मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जग हे मधुशाला

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जग हे मधुशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला ज्याची त्याला प्यारी बाटली बाटली तले सखे सौंगडी देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी लुडके नजर न धावे चकण्या पलीकडे गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला कुणा न माहीत किती ढोसले ते कोठुन आलो ते नच स्मरते उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला

वाचने 1656 वाचनखूण प्रतिक्रिया 5

नाखु 28/06/2016 - 11:59
ता-याला मन घाबरते, जो आला तो रमला हे बाकी खरे हा. ही कवीता नेमकी वारीच्या दिवशी का आली असावी ? मिपावरकरी नाखु