व्हेज बार्बेक्यू - भरली वांगी आणि भरली भेंडी
गोपाळरावांनी खड्डा कोंबडीची लैच सोपी पाकृ दिल्याने घरच्या कोळशाच्या शेगडीवर सुरू असणारे कणीस, भरीत करण्यासाठीचे वांगे, कांदे, बटाटे, रताळी वगैरे भाजण्याचे प्रयोग पुढच्या श्रेणीला नेणे क्रमप्राप्त होते.
सकाळी एका हार / फुलेवाल्याकडून केळीची पाने मिळवली आणि तयारी सुरू केली.
साहित्य -
१) केळीची पाने आणि अॅक्युमिनीयम फॉईल
२) भाजीसाठी वांगी, बटाटे आणि भेंडी (नंतर चव बघण्यामध्ये निम्म्याहून जास्त संपतात त्यामुळे बटाटे आणि भेंडी त्या प्रमाणात.)
३) कांदा - बारीक चिरून
४) धणे पावडर
५) शेंगदाण्याचे कूट
६) जिरे पावडर
७) कांदा लसूण मसाला
८) मीठ
९) जिरावण / जिराळू पावडर
१०) खोवलेले खोबरे
११) कोथिंबीर
१२) गूळ / साखर
१३) तेल
सोबत भाजण्यासाठी
१) मक्याचे कणीस
२) कांदे
३) बटाटे
४) रता़ळी
५) तुम्हाला जे आवडे ते..
सर्वप्रथम आपण ज्या कशात बार्बेक्यू करणार आहोत त्यामध्ये लाकडे पेटवा. भरपूर जाळ झाला पाहिजे व नंतर भरपूर कोळसे तयार झाले पाहिजेत. मी मातीची कुंडी वापरली.
लाकडे पेटायला वेळ लागला. :(
वांगी धुवून घ्या.
वांग्यांचे देठ काढून टाका व त्याला देठाच्या दिशेने ३ / ४ उंचीच्या डॉक्टरांच्या चिन्हासारख्या चिरा द्या.
वरील सर्व जिन्नस वापरून भरली वांगी करताना आपण जसा मसाला तयार करतो तसा मसाला तयार करा व वांग्यांमध्ये भरा.
बटाटे धुवून व साल काढून घ्या.
बटाट्याला आरपार छिद्र करणे शक्य असेल तर तशी २ / ३ छिद्रे करा.
केळीची पाने स्वच्छ धुवून घ्या. हारवाल्याकडे शक्यतो खुंट मिळतात. त्यातला सर्वात आतला भाग एकदम कोवळा व स्वच्छ असतो. त्या भागावर भरलेली वांगी आणि बटाटे ठेवा. वरून राहिलेला मसाला थापा.
भेंडी साठी वरचे मसाले वापरा व भेंडी भरून घ्या. भेंडीच्या मसाल्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला.
केळीच्या पानांचे ३ थर करा व त्याची पोटली बांधून घ्या. या तयार पोटलीला ३ वेगवेगळ्या दिशांनी अॅल्युमिनीयम फॉईलने गुंडाळा.
मातीच्या कुंडीत तळाशी भरपूर धगधगीत कोळसे घाला.
त्यावर या पोटल्या आडव्या ठेवा. (उभ्या ठेवू नयेत, खालची भाजी जळते - स्वानुभव.)
वरून आणखी एक धगधगीत कोळशांचा थर द्या. वरच्या कोळशांच्या थरावरती कणीस, कांदे, बटाटे किंवा रताळी भाजा.
साधारणपणे पाऊण तासाने भेंडीची पोटली बाहेर काढा.
तासाभराने वांगी-बटाट्याची पोटली बाहेर काढा.
भाजी तयार आहे. हवे असल्यास सोबत पोळी / भात घ्या अन्यथा आहे असेच खाल्ले तरी चालेल. :)
**********************************
मी गोपाळरावांच्या प्रमाणे अॅल्युमिनीयमचे कंटेनर वापरले नाहीत म्हणून फॉईलचे ३ थर दिले
कोणत्याही परिस्थितीमध्ये एका तासापेक्षा जास्त वेळ कोळशाची धग लागून देवू नका - भाजी करपते / जळते.

वाचने
23705
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
हायला.....
In reply to हायला..... by माम्लेदारचा पन्खा
हायला
वाह!!
दु दु मोदक. जीभ खवळवली...
पोपटी घरात ( ब्लॅाकमध्ये )
झकास भावा एक नंबर झकास!!!
एकदम झक्कास
In reply to एकदम झक्कास by केडी
नक्की सर. :)
मस्तच जमलंय. घरी आमची गँग
वा!मोदकभौ,रहाता कुठे तुम्ही
..
तोंपासु.
फार छान
+१
जबरी आहे. च्यायला माझ्या घरात
In reply to जबरी आहे. च्यायला माझ्या घरात by पिंगू
पिंगूशेठ.. का फुलटॉस देता दर
In reply to पिंगूशेठ.. का फुलटॉस देता दर by मोदक
=))
@जिरावण / जिराळू पावडर ››› इ
ओ कधी लोकांना तोंडदेखलं तरी
भालो आछे!
In reply to भालो आछे! by एस
+१
नेक इरादे
मस्तय! तों पा सु.
जेब्बात !
जिराळू पावडर म्हणजे काय रे ?
In reply to जिराळू पावडर म्हणजे काय रे ? by गणामास्तर
मास्तुरे आणि बुवा - जिराळू /
In reply to मास्तुरे आणि बुवा - जिराळू / by मोदक
हापिसच्या बाहेर नुकतंच एक
In reply to हापिसच्या बाहेर नुकतंच एक by गणामास्तर
तेच असणार. औंध मध्ये कुठेतरी
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे
फोटो दिसत नाहीत ..
वाह मोदक एकदम भारी पा कृ ,
वा वा !
In reply to वा वा ! by सस्नेह
तुम्ही कुठे असता? कोण तुम्ही?
In reply to तुम्ही कुठे असता? कोण तुम्ही? by मोदक
अ र्र र्र र्र...
आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
In reply to आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! by आनंदी गोपाळ
आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक
आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!देणार की राव रेफरन्स.. तुमची कोंबडीच तर आमची प्रेरणा होती..!!!केळीच्या पानाची छोटी टिप : पान थोडं त्या निखार्यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी जस्ट धग लावली, की नरम पडतं, मग त्याची पुरचुंडी वळण्याचं काम सोपं होतं.मला मिळालेली केळीची पाने खूपच कोवळी होती. सहज दुमडत होती आणि न फाटता पुरचुंडी बांधली गेली.खालच्या पोटल्या शिजेपर्यंत कणीस्/बटाट्या/रताळ्यांचं पुढे नाही, तर आधीच गट्टम झालं असावंसं दिसतंय. ;)सही जवाब. ते कणीस आणि रताळी, बटाटे पोटल्या तयार होईपर्यंत गट्टम झाले. :)त्या बाबा कणसा पेक्षा बेबी
In reply to त्या बाबा कणसा पेक्षा बेबी by धनंजय माने
आहे आहे.. ते पण लिस्टावर आहे.
मस्त पा.कृ.
भारी पाककृती , आवडली.
मोदकभौ
हं
बाब्बॉ जबरी, हे करायची इच्छा
In reply to बाब्बॉ जबरी, हे करायची इच्छा by पियुशा
प्रयत्न करा हो.. सहज जमेल.
मस्त् भाजी
क्या बात है ! मस्त पाक्क्रुति
मोदक भाऊ
दोन वर्षं भट्टी चालूच ठेवली