भयस्वप्न
*
स्वप्नातल्या रेल्वे प्रवासात
भेगाळ ओस माळरानावर
दिसले प्रचंड सबस्टेशन
विजेचे.......
.......अकस्मात त्यावर
अगदी स्लो मोशनमध्ये
पडतय् क्षेपणास्त्र........
................ म्हणेस्तोवर
"बघा बघा!" पडलेही........
................... धुकट
धुराळ्यातून मनोर्यांवर
विजेची चकचक.........
...............क्षणभर थबकत
उठले नी लोट लोटांवर.
"खिडकी बंद!" पण कपटे
सिग्रेटपत्रीसारखे तोवर
डबाभर...........
............ कट्!
.................... आता गाडी
व्हीटीमध्ये... प्लॅटफॉर्मांवर
हाहाकार, सैरभैर लोकांचा
कल्लोळ नि:शब्द........
.................. दृश्यावर
"म्यूट" दाबलाय. टीव्हीसारखा.
*
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1992
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठला
माफी. नाही
कवितेतील
वेगवेगळे अर्थ लावता येतील
अरे...
In reply to वेगवेगळे अर्थ लावता येतील by धनंजय
आयला