार नाही. मराठी भाषा जाणणार्या कोणत्याही व्यक्तीला ते सहज कळू शकते.
In reply to ४०० by महासंग्राम
In reply to गप रे by पैसा
In reply to मित्रांनो, by जयंत कुलकर्णी
मिपाला भुषणावह नाहीतसं असेल तर मी माझ्यापरिने एक पर्याय देऊ इच्छीतो की हा धागाच उडवून टाकावा.
In reply to बोका ए आझम बॅन होणे दुर्दैवी by आनन्दिता
In reply to +१ by सतिश गावडे
In reply to +१ by सतिश गावडे
In reply to १. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, by संदीप डांगे
देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते.हा प्रश्न प्रामाणिक वाटतो. भंडावणे वगैरे नाही. जेव्हा आपण एखादा दावा करतो तेव्हा तो शास्त्रशुद्ध फिल्ड एक्सपरिमेन्टद्वारेही सिद्ध करता आला पाहिजे.अनेकानेक शेतकर्यांना व्यक्तिगत चांगले अनुभव आले असतीलही आणि पाळेकरांचा अनुभव अतिशय दांडगा आहेच, पण तरीही जेव्हा हे नियंत्रित प्रयोगाद्वारे तपासले जाईल तेव्हा ते तसे सिद्ध व्हावे. यामुळे देशी गाईच्या गोमूत्राचे रासायनिक आणि जीवशास्त्रीय असे कोणते घटक आहेत ज्यामुळे विशेष फायदा होतो ते पण कळेल.
In reply to देशी गायीच्याच गोमुत्राला by स्वामी संकेतानंद
In reply to स्वामीजी, तुमचे म्हणणे खरे by संदीप डांगे
In reply to १. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, by संदीप डांगे
In reply to सहमत, by अभ्या..
In reply to सहमत, by अभ्या..
In reply to माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत by सतिश गावडे
In reply to माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत by सतिश गावडे
In reply to माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत by सतिश गावडे
In reply to गावडे सर नमस्कार, by अभ्या..
In reply to १. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, by संदीप डांगे
गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही?पक्षपातीपणा करायचा असता तर काही प्रतिसाद खटकले असं लिहीलंच नसतं. :)
In reply to गावडेसर, दोन्ही विधानांत by सतिश गावडे
In reply to खटकण्यासारखे असतीलही. (डळमळीत by संदीप डांगे
In reply to उठलीच पाहिजे ..... उठलीच by शि बि आय
In reply to उठलीच पाहिजे ..... उठलीच by शि बि आय
In reply to उठलीच पाहिजे ..... उठलीच by शि बि आय
In reply to उठलीच पाहिजे ..... उठलीच by शि बि आय
In reply to बोका-ए-आझम by गंगाधर मुटे
In reply to मुटे इथे तुम्ही लोकांची by आनन्दिता
हे कशासाठी एवढा तमाशा करतात