मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंबरा

हर्षल_चव्हाण · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे, दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे? मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी, (पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी, "पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे, का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे? उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे... - हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

वाचने 5317 वाचनखूण प्रतिक्रिया 38

हरभरा.... सैल झाली नाडी आता, व्यर्थ आहे थांबणे, दोन क्षणांची प्रतिक्षा, तो वरी का कुंथणे, मी तुझ्या डब्यात माझे पाणी होते ओतले, बोट त्यात बुडवु नको तू, व्यर्थ आहे चिवडणे, शोध घेता मी डब्याचा, टिश्यु येतो सामोरी, पण मनाला आसही की, स्वच्छ निर्मळ वाटणे, अंत माळरानात वा शौचालयी आहे जरी, "उद्या पुन्हा फिरुन येरे" आहे जगाचे सांगणे का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,
साष् टांग प्रणी पात! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/14/2016 - 09:34
अरे अरे काय हे पैजार बुवा. अक्षरशः चहा सांडला ना अंगावर, ऑफिसमधले सगळे बघताहेत माझ्याकडे. साष्टांग नमस्कार. हर्षल तुमची कविताही चांगली आहे. आणि अंत देव्हा... ही ओळ क्लासच आहे.

हर्षल_चव्हाण Wed, 07/13/2016 - 13:36
ज्ञानोबा, धन्य आहात, तुम्ही विडंबन लिहून (की आणखी काही करून) मोकळे पण झालात ;) मला एवढ्या वेदना नव्ह्त्या झाल्या काही ... सपशेल आडवी केलीत कविता :D आत्मबंध, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

In reply to by सतिश गावडे

हर्षल_चव्हाण Wed, 07/13/2016 - 17:53
कविता लिहून पूर्ण होण्याची वेळ टाकतो. कधीतरी एखादी सुचते, म्हणून... बाकी, कल्पना आवडली उदयास्ताची :D

चांदणे संदीप Wed, 07/13/2016 - 23:53
विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy

चांदणे संदीप Wed, 07/13/2016 - 23:54
विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप गुरुवार, 07/14/2016 - 10:45
कविता आवडल्याचे सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार... पण खरे श्रेय मूळ कवीला... श्री हर्षल चव्हाण यांचा झिंदाबाद! :) Sandy

नाखु गुरुवार, 07/14/2016 - 08:57
अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,
आम्हाला बुवांचा अजरामर फलक धागा आठवला. संदीपा बेष्ट लेका. नित्वाचक नाखु

मदनबाण गुरुवार, 07/14/2016 - 09:18
मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... वाह्ह... विडंबन सुद्धा लयं भारी हायेत... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan