मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लग्नाचा बाजार

वाल्मिक · · काथ्याकूट
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे

वाचने 40473 वाचनखूण प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

In reply to by वाल्मिक

महासंग्राम 21/07/2016 - 16:04
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.

आदूबाळ 06/07/2016 - 16:09
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्‍या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.) दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग ...
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)

In reply to by राजाभाउ

अभ्या.. 06/07/2016 - 17:51
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.

In reply to by अभ्या..

राजाभाउ 06/07/2016 - 18:45
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे
बेक्कार हसतोय

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 06/07/2016 - 20:50
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात. मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.

In reply to by अभ्या..

राजाभाउ 07/07/2016 - 11:04
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच

In reply to by कविता१९७८

बोका-ए-आझम 06/07/2016 - 20:36
जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.

In reply to by कविता१९७८

रेवती 06/07/2016 - 21:04
नाही गं. आपल्याकडे पूर्वी डॉट कॉम वाल्या साईटींचा प्रकार येण्याआधी जसे ओळखीतून स्ठळे पाहणे, अपेक्षा विचारणे होत असे त्याप्राकारातला किस्सा आहे. नातेवाईक भेटले होते. त्या बाईंची तक्रार होती की त्यांची मुलगी आलेल्या बर्‍याच स्ठळांना नकार देते, तूच बघ ना विचारून तिच्या मनात नक्की काय आहे वगैरे बोलून झाल्यावर आईने तिला अपेक्षा विचारल्या. त्यात क्र. ८ ऐकून ती गप्पच बसली व मला तेथून घेऊन तडक घरी आली. माझ्या टीनएज मनावर याचा कितपत परिणाम झालाय वगैरे विचारांनी ती धास्तावली होती. आत्ता मलाही लईच हसू आलं, त्यातही अभ्याचे प्रतिसाद वाचायचे म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्याला वेडं समजायला लागतात इतकं हसू येतं.

In reply to by वाल्मिक

मृत्युन्जय 07/07/2016 - 11:25
पण मी काय म्हणतो छातीवर केस आहेत की नाही हे त्या कन्येला लग्न होइस्तोवर कळणार कसे? आणि मग चेक करुनच घेणार असेल तर मुलाने उलटी अट घातल्यास काय करणार?

पत्रिकाच बित्रिकाच बघायची असेल तर मग आपापल्या समाजाच्या वधु वर सुचक मंडळात नाव घाला की. जसे क्षत्रिय समाज, सारस्वत,मराठा ,ब्राम्हण वगैरे. बेस्ट मॅच तिकडेच मिळेल. उगीच चव्हाट्यावर जाहिरात केली की असेच होणार. कारण डॉट कॉम असेल तरी पाठीमागची विचारसरणी बदलत नाही. आणि छातीवर केस बिस अशा अपेक्षा असतील तर भयानक आहे. उद्या फ्लिपकार्टवर नवरे शोधावे लागतील आपल्या आवडीचे/मापाचे.

हेमन्त वाघे 06/07/2016 - 20:52
असे मला कोणीच का विचारले नाही ?? का ?? मग मुलांनी केस असतील तर उघडे फोटो टाकायचे का ?? विचारानेच मळमळायला लागले ! http://i1016.photobucket.com/albums/af281/rakeshjhun/14e88d80.jpg

In reply to by वाल्मिक

रेवती 07/07/2016 - 00:46
दुसर्‍याची अपेक्षा काहीही मूर्खासारखी असेल. आपण त्याला किती बळी पडायचं? मुलींना जसे चालून दाखव, पाय दाखव वगैरे म्हणतात व ते अपमानास्पद वाटते तसेच पुरुषांसाठीही ही गोष्ट अपमानास्पद आहेच! तुम्ही ही अपेक्षा कशाला पूर्ण करता? नंतर तक्रार करायची नाही मग!

In reply to by रेवती

वाल्मिक 07/07/2016 - 00:50
मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण नाही वाटलं ,आणि त्या मुलीवर तेव्हा प्रेम असल्याने अपेक्षा पूर्ण केली होती

In reply to by रेवती

वाल्मिक 07/07/2016 - 00:57
भयानक ? मान्य मूर्खपणा ? अमान्य केस छातीवर पाहिजे ह्याचा अर्थ मुलातले पुरुषत्व बघायची कसोटी होऊ शकते हा तांत्रिक दृष्टिकोन ,पण कसोटी आगाऊ पानाची आहे मुलीला चालायला बोलायला जुन्या काळी लावत होते कारण मुलगी पांगळी ,मूक आहे हे बघायला

बोका-ए-आझम 06/07/2016 - 21:00
हा धागा त्या प्रकारचा आहे. महालोल धागा! ब्रम्ह्यांची लूना, ताम्हिणी घाटातला वाघ आणि सप्तर्षी बाईंच्या मांजरानंतर आता हे अजरामर होणार!

पद्मावति 06/07/2016 - 21:36
मुलींच्या बाबतीत नकार द्यायलाही फनी कारणं देतात हं. चष्मा आहे ( भलेही मुलगी लेन्सेस असेल), गोरी हवी हे क्लास्सीक. आमची मुलगी सामान्य रंगाची आहे सांगितल्यावर सावळी,गहूवर्ण, गोरी का लख्ख गोरी असे चार पर्याय माझ्या वडिलांना दिले गेले होते. त्यामधून एक निवडा म्हणाले... पण हे माझ्या लग्नाच्या वेळेस नव्वद च्या दशकात. आता काय परिस्थीति आहे हे माहीत नाही..

In reply to by अभ्या..

खटपट्या 06/07/2016 - 22:58
मला जुना रणजीत नावाचा व्हीलन आठवला. त्याने एका चित्रपटात लेदर जॅकेट घातले होते ज्यात फक्त छाती उघडी उघडी होती.

कायेक्की एकाची चप्पल दुसर्‍याला वापरता येते मात्र एकाचे अंतर्वस्त्र दुसर्‍याच्या मापाचे असले तरी काही कारणास्तव ते वापरता येत नाही. लग्नाच्या अनुभवांचे अगदी तस्सेच आहे. वरुन अनुभव एकसारखे दिसत असले तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि युनिक असतो. तस्मात पास ! तरीही मार्गदर्शन हवेच असेल तर बाबा वाड्यावर या ! (निळु फुले स्टाईल)

लग्नासाठी "आशाळभूत" लोकांनी "केसाळ भूत" कसं व्हावं हाच मूलभूत प्रश्न आहे ! तुम्हीही डोकं लढवून काहीतरी हटके अटी काढा आता....आम्ही मदत करू....

स्रुजा 07/07/2016 - 00:10
अरे अट आहे ती आहे पण ती पुरी होणार की नाही हे कसं कळणार? बघण्याच्या कार्यक्रमात मुलाला काय सलमान खान सारखं शर्ट काढुन नाचायला लावणार की काय?

In reply to by धनंजय माने

वाल्मिक 07/07/2016 - 00:24
तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर फटका माराच ,निम्म्या वर प्रोफिले मध्ये शुद्धलेखन नसतंच टाका ला विचार पाहिजे तर

राजाभाउ 07/07/2016 - 11:14
महालोल धागा. ८ मधल्या ७ अपेक्षांबद्दल कोणी फारसं बोलत नाही क्रं ८ ने मात्र बाजार उठवला. त्या पांढर्या कागदावर काढलेल्या काळ्यां टिंबाच्या गोष्टीची आठवण झाली.

परिंदा 07/07/2016 - 11:47
माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या १) मुलाचे स्वतःचे घर असावे पण होमलोन नसावे. २) घरात आजेसासु, सासरे नसावेत कारण काय? तर हे लोक बेडरिडन होतात मग त्यांचे सगळे करावे लागते. ३) छातीवरच काय अंगावर केस नसावेत. असल्यास वॅक्सिंग करुन घ्यावे. ४) दर महिन्याला बाहेर फिरायला जावे. बाहेर म्हणजे शहरातल्या शहरात शॉपिंग, हॉटेलिंग नव्हे तर महाबळेश्वर, गोवा, उटी वगैरे ठिकाणी फिरायला जावे. ५) नवरा मुलगा घरातला मोठा मुलगा नसावा. कारणः सासु-सासर्‍यांनंतर सगळे कुळाचार करावे लागतील. ६) मुलगी सेंट्रल लाईन वर राहणारी असेल तर मुलगा पण सेंट्रलचाच हवा. कारणः माहेरी जाताना जास्त प्रवास करावा लागत नाही.

In reply to by परिंदा

वाल्मिक 07/07/2016 - 11:52
मुलींना सासू नकोय पण स्वतःचे आई वडील पाहिजे मुलीच्या वडिलांना मात्र व्याही पाहिजेतच मी असे पण बघितले की मुलीला शेती मध्ये काम करायचे नाही पण मुलगा शेती वाला पाहिजे

धनंजय माने 07/07/2016 - 13:45
शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक यांना एक मुंग्यांचे वारुळ, छातीवर लावायच्या केसांचा विग आणि एक नटराजाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धनंजय माने 10/07/2016 - 09:00
अब का बताइये ससुरा? वाल्मिक जो कही उ का उसे शोभा देत रही? ई कलजुग का वाल्मिक तो हमै भी कलजुग का सबर! कोनो फरक नाही पडत उ बुडबत का|

पामर 07/07/2016 - 16:12
एका कोल्हापुरच्या मुलीने तर मला सॅलरी स्लीप अन इन्कम टॅक्स रिटर्न्स मागितले होते कारण तिला माझ्या उत्पन्नाची खात्री करुन घ्यायची होती. :)

In reply to by पामर

स्रुजा 07/07/2016 - 19:38
लोकं चक्क खोटं बोलतात मुलाच्या इन्कम बद्दल. खात्री करुन घेणे चुकीचे नाही. खात्री कशी करायची हे टॅक्टफुली ठरवावे ज्याने त्याने.

वाल्मिक 07/07/2016 - 16:23
एवढेच ? गावाकडची मुलगी MBA करून नोकरी नाही ,बापाच्या ओळखीचे HR लागली सॅलरी स्लीप मागते ,कंपनीत फोन करते हा माणूस खरंच कामाला आहे का ,आणि साखरपुडा ठरवते मग परत तिचा रिकामटेकडा भाऊ येऊन कंपनी चेक करतो

In reply to by राजाभाउ

वाल्मिक 07/07/2016 - 17:06
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ? त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?