तुझ्या नकळत
लेखनविषय:
तुझ्या नकळत तुला, रतीने बघावे
अन पाहून तव रूप ,लज्जित व्हावे
.
असा ,सखे लयबद्ध पदन्यास तुझा
पैंजणास वाटे, तुज बिलगुनि राहावे
.
अशी लाजरी अबोध रमणी, असे तू
आला वसंत देही,तुज ठाऊक नसावे.
.
नाभीत जशी त्याच्या ,कस्तुरी दरवळे
तसे मम हृदयी तू ,दरवळत राहावे
.
हे काय झाले,तुला हि कळेना
ते पाहून ,मदनाने गाली हसावे
.
तारकांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हावे
मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे
वाचने
1647
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मस्तय मी पयला
मस्तय मी पयला
@अशी लाजरी अबोध रमणी, असे तू
In reply to @अशी लाजरी अबोध रमणी, असे तू by अत्रुप्त आत्मा
+++११११ क्या बात!
छान आहे.
मस्त
देखणी कविता!