मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

अनिरुद्ध अभ्यंकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चेहरा सारे खरे ते सांगतो याचसाठी आरसा मी टाळतो वेगळे घडणार अंती जाणतो मी तरी आंदाज माझे बाधतो कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो यायची असतेस तेव्हा का मला काळ थोडा थांबल्यागत वाटतो एवढा साधा नसावा प्रश्न तो! उत्तराला वेळ आहे लागतो ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो -अनिरुद्ध अभ्यंकर

वाचने 3609 वाचनखूण प्रतिक्रिया 14

प्राजु Mon, 01/26/2009 - 01:12
सुरेख गझल. ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो हे खूप आवडले. खूप दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय Mon, 01/26/2009 - 01:48
अर्थपूर्ण कडवी. खूपच दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :-)

चतुरंग Mon, 01/26/2009 - 04:13
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो सुभानल्ला!! अत्यंत सोप्या शब्दातली सशक्त गजल, एकेक शेर आरपार! चतुरंग

संदीप चित्रे Mon, 01/26/2009 - 06:21
>> यायची असतेस तेव्हा का मला >> काळ थोडा थांबल्यागत वाटतो क्या बात है.... एक से एक सुरेख शेर ... गझल आवडली :)

मनीषा Mon, 01/26/2009 - 16:36
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो ... ... ..............मस्तच !!

मदनबाण Mon, 01/26/2009 - 22:47
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो जबरदस्त... (गोष्टीत रमणारा) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

मनिष Tue, 01/27/2009 - 14:58
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो
या ओळी फार आवडल्या! :)